रविवारी ३० ऑगस्टला ‘शेमारू मराठीबाणा’ वाहिनीवर दिसणारा ‘लालबाग-परळ
‘लालबाग परळ’ ‘शेमारू मराठीबाणा’ वाहिनीवर
डोळे दिपवणारे अवाढव्य शॉपिंग मॉल्स, नाईट क्लब्ज आणि पंचतारांकित हॉटेल्सनी सजलेली मध्य मुंबई म्हणजे मुंबईच्या ऐश्वर्याचं प्रतीकच. पण किती जणांना ठाऊक असेल या सोनेरी प्रकाशात झळाळणाऱ्या नगरीच्या उदरात दडलेल्या काळोखी वास्तवाबद्दल? या आकर्षकतेखाली भरडल्या गेलेल्या असंख्य गिरणी कामगारांच्या स्वप्नांबद्दल? ऐंशीच्या दशकातील गिरणगावामधील गिरणी कामगारांच्या अयशस्वी ठरलेल्या संपामुळे हजारो कुटुंब उद्धवस्त झाली. लालबाग-परळ या मुंबईतील गिरणी कामगारांच्या भागात मिल बंद झाल्यावर कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना किती अडचणींचा सामना करावा लागला याचे दाहक चित्रण दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी ‘लालबाग परळ... झाली मुंबई सोन्याची’ या चित्रपटातून केले आहे. ‘शेमारू मराठीबाणा’ वाहिनीवरील महा मुव्हीमध्ये प्रेक्षकांना येत्या रविवारी ३० ऑगस्टला दु.१२.०० वा. आणि सायं. ६.०० वा. 'लालबाग परळ' हा चित्रपट पाहता येईल.
वेगवेगळ्या दर्जेदार चित्रपटांचा खजिना घेऊन ‘शेमारू मराठीबाणा’ वाहिनीने प्रेक्षकांचे कायमच रंजन केले आहे. येत्या रविवारी ३० ऑगस्टला ‘शेमारू मराठीबाणा’ वाहिनीवर दिसणारा ‘लालबाग-परळ’ हा दाहक सिनेमा पाहणे प्रेक्षकांसाठी वेगळा अनुभव असणार आहे. अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, सई ताम्हणकर, सचिन खेडेकर, वैभव मांगले, शशांक शेंडे, सीमा विश्वास, विनीत कुमार सिंग, वीणा जामकर, करण पटेल, सतिश कौशिक, कश्मिरा शहा, समीर धर्माधिकारी, गणेश यादव, विनय आपटे, किशोर प्रधान, आणि अनुषा दांडेकर अशी भली मोठी स्टारकास्ट आणि तितकाच दमदार अभिनय या गोष्टींसाठी हा सिनेमा लक्षात राहतो. तेव्हा ‘शेमारू मराठीबाणा’वर नक्की पहा ‘लालबाग परळ'... झाली मुंबई सोन्याची’.
महेश मांजरेकरांनी हा ज्वलंत विषय मांडण्याचं धाडस दाखवलं आणि या चित्रपटात मला नेहमीपेक्षा वेगळी भूमिका करायला दिली याचा आनंद जास्त आहे. ‘शेमारू मराठीबाणा’ वाहिनीवर ३० ऑगस्टला हा चित्रपट दाखवला जाणार असून प्रत्येकाने हा चित्रपट नक्की बघावा. – अंकुश चौधरी
'लालबाग परळ' हा चित्रपट माझ्यासाठी खूप खास होता. उत्तम सहकलाकारांसोबत काम करण्याचा आनंद वेगळाच होता. एकाच वेळी दोन भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. माझ्या भूमिकेच्या व चित्रपटाच्या यशाचं श्रेय दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना आहे. – सिद्धार्थ जाधव
|
Comments
Post a Comment