फ्लिपकार्टवर फ्लाइट बुकिंगसाठी लिबर्टी जनरल इन्शुरन्सचे विशेष प्रवास विमा 

-विमानाच्या तिकिटांवर शून्य रद्दीकरण शुल्क
- अपघाती मृत्यू आणि कायमस्वरुपी संपूर्ण अपंगत्वसाठी संरक्षण  
मुंबई / बेंगळुरू, 01सप्टेंबर, 2020: लिबर्टी जनरल इन्शुरन्स लि. (लिबर्टी) ही भारतातील आघाडीच्या सर्वसाधारण विमा कंपनी असून आणि पावलोपावली ग्राहकांच्या विमा संरक्षणाच्या  गरजा पूर्ण करण्यात विश्वास ठेवते. यात त्यांच्या गतिशील गरजेनुसार त्यांना संबंधित विमा समाधान पुरवणे देखील समाविष्ट आहे. या दृष्टीक्षेपाच्या अनुषंगाने फ्लिपकार्टवर त्यांनी ‘लिबर्टी सिक्योर ट्रॅव्हल’ सुरू केली आहे - जी फ्लिपकार्टच्या फ्लाइट प्लॅटफॉर्मवरुन एअरलाईन्स बुक करणार्‍या ग्राहकांना उपलब्ध असणारी विमा पॉलिसी आहे. ग्राहक नाममात्र रक्कम देऊन झिरो कॅन्सलेशनची निवड करू शकतात, अशा प्रकारे त्यांची उड्डाणे रद्द केल्यावर पूर्ण परतावा मिळवू शकतात.
या नवीन पॉलिसी अंतर्गत  ग्राहकांना तिकीट बूकिंग रद्द करण्यासाठी कोणतेही दंड होणार नाही,  ज्यामुळे त्यांची रद्दबातल चिंता कमी होईल. लिबर्टी सिक्योर ट्रॅव्हल ग्राहकांना ‘कारणास्तव रद्द करा’ पर्याय ऑफर करते. या करणांमध्ये वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती,  प्रयोजनांमध्ये बदल आणि इतर वैयक्तिक कामे यासारखे कारण आणि शक्यतांचा समावेश असू शकतो. या पॉलिसी अंतर्गत ग्राहकांना विमान सुटण्यापूर्वी 24 तासांपर्यंत त्यांची उड्डाणे रद्द करण्यास परवानगी असेल आणि लिबर्टी त्यांना 5000 रुपयापर्यंतच्या नुकसानीची भरपाई करेल.
या विषयी बोलताना लिबर्टी जनरल इन्शुरन्स लिमिटेडचे सीईओ आणि होल टाईम डायरेक्टर श्री. रूपम अस्थाना म्हणाले, “फ्लिपकार्टबरोबर प्रवास विमा उतरविण्याची संधि देण्यासाठी आम्ही खूष आहोत. या संबंधामुळे भारतीय ग्राहकांना खूप लाभ मिळणार असून यात ग्राहक-केंद्रीकरणाच्या मापदंडावर चांगले गुण मिळविणारे ट्रॅव्हल इन्शुरन्स उत्पादन खरेदी करण्यास ग्राहकांना सक्षम बनविण्याची क्षमता आहे. जस जसे आपले जीवन पूर्वपदावर येईल, तसे या उत्पादनामुळे मोठ्या संख्येने स्थानिक प्रवाश्यांना फायदा होईल आणि कोणत्याही अनपेक्षित परिस्थितीमुळे होणारे नुकसान कमी होईल. आम्हाला विश्वास आहे की आमचे उत्पादन कोणतीही चिंता न करता ग्राहकांना त्यांच्या प्रवासाची योजना आखण्याचा आत्मविश्वास देईल. ”
श्री. अस्थाना पुढे म्हणाले की, “ही संघटना आम्हाला या नवीन युगातील डिजिटल व्यासपीठावर आमचा वितरण आधार वाढविण्यास मदत करणार नाही तर फ्लिपकार्टच्या ग्राहकांना संबंधित प्रवासाची सोल्यूशन्स उपलब्ध करून देऊन क्लास सर्व्हिसेसमध्ये सर्वोत्कृष्ट ऑफर करण्यास सक्षम करेल.”
या ऑफरबद्दल बोलताना, फ्लिपकार्ट येथील ग्रोथ आणि मोनेटायजेशनचे  उपाध्यक्ष श्री. प्रकाश सिकेरिया म्हणाले, “फ्लिपकार्ट येथे आमचा दृष्टीकोन नेहमी ग्राहक-प्रथम असा राहिला आहे आणि लिबर्टी जनरल इन्शुरन्सबरोबरची आमची भागीदारी या पॉलिसीच्या अनुरुप आहे. आम्ही एक विवेकी दृष्टिकोन सुनिश्चित करून सर्वोत्तम विमा पर्याय देऊन हवाई प्रवाश्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार बुकिंग करण्यास सक्षम करतो. "
लिबर्टी सिक्योर ट्रॅव्हल पॉलिसी कव्हरेज / तपशील यांचे विहंगावलोकन येथे आहे:
कव्हर  विमाराशीची रक्कम (रुपये)
ट्रिप रद्दीकरण विस्तार कमाल 5000 / - पर्यंत
अपघाती मृत्यू 5,00,000
कायमस्वरुपी अपंगत्व 5,00,000
- विमा उतरवलेल्या वयाच्या 3 महिन्यांपासून 70 वर्षांपर्यंतचे पॉलिसी वैध असते
- पॉलिसी केवळ भारतीय रहिवाशांनाच आहे
- ही पॉलिसी केवळ घरगुती हवाई प्रवासासाठीच वैध आहे.
- आपण अनुसूचित निर्गम तारखेच्या अगोदर कमीतकमी उड्डाणाच्या एक दिवस अगोदर (24 तासा) पूर्वी तिकीट रद्द केल्यास ‘ट्रिप कॅन्सलेशन एक्सटेन्शन’ कव्हरवर दावा करू शकता.
- पॉलिसी वैधता मूळ विमानतळावरून उड्डाणांच्या तारखे आणि वेळेपासून ते गंतव्य स्थानावर वास्तविक आगमन तारीख आणि वेळे पर्यन्त लागू असतो आणि ज्याचा उल्लेख बुकिंग केलेल्या फ्लाइट तिकिटात विमा संरक्षण प्रीमियम भरला आहे असा असतो.

Comments

Popular posts from this blog

Mukka Proteins Limited

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार