आप्पा आणि बाप्पा’ हा धमाल चित्रपट ‘ॲमेझॉन प्राइम’ वर

           ‘आप्पा आणि बाप्पा’ ‘ॲमेझॉन प्राइम’ वर
सध्या सगळ्यांना गणपती बाप्पाच्या आगमनाचे वेध लागले आहेत. गणेशोत्सवाच्या काळातल्या या क्षणांचा आनंद द्विगुणित करण्याची संधी आपल्याला मिळणार आहे. आपल्या लाडक्या बाप्पाचा ‘आप्पा आणि बाप्पा’ हा धमाल  चित्रपट ‘ॲमेझॉन प्राइम’ वर प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

मराठी माणसांचं आणि सणांचं हे वेगळं नातं आहे. पण अलीकडच्या काळात हे सण साजरा करण्याचे स्वरूप बदलत चाललेले दिसते आहे. धर्म, संस्कार, विधी-परंपरा, नातेसंबध या संज्ञांना  तिलांजली देत गोंगाटी सादरीकरणाकडे आणि वारेमाप उधळपट्टी करण्याकडे जनसामान्यांचा कल दिसतोय. सण आणि उत्सवासंबंधीची आजची वास्तविकता यावर अतिशय मार्मिक, परखड तरीही मनोरंजक प्रकाशझोत ‘आप्पा आणि बाप्पा’ या चित्रपटातून टाकण्यात आला आहे. दिलीप प्रभावळकर, भरत जाधव, सुबोध भावे यांच्यासोबत संपदा कुलकर्णी, उमेश जगताप, शिवानी रांगोळे आदि कलाकार या चित्रपटात आहेत.

‘आप्पा आणि बाप्पा’ थिएटरमध्ये जाऊन पाहण्याची तुमची संधी हुकली असेल तर आता हा चित्रपट  ॲमेझॉन प्राइम वर नक्की पहा. 

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Cityflo & Salaam Bombay Foundation

June Is Here, But Humidity Isn't Going Anywhere: Functional Fashion Brands Helping Indians Stay Comfortable