लाव रे तो व्हिडीओ
बासरी आणि त्याच्या सुरांची जादू या जादूने देश तसेच परदेशाच्या संगीत क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिलेय. ओठांनी बासरीच्या सुरांची ही जादू तर तुम्ही नेहमीच अनुभवली असेल. पण हे सूर आणि बासरीची जादू तुम्हाला नाकामधून ऐकायला मिळाली तर. जळगावच्या पंडितराव जोहरे हे असेच एक अवलिया कलाकार. जे ओठांनी नाही तर नाकपुड्याच्या साथीने बासरी वाजवतात. पहायला आगळी वेगळी वाटणारी पंडितराव यांची किमया तेवढीच कष्टाची आणि जिकरीची आहे. कैक वर्षाच्या तालमीतनं त्यांनी ही किमया आत्मसात केली. विशेष म्हणजे त्यांच्या या कलेतनं उमटणारे बासरीचे सूमधूर संगीत तेवढेच किंबहूना नेहमीपेक्षा जास्त मंत्रमुग्ध करणारे आहे.
झी युवावरच्या लाव रे तो व्हिडिओ या कार्यक्रमामधून पंडितरावांची ही सांगितिक जादू पहायला मिळेल. चला हवा येऊ द्या फेम निलेश साबळे या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करतोय. अवघ्या महाराष्ट्राचं मनोरंजन करु शकेल आणि प्रेक्षकांना पोट धरुन हसायला लावेल अशा टॅलेंटचा शोध या कार्यक्रमातनं घेतला जाणारे. महत्वाचे म्हणजे संपुर्ण महाराष्ट्र या कार्यक्रमात सहभागी होऊ शकणारे. समस्त महाराष्ट्रामधील प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याची संधी झी युवावरच्या या कार्यक्रमामुळे उमेदीच्या कलाकारांना मिळतेय शिवाय वयाची मर्यादा नसल्याने बच्चेकंपनीसह तरुण तसेच ज्येष्ठ नागरिकही या कार्यक्रमात आपले व्हिडिओ शुट करुन पाठवू शकतात.
Comments
Post a Comment