'मी गर्दीत जाणार नाही, कोरोनाला घरी आणणार नाही'

झी युवातर्फे दिला जातोय सामाजिक संदेश

सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरु झालीये पण यावर्षी या उत्साहावर कोरोनाचा प्रादुर्भावही ठळकपणे जाणवतोय. शासनातर्फे या वर्षीचा गणेशोत्सव हा भक्तीमय आणि साध्यापद्धतीने, कोरोना संदर्भातल्या सर्व खबरदारी पाळत साजरा करण्याचा आदेश जाहीर केला गेलाय. यात आता झी युवा वाहिनीही सामाजिक जबाबदारी म्हणून आपल्या कार्यक्रमांमधून या संदर्भातले संदेश देण्याचा उपक्रम राबवतेय.

झी युवा वाहिनीचे कलाकार त्यांच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रेक्षकांना सोशल डिस्टन्सिंगचे महत्व सांगताना दिसतायत. डॉक्टर डॉन, प्रेम पॉयजन पंगा, ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण अशा लोकप्रिय मालिकांमधले हे कलाकार प्रेक्षकांना गणेशोत्सवामध्ये गर्दी टाळण्याच्या, बाहेर न पडण्याच्या आणि घरातच राहण्याच्या सूचना करताना दिसतात. मी गर्दीत जाणार नाही कोरोनाला घरी आणणार नाही हा सामाजिक संदेश झी युवा आणि या कलाकारांतर्फे दिला जातोय.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Cityflo & Salaam Bombay Foundation

June Is Here, But Humidity Isn't Going Anywhere: Functional Fashion Brands Helping Indians Stay Comfortable