‘वर्ल्ड थिएटर डे’ साजरा करण्यासाठी मुंबईतील नाट्यक्षेत्रातील दिग्गजांना एनसीपीए एकत्र आणत आहे
- नाट्यक्षेत्रातील दिग्गजांचा ‘गाला’ परफॉर्मन्स हा ह्या दिवसाचे ठळक वैशिष्ट्य असेल. त्यात पुढील कलाकारांचा समावेश असेलः सुमीत व्यास, अनुवब पाल, कुणाल रॉय कपूर, झफर कराचीवाला, जिम सर्भ, प्रिया मलिक, युकी एलिआस, फेजे जलाली, सृष्टी श्रीवास्तव, सुनिल शानभाग, सावित्री मेधातुल, आकांक्षा कदम आणि असेच अनेक कलाकार ~
ह्या गाला सोहळ्यातून जमा झालेली रक्कम नाट्यक्षेत्रात काम करत असलेल्या युवा कलाकारांच्या शिक्षणासाठी खर्च करण्यात येतील.
मुंबईः ह्या वर्ल्ड थिएटर डे निमित्त नॅशनल सेंटर फॉर दि परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए) हे वैभवशाली कला प्रकार साजरा करण्यासाठी खास निर्माण करण्यात आलेले उत्तमोत्तम परफॉर्मन्सेसचे लाईन अप आणि कार्यशाळा प्रस्तुत करत आहेत. थिएटर प्रेमींसाठी खास डिजाईन करण्यात आलेल्या संपूर्णपणे विनामूल्य आणि रोमांचक कार्यशाळेसह दिवसाची सुरूवात होईल. नॅशनल थिएटर लाईव्ह (लंडन) सोबत एनसीपीएच्या सहकार्याचा भाग म्हणून ह्या खास दिनासाठी अगदी सुयोग्य अशा पुरस्कार–प्राप्त कलाकारांचा समावेश असलेल्या शेक्सपियरच्या रोमिओ ॲन्ड ज्युलिएटच्या बोल्ड नवीन आवृत्तीचे स्क्रीनिंग करण्यात येणार आहे. ह्या दिनाची सांगता मुंबईच्या नाट्यक्षेत्रातील दिग्गजांनी खास साकारलेल्या ‘गाला’ परफॉर्मन्सने होईल. ह्या गाला सोहळ्यातून जमा झालेली रक्कम युवा थिएटर ग्रुप्सच्या समर्थनार्थ खर्च करण्यात येतील.
ह्या उत्तम लाईन–अपबद्दल विस्तृतपणे सांगताना दि नॅशनल सेंटर फॉर दि परफॉर्मिंग आर्ट्सच्या थिएटर आणि फिल्मचे प्रमुख ब्रुस गथरी म्हणाले, “वर्ल्ड थिएटर डे आता तीन वर्षांनंतर साजरा करण्याची संधी आम्हांला मिळत आहे. आमच्या थिएटर्समध्ये योगदान देत असलेल्या मुंबईतील काही उत्तमोत्तम कलाकारांचे स्वागत एनसीपीए करू शकत आहे ह्या गोष्टीचा आम्हांला आनंद वाटतो. क्यूटीपी (QTP) आणि सिली पॉईंट यांच्यातर्फे मोफत कार्यशाळा, शेक्सपियरच्या रोमिओ आणि ज्युलिएटचे एनटी (NT) लाईव्ह स्क्रीनिंग आणि आमचा खास गाला परफॉर्मन्स यांसह थिएटर प्रेमींसाठी हा एक व्यस्त दिवस असेल. आम्हांला आशा आहे की ह्या खास दिवशी ह्या शहरातील लोक आमच्यासोबत
असतील. ह्या दिवशी जमा झालेली रक्कम महामारीनंतर पुन्हा एकदा आपल्या पायांवर उभे राहण्यासाठी ग्रुप्सच्या समर्थनार्थ खर्च करण्यात येतील.”
27 मार्च रोजी सिली पॉईंट प्रॉडक्शन्सतर्फे दि एसपीआयटी (SPIT) थिअरी आणि कासार ठाकोर पदमसी यांचे दि ॲक्टर ॲज डिटेक्टिव्ह ह्या कार्यशाळांचे आयोजन केले जाईल. दि एसपीआयटी थिअरीमध्ये थिएटरचे बेसिक्स शिकवण्यात येतील आणि मग मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला जाईल. दुसरे वर्कशॉप दि ॲक्टर ॲज डिटेक्टिव्ह यात सहभागी होणाऱ्यांना लिखाणाच्या भागाचे विश्लेषण करून ते समजून घेण्यासाठीचे तंत्र शिकवेल, त्यामुळे मग शब्दांना अखेर अर्थपूर्ण आणि योग्य आवाज मिळू शकतो.
दिवसाच्या उत्तरार्धात एनसीपीए–नॅशनल थिएटर लाईव्ह (लंडन): रोमिओ ॲन्ड ज्युलिएट बाय विलियम शेक्सपियरचे स्क्रीनिंग केले जाईल. त्यात जेसी बकली (वाईल्ड रोझ, ज्यूडी) आणि जोश ओ’कॉनर (दि क्राऊन, गॉड्स ओन कंट्री) यांचा समावेश असेल.
मुंबईमधील थिएटर दिग्गजांचा ‘गाला’ परफॉर्मन्स हा ह्या
दिवसातील सर्वाधिक प्रतीक्षेतील सोहळा आणि ह्या दिवसाचे ठळक वैशिष्ट्यही असेल. त्यात पुढील कलाकारांचा समावेश असेलः सुमीत व्यास, अनुवब पाल, कुणाल रॉय कपूर, झफर कराचीवाला, जिम सर्भ, प्रिया मलिक, युकी एलिआस, फेजे जलाली, सृष्टी श्रीवास्तव, सुनिल शानभाग, सावित्री मेधातुल, आकांक्षा कदम आणि असेच अनेक कलाकार.
ह्या आकर्षक लाईन–अपसह आपल्या नाट्यगृहाचा पडदा उघडत थिएटर प्रेमी प्रेक्षकांचे स्वागत करण्यासाठी एनसीपीए सज्ज आहे.
Comments
Post a Comment