अभिनेता देवदत्त नागे

 बाप्पाचा आशीर्वाद सदैव पाठीशी - देवदत्त नागे

खंडेरायाच्या गाजलेल्या भूमिकेनंतर डॉक्टर डॉन या मालिकेतून देवाच्या व्यक्तिरेखेने अभिनेता देवदत्त नागे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करतोयडॉक्टर डॉन मधील देवा भाईवर देखील प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेतडॉक्टर डॉन या मालिकेच्या सेटवर गणेश चतुर्थी निमित्त  दिवसाची सुट्टी कलाकारांना मिळाली त्यामुळे देवदत्त अलिबागला जाऊन हा सण साजरा करतोयगणेशोत्सव हा देवदत्तचा आवडता सण आहे आणि त्याच्या या लाडक्या सणाबद्दलच्या आठवणी सांगताना देवदत्त म्हणाला, "माझं बालपण पेणमध्ये गेलं आणि पेण हे गणपती बाप्पाच्या मुर्तींचं माहेरघर मानलं जातंलहानपणापासून मी आजबाजूला बाप्पाच्या मुर्ती घडताना पाहिल्यातमी स्वतः बाप्पाची मुर्ती बनवायचोपण मला बाप्पाचा सर्वात मोठा आशिर्वाद मिळाला तो माझ्या खंडेरायाच्या भुमिकेमधूनही मालिका मला मिळाली आणि त्याच्या लोकप्रियतेमुळे मी आजूबाजूला कितीतरी मोठ मोठ्या खंडेरायारुपी बाप्पाच्या मुर्ती घडताना पाहिल्यातमाझ्या स्वतःच्या घरामध्ये सलग तीन वर्ष मी खंडेरायरुपी गणपती बाप्पा विराजमान केलेआज जेव्हा या आठवणी तुम्हाला सांगतो तेव्हा ही मन कृतार्थ होतंअशा अनेक बाप्पाच्या आठवणी मी माझ्या ह्रदयात कायमस्वरुपी सांभाळून ठेवल्यात."

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Anand Rathi Share & Stock Brokers...

BlueStone Jewellery & Lifestyle IPO