पीएनजी ज्वेलर्स
पीएनजी ज्वेलर्स’च्या नवीन स्टोअरचे औरंगाबादमध्ये उद्घाटन औरंगाबाद मधील हे दुसरे स्टोअर, वर्षाअखेर आणखी दोन स्टोअर्स सुरू करण्याचे उद्दिष्ट लॉकडाऊननंतर ब्रँडची विस्तार योजना पुन्हा पूर्व पदावर औरंगाबाद, ३१ ऑगस्ट २०२० : भारतातील सर्वात विश्वासार्ह ज्वेलरी ब्रँड असलेल्या ‘पीएनजी ज्वेलर्स’ने औरंगाबादमधील आपल्या दुसर्या स्टोअरचे उद्घाटन केले आहे. या नवीन स्टोअरसह ‘पीएनजी ज्वेलर्स’च्या जगभरातील स्टोअर्सची संख्या ३९ झाली आहे. या स्टोअरच्या उद्घाटन प्रसंगी ‘पीएनजी ज्वेलर्स’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ , 'पीएनजी ज्वेलर्स ' चे संचालक पराग गाडगीळ , यांच्यासह औरंगाबादमधील प्रख्यात सिंघवी , बोरा आणि पापडीवाल परिवारातील सदस्य उपस्थित होते. अद्ययावत सुविधांनी युक्त ‘पीएनजी ज्वेलर्स’चे नवीन स्टोअर प्रशस्त अशा २६०० चौरस फूट जागेत विस्तारलेले असून येथे सोने, चांदी आणि डायमंडच्या दागिन्यांची विस्तृत श्रेणी उपलब्ध असेल. या प्रशस्त स्टोअरमध्ये आधुनिक काळातील स्त्रियांसाठी उत्कृष्ट समकालीन दागि...