शिकाऊ उमेदवारांसाठी येणार चांगले दिवस – ७२% नियुक्ती करणाऱ्या कंपन्या अधिकाधिक नेमणुका करण्याच्या विचारांत: टीमलीजची माहिती

·         २०२१ च्या दुसऱ्या सहामाहीच्या तुलनेत सध्याच्या सहामाहीत ८ नी वाढ

·         चेन्नई आणि अहमदाबाद शिकाऊ उमेदवारांच्या नियुक्तीसाठी आघाडीवर. या दोन्ही ठिकाणी अनुक्रमे ७५आणि ७२नियुक्ती करणाऱ्या कंपन्या अधिकाधिक नेमणुका करण्यासाठी इच्छुक

राष्ट्रीय१४ मार्च २०२२टीमलीज स्किल्स युनिव्हर्सिटी कडून होणाऱ्या भारतातील सर्वात मोठा पदवी प्रशिक्षण-उमेदवारी कार्यक्रम NETAP  (नॅशनल एम्प्लॉयबिलिटी थ्रू ॲप्रेन्टसशिप प्रोग्रॅम) मध्ये सहामाहीसाठी (जानेवारी ते जून २०२२) ॲप्रेन्टसशिप आउटलुक अहवालाची नवीनतम आवृत्ती सादर करण्यात आली आहे. सर्व क्षेत्रे आणि प्रदेशांमधील शिकाऊ उमेदवारांच्या नियुक्तीच्या प्रवाहाचे सखोल विश्लेषण करणाऱ्या या अहवालात ठळकपणे दर्शविण्यात आले आहे की ७२% मालक कंपन्या या सहामाहीत त्यांची शिकाऊ उमेदवारांची नियुक्ती वाढवण्यास उत्सुक आहेत. सध्याच्या अर्ध वर्षासाठी निव्वळ अप्रेंटिसशिप आउटलुक (NAO) ५६%नी वाढला असून मागील सहामाहीच्या तुलनेत त्यात ११% वाढ आहे.

 

प्रशिक्षणार्थी उमेदवारांसाठी सकारात्मक भावना सर्व क्षेत्रांमध्ये आहे. या अहवालात सर्वेक्षण केलेल्या १८ क्षेत्रांपैकी१० क्षेत्रातील मालक कंपन्या अधिकाधिक शिकाऊ उमेदवारांची नियुक्ती करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन बाळगतात. अभियांत्रिकी (८२%), ऑटोमोबाईल्स आणि सहायक (७४%), आणि रिटेल (७०%) त्यात आघाडीवर आहे.

 

काही क्षेत्रांसाठी निव्वळ उमेदवारीचा दृष्टीकोन देखील सुधारला आहे. सर्व क्षेत्रांमध्ये सर्वात लक्षणीय सहामाही ते सहामाही NAO वाढ वाहन आणि कृषी या क्षेत्रात (अनुक्रमे १६आणि १५%) झाली आहे.  त्यानंतर दूरसंचार आणि बीएफएसआय (प्रत्येकी १४% सहामाही ते सहामाही वाढ)ही क्षेत्रे आहेत. याव्यतिरिक्त इतर क्षेत्रांसाठी NAO अभियांत्रिकी: ८२%, वाहन आणि अनुषंगिक: ७४%, किरकोळ: ७०आहे.

 

उद्योग आणि अहवालातील निष्कर्षांबद्दल आपले मत व्यक्त करताना टीमलीज स्किल युनिव्हर्सिटीचे NETAP चे उपाध्यक्ष श्री सुमित कुमार म्हणाले, "जेव्हा भारतात उमेदवारी अंगीकारण्याचा विचार येतो तेव्हा त्यासाठी गेली पाच वर्षे खूप महत्वाची आणि फायद्याची ठरली आहेत. जागरुकता आणि उमेदवारी प्रशिक्षण व्यवस्थेतील सुधारणांमुळे नियुक्ती करणाऱ्यांच्या भावना कमालीच्या सुधारल्या आहेत. अधिकाधिक नियुक्ती करणाऱ्या कंपन्या पुढे येत अधिकाधिक प्रशिक्षणार्थीं उमेदवारांना सहभागी करून घेत आहेत. अहवालातील निष्कर्ष असा आहे की या आर्थिक वर्षात ७२% मालक कंपन्या अधिकाधिक उमेदवारांच्या नेमणुका करण्यासाठी इच्छुक आहेत. हा अंगीकार वाढत असल्याचे हे निदर्शक आहे. ही  सकारात्मकता केवळ नियुक्ती करणाऱ्या संस्थांपुरती मर्यादित नाही तर अधिकाधिक इच्छुक उमेदवारसुद्धा आता औपचारिक नोकरीत प्रवेश करण्यासाठी एक फायदेशीर पद्धत म्हणून उमेदवारी प्रशिक्षणाकडे पाहतात. उमेदवारीची गुणवत्ता त्यांना पैसे मिळवून देण्याबरोबरच चांगले प्रशिक्षणही देईल हे त्यांना आता समजले आहे. त्यातून त्यांना आवश्यक अनुभव मिळतो आणि त्यांची कारकीर्द घडवण्याच्या संधी वाढतात."

 

"तथापिभारतातील शिकाऊ उमेदवारांना त्यांच्या खऱ्या क्षमतेनुसार वाढवण्यासाठीउमेदवारी प्रशिक्षण कार्यक्रमांचा जलद अंगीकार आणि अंमलबजावणीसाठी एक चौकट तयार करणे महत्त्वाचे आहे. नवीन शैक्षणिक धोरणाने याचा पाया आधीच घातला आहे. आम्‍हाला एनईपीचा वेगवान मागोवा घेण्‍याची आवश्‍यकता आहे आणि नियुक्ती करणाऱ्या संस्था आणि शिक्षणतज्ञांची उमेदवारी प्रशिक्षणाचा अवलंब करण्‍यासाठी चांगली तयारी आहे याची खात्री करणे आवश्‍यक आहे. शिक्षणउद्योग आणि तरुणाई यांच्यातील त्रिपक्षीय संबंध या कार्यक्रमांना चालना देण्यासाठी खूप मदत करतील. यूजीसी द्वारे नुकतेच सादर केलेले पदवी धारित कार्यक्रम हे शिक्षणात बदल करणारे असून तरुणांच्या रोजगारक्षमतेला चालना देतील, कौशल्याधिष्टीत प्रश्न सोडवतील आणि एकूण नोंदणी उद्दिष्ट साध्य करतील. आमच्याकडे १० वर्षांत १० दशलक्ष शिकाऊ उमेदवारांपर्यंत पोहोचण्याची क्षमता आहे. त्यासाठी प्रशिक्षणार्थी प्रणालीचा अविभाज्य भाग म्हणून विद्यापीठात आवश्यक गोष्टींचा अंतर्भाव व्हायला हवा. पदवी प्रशिक्षणार्थी उमेदवारीसाठी सर्व विद्यापीठांना मिश्र शिक्षण पद्धती (नोकरीसह ऑनलाइन आणि ऑन-साइट) सादर करण्याची परवानगी हवी," असेही श्री कुमार म्हणाले.

 

शिकाऊ उमेदवारांची नियुक्ती करणार्‍या प्रदेशांमध्ये खोलवर जाऊन पाहिल्यास अहवालात असे दिसून आले आहे की चेन्नईत्यानंतर अहमदाबाद आणि दिल्ली हे सर्वोच्च क्षेत्र आहेत जेथे अनुक्रमे ७५%७२% आणि ७०% नियुक्ती करणाऱ्या कंपन्या अधिकाधिक शिकाऊ उमेदवारांची नियुक्ती करण्याची योजना आखत आहेत. निव्वळ उमेदवारी दृष्टीकोनातूनचेन्नई ७५% (१०% वाढ)अहमदाबाद ७२% (% वाढ) आणि दिल्ली ७०% (१२% वाढ) यावर आहे.

 

मागील वर्षाशी सुसंगत ट्रेड अप्रेंटिसची नियुक्ती करण्याचा कल पदवीधर आणि पदवीधर शिकाऊ उमेदवारांपेक्षा जास्त आहे. प्रोफाइल/भूमिकांच्या दृष्टिकोनातूनवेगवेगळ्या विभागांमध्ये आघाडीचे  प्रोफाइल (आणि त्यांचा निव्वळ अप्रेंटिसशिप दृष्टीकोन) मध्ये डेटा ॲनालिटिक्स एक्झिक्युटिव्ह (२३%पदवीपूर्व उमेदवारी)प्रोडक्शन अप्रेंटिस (२०% ट्रेड अप्रेंटिस अंतर्गत) आणि मेंटेनन्स टेक्निशियन- इलेक्ट्रिकल (२०%नियुक्त ट्रेड अप्रेंटिस अंतर्गत)यांचा समावेश होता.

 

अप्रेंटिसशिप आउटलुक रिपोर्ट हे एक तपशीलवार सर्वेक्षण असून त्यामध्ये १४ शहरे आणि १८ आघाडीच्या क्षेत्रांचा समावेश आहे. अहवालात ८७१ मालक कंपन्यांचे सर्वेक्षण केले आहे आणि सहामाही (जानेवारी ते जून) २०२२ या कालावधीसाठी नियुक्तीविषयक बाबींचा अंतर्भाव केला आहे.

***

अहवालातील प्रमुख निष्कर्ष

·         सध्याच्या अर्ध वर्षासाठी (जानेवारी ते जून-२०२२)या काळात निव्वळ अप्रेंटिसशिप आउटलुक (NAO) ५६%नी वाढला असून मागील सहामाहीच्या तुलनेत त्यात ११% वाढ आहे.

·         सध्याच्या सहामाही दरम्यान ७२% नियुक्तीदार त्यांच्या प्रशिक्षणार्थी उमेदवारांची नियुक्ती वाढवण्याची शक्यता आहे. हे प्रमाण मागील सहामाहीच्या ६४% आणि जानेवारी - जून २०२१ मधील ५८%  वरून वाढले आहे

·         उत्पादन उद्योगातील अग्रणी तीन क्षेत्रे

-    अभियांत्रिकी ८२%

-    वाहन आणि अनुषंगिक – ७४%

-    एफएमसीजी आणि डी- ५९%

·         सेवा क्षेत्रातील अग्रणी तीन क्षेत्रे

-    रिटेल – ७०%

-    लॉजीस्टीक्स- ६४%

-    बीएफएसआय – ६३%

·         सर्वाधिक NAO असलेली मेट्रोची अग्रणी ३  शहरे

-    चेन्नई- ७५%

-    दिल्ली-70%

-    बंगळूरू - 62%

·         सर्वाधिक NAO असलेली नॉन मेट्रोची अग्रणी ३  शहरे

- अहमदाबाद- ७२%

- कोची – ५०%

- लखनौ – ४७%

·         शिकाऊ उमेदवारांची अग्रणी श्रेणी

 ट्रेड अप्रेंटिस- ८०%

 पर्यायी व्यापार-६९%

 नियुक्त व्यापार-६४%

·         अग्रणी ३ पसंतीची कौशल्ये

 तांत्रिक ज्ञान

 शिकण्याची इच्छा

 रिमोट / हायब्रीड वर्क

·         सध्याच्या सहामाहीत (जानेवारी - जून २०२२) नियुक्तीमधील प्रमुख आव्हान: सर्वेक्षण केलेल्या ३०% नियुक्तीदारांनुसार  नोकरी शोधणारे प्रशिक्षणार्थी उमेदवारीपेक्षा रोजगाराला प्राधान्य देतात. मागील सहामाहीभरपाई संबंधित समस्या (२६%).

·         डेटा ॲनालिटिक्स एक्झिक्युटिव्ह (२३%पदवीपूर्व उमेदवारी अंतर्गत)प्रोडक्शन अप्रेंटिस (२०% ट्रेड अप्रेंटिस अंतर्गत) आणि मेंटेनन्स टेक्निशियन- इलेक्ट्रिकल (२०%नियुक्त ट्रेड अप्रेंटिस अंतर्गत) हे सध्याच्या सहामाही साठी सर्वाधिक मागणी असलेले जॉब प्रोफाईल आहेत.

·         नियुक्त उमेदवारांच्या उत्पादकतेबद्दल नियुक्तीदारांची धारणा

अनुत्पादक – १८%

बऱ्यापैकी उत्पादनक्षम – ५५%

खूप उत्पादक – २७%

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight