अभिजीत खांडकेकर

२५ वर्षांच्या प्रवासाच्या आठवणी होणार ताज्या - अभिजीत खांडकेकर
सा रे ग म प या लोकप्रिय कार्यक्रमाचा यशस्वी रौप्यमहोत्सव आपल्या लाडक्या प्रेक्षकांसोबत साजरा करण्यासाठी झी मराठी येत्या रविवारी 'सारेगमप एक देश एक राग' हा विशेष कार्यक्रम सादर करणार आहे. विशेष म्हणजे हा कार्यक्रम कलाकारांनी घरून शूट केला आहे. या सोहळ्याच्या सूत्रसंचालनाची धुरा अभिजित खांडकेकर निभावणार आहे त्याबद्दल अभिजित सोबत साधलेला हा खास संवाद
१. सा रे ग म प च्या २५ वर्षांच्या प्रवासाचा तू एक भाग होतो आहेस याबद्दल काय सांगशील?
- सा रे ग म प हा कार्यक्रम २५ वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण करतोय हि खरंच खूप मोठी आणि आनंदाची गोष्ट आहे. फक्त महाराष्ट्रच नाही तर भारत आणि भारताबाहेर देखील हा कार्यक्रम तितकाच लोकप्रिय आहे आणि या कार्यक्रमाचा रौप्य महोत्सव साजरा होणार असून मी पण त्याच्या एक भाग आहे याचा मला अभिमान आहे.  
२. हा कार्यक्रम तुझ्या किती जवळचा आहे?
-   सा रे ग म प या लोकप्रिय कार्यक्रमाच्या २ पर्वांचं सूत्रसंचालन करण्याची संधी मला मिळाली याचा मला खूप आनंद आहे. त्यामुळे या २५ वर्षांच्या प्रवासाचा मी देखील एक साक्षीदार आहे असं मी म्हणू शकतो. 
३. प्रेक्षकांसाठी सुरांची मेजवानी असणार आहे रविवारी, त्याबद्दल काय सांगशील (थोडक्यात स्वरूप काय असेल कॉन्सर्टचं?)
- एक देश एक राग हे कॉन्सर्ट रविवारी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा कार्यक्रम खरंच खूप युनिक आणि स्पेशल आहे. कुठलेही कलाकार एकत्र न येता, एकमेकांना न भेटता, डिजिटल मंचावर एकत्र येऊन एकमेकांशी गप्पा मारणार आहेत, गेम्स खेळणार आहेत, या २५ वर्षांच्या प्रवासाच्या आठवणी ताज्या करणार आहेत. हा खरंचं वाखाणण्याजोगा प्रयोग आहे.
४. तू या कार्यक्रमासाठी घरातून शूट केलं, हा अनुभव कसा होता?
- मी या संपूर्ण कार्यक्रमाचं शूटिंग माझ्या मोबाईलवर केलंय. एरवी शूट करताना सेटवर सर्व गोष्टी उपलब्ध असतात त्यामुळे आपल्याला ते सोपं वाटतं पण घरी शूट करणं तितकं सोपं नाहीये. खूप मोठी प्रोसेस होती. त्यात जर काही चुका झाल्यातर पुन्हा परत शूट करून ते टीम कडून बरोबर आहे कि नाही ते बघणं. आणि लॉकडाऊन असल्यामुळे घरातील सर्व कामं सांभाळून शूटिंग करणं हा खरंच एक मोठा टास्क होता. पण यात मला सुखदाची खूप मदत झाली. तिने कॅमेराच्या मागून मला खूप मदत केली तसंच झी मराठीच्या टीमने वेळोवेळी योग्य सूचना देऊन मला सहकार्य केलं त्यामुळे मला हा वेगळा प्रयोग करताना खरंच खूप मजा आली.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Cityflo & Salaam Bombay Foundation

June Is Here, But Humidity Isn't Going Anywhere: Functional Fashion Brands Helping Indians Stay Comfortable