‘रौद्र’ चा हटके फंडा

  रौद्र’ चित्रपटासाठी प्रमोशनचा हटके फंडा

‘कोडी सोडवा आणि बक्षिस जिंका’!

एखाद्या नवीन चित्रपटाविषयी आपल्या मनात उत्सुकता कशी निर्माण होते त्याच कारण म्हणजे चित्रपटांचं प्रमोशन.. या न त्या रुपाने आपल्यासमोर सतत त्या चित्रपटाविषयी काही ना काही येत असल्याकारणाने देखील आपल्या मनात त्या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण होते. सध्या चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी ट्रेलर लाँचकलाकारांच्या मुलाखती या पद्धतीने तर प्रमोशन केलंच जातं मात्र चित्रपटाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या स्पर्धा घेत चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. एम.जी पिक्चर्स निर्मित अल्ट्रा मीडिया अॅन्ड एन्टरटेन्मेंट प्रा.लि’.कंपनी प्रस्तुत ‘रौद्र’ या मराठी चित्रपटासाठी ‘ट्रेझर हंट’ अनोख्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. अल्ट्रा मराठीच्या एफबी आणि इन्स्टा पेजवर ही स्पर्धा सुरु आहे. रौद्र हा रहस्यभेदावर आधारित चित्रपट असल्याने वेगवेगळी कोडी प्रेक्षकांसाठी देण्यात आली आहेत. या कोडयांची अचूक उत्तरे देणाऱ्या स्पर्धकांना भरघोस बक्षिसे जिंकण्याच्या संधीसोबत अल्ट्रा मराठीवर झळकण्याची संधी मिळणार आहे. रविंद्र शिवाजी लिखित-दिग्दर्शित रौद्र हा चित्रपट १ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटाची कथा रहस्यभेदाभोवती फिरते. एका पुरातन अमूल्य अशा गोष्टीच रहस्य जाणून घेण्यासाठी गावात आलेला नायक एका बखरीत असलेल्या वेगवेगळया कोडयांमार्फत रहस्याचा शोध घेत असतो. ही कोडी तो कशाप्रकारे उलगडणार? या कोडयातून त्याला काही गवसणार? की तो कोणत्या चक्रात अडकणार ? याची  रंजक पण थरारक कथा म्हणजे रौद्र हा चित्रपट. चित्रपटाच्या याच पार्श्वभूमीवर ‘कोडी सोडवा आणि बक्षिस जिंका’! ही स्पर्धा चालवली असून प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद या स्पर्धेला मिळतोय.

राहुल पाटील आणि उर्मिला जगताप ही नवी फ्रेश जोडी रौद्र या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. त्यांच्यासोबत  दीपक दामलेअनिता कोकणेअमित पडवणकर ,ईशान गटकळ आदि कलाकारांच्या चित्रपटात भूमिका आहेत.  चित्रपटाची कथा मंगेश बाळासाहेब गटकळ यांची असून पटकथा आणि संवाद रविंद्र शिवाजी यांचे आहेत. मंगेश बाळासाहेब गटकळ या चित्रपटाचे निर्माते तर सहनिर्माते समीर किसन गाडे आहेत. हर्षद गोलेसरवैष्णवी अडोदेशुभांगी केदारशिरीष पवार या गायकांनी यातील गाणी गायली आहेत. संगीताची जबाबदारी अक्षय जाधव यांनी सांभाळली आहे. छायांकन स्वप्निल केदारे आणि संकलन आकाश मोरे यांचे आहे.

१ एप्रिलला रौद्र सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Instagram - https://instagram.com/ultramarathi?utm_medium=copy_link

Facebook - https://www.facebook.com/UltraMarathi/

Comments

Popular posts from this blog

Mukka Proteins Limited

भोईवाडा,परळ येथे श्री स्वामी समर्थ यांच्या पादुका पालखी सोहळा उत्साहात संपन्न

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार