दिलदार प्रेमाची वजनदार गोष्ट : ‘सुंदरा मनामध्ये भरली’ कलर्स मराठीवर !

क्षणात मनामध्ये भरते ते रूप सहवासाने भरते ते स्वरुप... 
३१ ऑगस्टपासून सोम ते शनि रात्री ९.00 वा.

मुंबई २५ ऑगस्ट२०२० : प्रत्येक तरुण मुलीच्या हातात सिंड्रेलाचा आरसा असतो ज्यामध्ये तिचं रूप तिच्यासाठी सुंदरचं असतं... पण प्रश्न हा असतो की बघणारी व्यक्ती तुमच्याकडे कोणत्या दृष्टीने बघते... सुंदर दिसणं ही प्रत्येकाचीच स्वाभाविक भावना आहे... "मी कशाला आरशात पाहू गं...मीच माझ्या रूपाची राणी गं" हे गाणं आजही वयात आलेली मुलगी आरशासमोर उभी राहून गुणगुणते. परंतु आजच्या काळात सौंदर्याची व्याख्या जरा बदलेली दिसते. म्हणतात ना ‘क्षणात मनामध्ये भरते ते रूप सहवासाने भरते ते स्वरूप’ अगदी तसंच काहीसं ! नजरेमध्ये जे भरतं त्यालाच काही लोक सौंदर्य मानतात. जोडीदाराच्या बाबतीत त्यांच्या अशाच काहीशा अपेक्षा असतात. प्रत्येकच तरुणाला हवी आहे ती सुंदरझिरो फिगरशेलाट्या बांध्याची साथीदार... बाह्यरुपावर माणूस हुरळून जातो हा तर मनुष्य स्वभावचं... " ठेंगणी”,"सावळी, "थोडी जाडी" "स्थूल" अशी नावं ठेवत काही मुलींच्या पदरी नकार येतो. थोड्या स्थूल असणाऱ्या मुलीला 'नकारदेणारे तिच्या मनाचे सौंदर्यतिच्यातील इतर गुणांची दखल घेत नाहीत. अशाच एका लठ्ठ पण गोड मुलीची दमदार गोष्ट म्हणजेच ‘सुंदरा मनामध्ये भरली’.

        मधुगंधा कुलकर्णी यांनी लिहिलेल्या या कथेची निर्मिती स्ट्रॉबेरी पिक्चर्सने केली आहे. अक्षया नाईक लतिकाची भूमिका आणि समीर परांजपे अभिमन्यूची भूमिका साकारणार आहेत.  तेव्हा नक्की बघा ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ३१ ऑगस्टपासून पासून सोम ते शनि रात्री ९.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

        आपल्या सगळ्यांच्या घरात अशी एक व्यक्ती असते जिच्या असण्याने घराला घरपण येते. आपली 'लतिकादेखील अगदी अशीच आहे. उत्तम विनोदबुध्दीखेळकरशाळेपासून अभ्यासात प्रचंड हुशारउत्तम स्वयंपाक करते... इतकं सगळं असून देखील निव्वळ शरीराने लठ्ठ असल्याने लहानपणापासून लतिकाला समाजाकडून टोमणे ऐकावे लागतात आणि याच एकमेव कारणाने तिचे लग्न देखील अद्याप जमले नाही. ३४ स्थळांकडून आजवर तिला नकार आला आहे... सगळ्यांना आनंदी ठेवणारीसुख - दु:खात साथ देणार्‍या लतिकाने या गोष्टीचा स्वीकार केला आहे आणि याचा तिला फारसा फरकही पडत नाही... याउलट दिसायला देखणाअंगापिडानं मजबूतहुशारसगळ्यांच्या मदतीला धावून जाणारा असा आपला फिटनेस फ्रिक अभिमन्यू... स्वत: फिट असलेल्या अभिमन्यूला अख्ख्या गावाला 'फिटकरायचं आहे म्हणून त्याला स्वत:ची व्यायामशाळा उघडायची आहे... अभिमन्यूचं स्वप्न आणि लतिकाचं लग्न यामध्ये दोघांच्या नशिबात काय वाढून ठेवलं आहे लग्नाबद्दल या दोघांचीही मत वेगळी आहेत. त्यांची मनं कशी जुळतील हा प्रवास पाहणं रंजक असणार आहे.

मालिकेबद्दल बोलताना प्रमुख – मराठी टेलिव्हीजनवायाकॉम18 चे दीपक राजाध्यक्ष म्हणाले, " आजवर वैविध्यपूर्ण विषयांवरील मालिका आम्ही रसिक प्रेक्षकांच्या भेटीस आणल्या आहेत. या मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहेत. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही मालिका अतिशय नाजूक विषयावर आधारलेली असून या मालिकेद्वारे आम्ही लठ्ठपणाचा मुद्दा अत्यंत हळूवारपणे हाताळण्याचा प्रयत्न केला आहे...स्त्री-पुरुष समानतेच्या आधुनिक काळातही मुलींच्या वाट्याला बाह्यरूपामुळे नकार येतो. आम्हांला असं वाटतं या मालिकेमुळे लोकांचा सौंदर्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला सुरुवात होईल."

       पुढे ते म्हणाले, "आपल्यावर ओढवलेल्या संकटानंतर कलर्स मराठी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस एक वेगळ्या विषयावर आधारलेली मालिका घेऊन येत आहे. मालिकेद्वारे अक्षया नाईक आणि समीर परांजपे यांची नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अनुभवी कलाकारांचा संचअनोखी कथा यामुळे आम्ही आशा करतो की मालिका प्रेक्षकांना आवडेल”. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेच्या निमित्ताने प्राईमटाईम बँड वाढविण्यात आला आहे आणि 'सुंदरा' 'जगण्याचे रंग मराठीअधिक ठळक करेल अशी आम्हांला खात्री आहे”. 

    कथेच्या लेखिका मधुगंधा कुलकर्णी म्हणाल्या, “सौंदर्य बघणाऱ्याच्या नजरेत असतं म्हणतात.. पण तरी आपल्या समाजात सौंदर्याच्या कल्पनांची पाळंमुळं खोलवर रुजलेली आहेतच ! कमनीय बांधा याला पर्याय नाही...जाडी हा आपल्याकडे विनोदाचा विषय मानला जातो आणि जाडी माणसंही ! तिच्या जाडेपणापलीकडे असणारं तिचं आयुष्य आपण समाज म्हणून  बघू शकतो का ? " सुंदरा मनामध्ये भरली " ही अशाच एका समाजाने बेढब ठरवलेल्या संवेदशील मनाच्या मुलीची गोष्ट आहे. सौंदर्याच्या परिमाणात न बसणाऱ्या मुलीची आणि पुरुषी सौंदर्याच्या मोजमापात फिट्ट बसणाऱ्या देखण्या तरुणाची प्रेमकथा..बाह्य सौंदर्याच्या पुढे नेणारी..मनाच्या नात्याला मोठं करणारी प्रेमकथा म्हणजे ही मालिका’.

       मालिकेची निर्माती मनवा नाईक म्हणाली, ‘लॉकडाउनमुळे आलेली मरगळ दूर करण्याची संधी आम्हाला या’सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेमुळे मिळाली आहे या भावनेने संपूर्ण टीम प्रचंड काम करत आहे त्यामुळे एक नवा उत्साह आहे. मालिकेचा विषय खूप वेगळा आहे आणि त्याला आम्ही अतिशय साध्या सोप्या पध्दतीने मांडण्याचा प्रयत्न करत आहोत... कुठलाही नवा शो करताना टेंशन हे येतच पण या शोची मजा अशी आहे मालिकेचे संपूर्ण शूटिंग नाशिकला होणार आहे. इकडची भाषात्यांची बोलण्याची पध्दतहिरवगार शेत आणि विविध पदार्थांची रेलचेल यासगळ्यासोबत शूटिंगची देखील मजा घेतली जाते आहे... आमची ही नवीन मालिका रसिक प्रेक्षकांच्या मनात नक्की भरेल अशी अपेक्षा आहे”.

       नवीन जाणिवानवी संवेदना तरुण मुलीच्या मनात उमलतात. तारुण्याच्या श्रावणात जोडीदाराच्या कल्पनेचे इंद्रधनुष्य आकार घेतात. आपल्या लतिकेचे असेच आहे पणतिच्या मनाचं सौंदर्य तिच्या फिटनेसचं अतोनात वेड असलेल्या बालमित्राने कधीच पाहिलं नाही…  आपल्या समाजातील वेगळं भावविश्व दाखवणारीसुंदर असणं म्हणजे नक्की काय याचा पुन्हाएकदा विचार कारायला भाग पाडणारी सुंदरा म्हणजेच लतिका महाराष्ट्रातील प्रत्येक प्रेक्षकाच्या ‘मनामध्ये भरेल’ याची आम्हाला खात्री आहे. तेंव्हा आपण देखील लतिकाच्या प्रवासात सहभागी होऊया नक्की बघा ‘वजनदार मुलीचीदमदार कथा - सुंदरा मनामध्ये भरली’ ३१ ऑगस्टपासून पासून सोम ते शनि रात्री ९.00 वा. आपल्या कलर्स मराठीवर.

याच दिवसापासून 'सुखाच्या सरींनी हे मन बावरेही मालिका रात्री ९.३० वा. प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight