माहितीपट - ३१ मे रोजी ‘उठेंगे हम’
३१ मे रोजी ‘उठेंगे हम’ सदर माहितीपट म्हणजे देशातील १.३ अब्ज जनतेची गोष्ट असल्याचे भारतबाला यांनी नमूद केले आहे.
मुंबई : कोरोनामुळे तब्बल ६८ दिवस लॉकडाऊन मध्ये अडकलेल्या देशाची स्थिती नेमकी काय झाली आहे? काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत पसरलेल्या औरस चौरस खंडप्राय मध्यममार्गी, निम्म मध्यमवर्गीय देशाने या जगण्यासाठीच्या सक्तीच्या टाळेबंदीमध्ये कसे दिवस व्यतीत केले असतील? याचा शोध घेतला आहे भारतबाला आणि टीमने. २४ मार्च रोजी लॉकडाऊन झाल्यानंतर २५ मार्च पासून देशाभरात तब्बल ११७ वेगवेगळ्या ठिकाणी टीम बांधून चित्रित केलेल्या ‘उठेंगे हम’ या लॉकडाऊन झालेल्या संपूर्ण देशाचे चित्रण करणाऱ्या विशेष माहितीपटाचे लोकार्पण ३१ मे रोजी होणार आहे. सदर माहितीपट म्हणजे देशातील १.३ अब्ज जनतेची गोष्ट असल्याचे भारतबाला यांनी नमूद केले आहे.
Comments
Post a Comment