रेल्वे पोलीस मित्र
रेल्वे पोलीस मित्र यांच्याकडून महिला दिन साजरा
जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने. .. आज पोलीस मित्र वसई यांच्या वतीने वसई रोड रेल्वे पोलीस ठाणे येथे कार्यरत असणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. पोलीस महिला या नेहमीच सर्व ठिकाणी तत्पर असता. घर असो वा कामाची वास्तू त्या सर्व ठिकाणी आज आघाडीवर काम करत असतात . कोरोना असो वा रोजचं कामकाज, महिला पोलिस नेहमी महत्त्वाची भूमिका बजावतात.त्यामुळे पोलिस मित्र ह्यांनी त्यांच्या सन्मान करायचा उपक्रम केला. वसई पोलीस मित्रांच्या वतीने पोलीस स्टेशनमधील ३५ पोलिस महिलांना भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले.
त्याच सोबत वसई रेल्वे पोलिस स्टेशन मधील सदैव तत्पर असलेले होमगार्ड श्री. आशिष गुप्ता आणि त्यांचे सहकारी श्री. गायकवाड ह्यांनी एका अज्ञात व्यक्ती चा जीव वाचवून त्याला त्याच्या कुटुंबच स्वाधीन करून कुटुंबाची हनी टाळली ह्या बद्दल त्यांचे विशेष सन्मान करण्यात आला .
कार्यक्रमास वसई रोड रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन इंगवले, वसई मित्र. उस्टेज सिक्वेरिया ,सौ गीता गायकवाड ,मनीषा वाघ,तेजनदर राईत, संगीता सरढाना, हजर होते
Comments
Post a Comment