नवीन सामान्य जीवनमार्गाच्या (न्यू नॉर्मल) दिशेने आपली पुन्हा वाटचाल सुरु झाली असल्याचे इकॉनॉमिक टाइम्स ग्लोबल बिझनेस समिट २०२२ मध्ये सहभागी तज्ज्ञांचे मत

जीबीएस २०२२ चा समारोप होताना जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारीमतप्रवाह निर्माते आणि शासकीय पातळीवरील नेत्यांनी साथीच्या रोगानंतरच्या आणि वेगाने विकसित होत असलेला प्रादेशिक भागतसेच राजकीय गणितअर्थव्यवस्थेतील व्यत्यय आणि नवीन सामान्यतेचा मार्गभविष्यासाठी टिकाऊपणाउत्तम प्रशासन आणि तंत्रज्ञानाच्या नेतृत्वाखालील नवकल्पनांच्या दिशेने एक वेगवान वाटचाल अशा विविध महत्वपूर्ण मुद्द्यांवर आपले अनुभव आणि मतप्रवाह मांडून उपस्थितांना मार्गदर्शन केले.

 

 मार्च २०२२: जग सध्या एका मोठ्या तंत्रज्ञान परिवर्तनाच्या उंबरठ्यावर उभे आहेआणि वैविध्यपूर्ण सकारात्मक नवकल्पनांमुळे नवीन सामान्य जीवनमार्गाच्या (न्यू नॉर्मल) दिशेने आपली वेगाने वाटचाल सुरु झालेली आहेज्याचा जुन्या अर्थव्यवस्थेच्या वारसा व्यवसायांवर तसेच चमकदार प्रखर कामगिरी करणाऱ्या स्टार्टअप्सवरही लक्षणीय परिणाम दिसून येणार आहे.

१२ मार्च रोजी संपलेली ही शिखर परिषद म्हणजे द टाइम्स समूहाच्या वार्षिक कॅलेंडरमधील सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम मानली जातेया दोन दिवसीय जागतिक शिखर परिषदेची  हीच मध्यवर्ती संकल्पना होती.

यंदाच्या वर्षीच्या चर्चेची मध्यवर्ती संकल्पना 'द ग्रेट रिसर्जेन्स: नाऊनेक्स्ट अँड बियॉन्डयावर केंद्रित ठेवण्यात आलेली होती. यामध्ये महामारीनंतरचे आणि वेगाने विकसित होणारे भौगोलिक-राजकीय गणितअर्थव्यवस्थांसमोरील अडचणी आणि नवीन सामान्य जीवनमार्गाचा (न्यू नॉर्मल) समावेश होता. त्याखेरीज भविष्यासाठी शाश्वतता मिळवणेउत्तम प्रशासन निर्माण करणे आणि तंत्रज्ञानाच्या नेतृत्वाखालील नवकल्पनांच्या दिशेने एक वेगवान वाटचाल करणे यांच्यावरील उहापोह देखील या संकल्पनेद्वारे करण्यात आला.

 

या निमित्ताने बोलताना बेनेट कोलमन कंपनी लिमिटेड (बीसीसीएल) चे व्यवस्थापकीय संचालक विनीत जैन म्हणाले, १८४ वर्षे जुन्या टाइम्स ग्रुपमध्ये आमची अशी ठाम धारणा आहेकी आपण सर्वजण एकत्र येऊन प्रत्येक संकटाला एक वेगळे आणि चांगले भविष्य घडवण्याची संधी म्हणून सहजपणे स्वीकारू शकतो.

 

या परिषदेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध प्रख्यात व्यक्तींनी देशाच्या भवितव्यासाठीच्या कल्पना आणि कृतींबाबत चर्चा केली. जीबीएस  २०२२ ची यंदा सातवी आवृत्ती होती. दरवर्षी भरणारी ही शिखर परिषद म्हणजे एक अशा प्रकारचा अनोखा मेळावा असतोजो वर्तमान यश साजरे करतो आणि त्याचवेळी उज्ज्वल भविष्याची अपेक्षा देखील करतो. वर्ष २०१५ मध्ये स्थापन झाल्यापासूनजीबीएस हे जागतिक विचारांच्या नेत्यांसाठी दक्षिण आशियातील प्रमुख बैठकीचे ठिकाण म्हणून उदयास आले आहे.

 

 

बातम्या आणि चालू घडामोडींच्या जगात हे सर्वात अपेक्षित विचारमंथन सत्र आहे. जागतिक स्तरावरील वृद्धीसाठी भारत ही सर्वात मजबूत यंत्रणा (इंजिन) म्हणून कशी अग्रेसरपणे कार्यरत आहेयाचे प्रतिक म्हणजे ही परिषद आहेअसे मानले जाते.

 

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री श्री पीयूष गोयल यांनी एफटीएच्या माध्यमातून समृद्धी प्राप्त करण्यासाठीचा आपला दृष्टीकोन अधिक सक्षम करण्याची आवश्यकता” या विषयाबाबत आपले गहन सखोल विचार यावेळी मांडले. वॉलमार्ट इंकचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डग मॅकमिलन यांनी नवीन सामान्य स्थितीशी (न्यू नॉर्मल) कशाप्रकारे जुळवून घ्यायला हवे” याबाबत आपले मत सांगितलेतर डेलॉइटचे जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी पुनित रेन्जन यांनी भारताचे वचन धोरण आणि क्षमता” बद्दल आपले विचार या परिषदेत मांडले.

 

ब्रुकफील्ड अॅसेट मॅनेजमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रूस फ्लॅट श्री. फ्लॅट यांनी खासगी भांडवल: प्लेबुकमधील बदल कसे घडून आले आहेत” या विषयाबद्दल कल्पना दिलीव्हिसा इंकचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आल्फ्रेड आर केली ज्युनियर यांनी भविष्यकालीन पैसा” (फ्यूचर ऑफ मनी) बद्दल आपले विचार मांडले. स्नॅप इंकचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक इव्हान स्पीगल यांनी वृद्धीतील परिवर्तन: माहिती पासून वाणिज्यपर्यंत (चेजिंग ग्रोथ: फ्रॉम कंटेंट टू कॉमर्स) या विषयावर माहिती दिलीतर नेटफ्लिक्सचे सह- मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्य सामग्री अधिकारी टेड सारँडोस यांनी नवीन मनोरंजन अजेंडा सेट करणे” या विषयाबाबत सांगितले. अपग्रॅड डॉट कॉमचे अध्यक्ष आणि सह- संस्थापक रॉनी स्क्रूवाला यांनी तंत्रशिक्षण: पुनरुत्पादित उद्देश (एडटेक:रीपर्पजिंग द पर्पज) या विषयाबाबत आपले विचार या परिषदेत मांडले.

 

ओएनजीसीच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अलका मित्तलसेल्सफोर्स इंडियाच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अरुंधती भट्टाचार्यगोदरेज आणि बॉयसचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक जमशेद एन गोदरेजहिरो इलेक्ट्रिकचे व्यवस्थापकीय संचालक नवीन मुंजालअपोलो हॉस्पिटलच्या व्यवस्थापकीय संचालक सुनीता रेड्डीबुकिंग होल्डिंग्सचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ग्लेन फोगेल यांनी या परिषदेमध्ये “शाश्वत व्यवसायाची निर्मिती” या विषयामधील नवीन कल्पना आणि मर्यादा याबाबत चर्चा केलीतर बुकिंग होल्डिंग्सचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ग्लेन फोगेल यांनी पर्यटन व्यवसाय: धक्क्यापासून पुनरुत्थानापर्यंत (ट्रॅव्हल इंडस्ट्री-फ्रॉम शॉक टू सर्ज) याबाबत आपले अनुभव आणि विचार मांडले.

बायर एजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्नर बाउमन यांनी “ईएसजी: द नेक्स्ट बिग लीप” या विषयावर माहिती दिलीस्टँडर्ड चार्टर्ड पीएलसीचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी बिल विंटर्स यांनी आधुनिक वित्तपुरवठ्याची फेररचना (रीइमेजिनिंग मॉडर्न फायनान्स) या विषयावर माहिती दिली;  सॉफ्टबँक व्हिजन फंडचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव मिश्रा यांनी भारतीय दिग्गज व्यावसायिक: नवीन भव्य टप्पा की नुसताच की बुडबुडा?” (इंडियन युनिकॉर्न्स: नेक्स्ट बिग थिंग ऑर नेक्स्ट बबल?) या बाबत विचार मांडलेएतिहाद एव्हिएशन ग्रुपचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी टोनी डग्लस यांनी विमान परीवहनातील शून्य स्थिती: हे एक दूरगामी वास्तव आहे का? (नेट झिरो एव्हिएशन: इज इट ए डिस्टंट रिअ‍ॅलिटी) या बद्दल चर्चा केलीसंयुक्त अरब अमिरातीचे परराष्ट्र व्यापार राज्यमंत्री डॉ. थानी बिन अहमद अल झेउदी हे यावेळी “नवीन आर्थिक पुढाकार तयार करण्यासाठी तंत्रज्ञानाचा लाभ आणि अत्याधुनिक नवकल्पना” बद्दल बोललेआणि हिंदुजा ग्रुपचे सह-अध्यक्ष गोपीचंद पी हिंदुजा यांनी “भारतात गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे का?” या बाबत आपले विचार मांडले.

 

परिषदेच्या दुसऱ्या दिवशी भारताच्या परराष्ट्र व्यवहार आणि सांस्कृतिक राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनी “भारत आणि महान शक्ती” या विषयावर प्रास्तविक भाषण करून परिषदेच्या कामकाजाला सुरुवात करून दिली.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री. नितीन जयराम गडकरी यांनी या शिखर परिषदेच्या समारोपाचे भाषण केलेत्यावेळी त्यांनी विकासाच्या सकारात्मक बहुआयामी परिणामांवरविशेषतः पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांवर सरकार कसे लक्ष केंद्रित करत आहे, याबाबत आपले विचार मांडले.


 परिषदेच्या दुसऱ्या दिवशी भारताच्या परराष्ट्र व्यवहार आणि सांस्कृतिक राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनी “भारत आणि महान शक्ती” या विषयावर प्रास्तविक भाषण करून परिषदेच्या कामकाजाला सुरुवात करून दिली.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री. नितीन जयराम गडकरी यांनी या शिखर परिषदेच्या समारोपाचे भाषण केलेत्यावेळी त्यांनी विकासाच्या सकारात्मक बहुआयामी परिणामांवरविशेषतः पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांवर सरकार कसे लक्ष केंद्रित करत आहे, याबाबत आपले विचार मांडले.

 

अडोबचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू नारायण यांनी ‘डिजिटल क्रांतीला आकार देताना’ (शेपिंग  डिजिटल रिव्होल्यूशन) या विषयावर माहिती दिलीतर एअर बीएनबचे सह-संस्थापकमुख्य रणनीती अधिकारी नॅथन ब्लेचार्क्झिक यांनी ‘फेरसुधारणेच्या लाटेवर स्वार होताना’ (राइडिंग  रिकव्हरी वेव्ह) या विषयावर आपले विचार मांडले, रोल्स रॉइसचे मुख्य कार्यकारी अधिकारी वॉरेन ईस्ट सीबीई हे यावेळी ‘संवेदनशील आणि शाश्वत भवितव्य घडविण्याच्या दिशेने वाटचाल करताना’ (टूवर्ड्स रेझिलिएंट अँड सस्टेनेबल फ्युचर) या विषयावर बोलले. तर जनरल अटलांटिकचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी बिल फोर्ड यांनी ‘खाजगी इक्विटीजोखीम आणि संधी या विषयावर मार्गदर्शन केले.

 

कॅपजेमिनी इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विन यार्दी यांनी यावेळी (भविष्यकालीन व्यावसायिक आवाका: नव्या गुणवत्तेसह नवीन युग’ या विषयावर आपले विचार मांडले.  डब्ल्यूपीपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क रीड हे ‘अधिक चांगला भविष्यकाळ घडविणे’ या विषयावर बोललेबीसीजीचे जागतिक अध्यक्ष रिच लेसर यांनी खंडित कामगिरीच्या सामोरे जाताना अंगीकारायचे धोरण (स्ट्रॅटेजी इन द फेस ऑफ डिसकॉन्टिन्युटी’ या विषयावर मार्गदर्शन केलेमायक्रोसॉफ्ट इंडियाचे अध्यक्ष अनंत माहेश्वरी आणि किंड्रिल इंडियाचे अध्यक्ष लिंगराजू सावकर  यांनी “वाढीसाठी भागीदारी” या विषयाची सखोल माहिती दिली.

 

मित्सुबिशी युएफजे फायनान्शियल ग्रुप (MUFG) च्या संचालक मंडळाचे सदस्य आणि अध्यक्ष आणि समूह मुख्य कार्यकारी अधिकारी हिरोनोरी कमेझावा यांनी ‘आशियाच्या डिजिटल परिवर्तनाला अधिक सक्षम बनवण्याबाबत आपला दृष्टीकोन यावेळी सादर केलाडीबीएस बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीयूष गुप्ता यांनी “राइडिंग द डिस्प्रक्शन वेव्ह” या विषयावर आपले विचार मांडले. सीएसएलचे व्यवस्थापकीय संचालक पॉल पेरॉल्ट यांनी “बायोटेक अदर वेव्ह ऑर लो टाइड” या विषयाच्या अनुषंगाने भविष्यकाळ कसा असेलया बाबतची एक झलक दिलीआणि कुकॉईन (KuCoin) चे सह-संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी जॉनी ल्यु यांनी क्रिप्टो चलन: भविष्यकालीन वित्त व्यवस्था की नुसताच धोखा (“क्रिप्टो: द फ्यूचर ऑफ फायनान्स ऑर फॅड?”) या विषयावर विचार व्यक्त केले.

 

किंड्रिल (Kyndryl) ने या शिखर परिषदेचा सादरकर्ता भागीदार म्हणून काम पहिले. केपजेमिनीद्वारे (Capgemini) ही  शिखर परिषद प्रायोजित (पॉवर्ड बाय) करण्यात आली होतीतर जीएफके (GfK) यांनी इंटेलिजन्स पार्टनर म्हणून भूमिका निभावली. समुन्नती (Samunnati) आणि पॅक्सफॉल (Paxfaul) यांनी परिषदेचे सहयोगी भागीदार म्हणून काम पहिले. ईटी एज इनसाईट्स (ET Edge Insights) हे या शिखर परिषदेचे नॉलेज पार्टनर होतेतर ईटी एज अनवायर्ड (ET Edge Unwired) यांच्यातर्फे ही शिखर परिषद सादर करण्यात आली होती.

Comments

Popular posts from this blog

Mukka Proteins Limited

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार