श्रीवल्ली नंतर आता छोटा पडदा गाजवणार महाराष्ट्राची पुष्पवल्ली

झी मराठीवरील 'तू तेव्हा तशी' या आगामी मालिकेची प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरु आहे. या मालिकेची पहिली झलक पाहिल्यापासूनच प्रेक्षकांची मालिकेबद्दलची उत्सुकता वाढली आहे. हि मालिका २० मार्च पासून रात्री ८ वाजता प्रसारित होणार असून स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर हि जोडी पहिल्यांदाच या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेत प्रेक्षकांचा अजून एक आवडता चेहरा एका महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्री अभिज्ञा भावे हि टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक वेगवेगळ्या भूमिकांमधून अभिज्ञाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. तू तेव्हा तशी या मालिकेतून देखील अभिज्ञा छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेत अभिज्ञा प्रेक्षकांना पुष्पावल्लीच्या भूमिकेत दिसणार आहे.
तू तेव्हा तशी या मालिकेबद्दल अभिज्ञा म्हणाली, "सो ऑफिशिअली मी तुम्हाला पुन्हा भेटायला येते आहे एका अशा भूमिकेत जी मला याआधी करायला मिळाली नाही.. मी आशा करते कि प्रेक्षकांकडून मला भरभरून प्रेम आणि पाठिंबा मिळेल, कारण माझी मेहनत १०० पटीने जास्त असणार आहे."
आपल्या नवीन भूमिकेबद्दल बोलताना अभिज्ञा म्हणाली, "प्रेक्षकांनी मला आजवर अनेक नकारात्मक भूमिकांमध्ये पाहिलंय आणि माझ्या प्रत्येक भूमिकेवर भरभरून प्रेम केलं. पण तू तेव्हा तशी मधली भूमिका खूपच वेगळी आहे. मी या मालिकेत पुष्पवल्ली नावाची भूमिका निभावतेय. पुष्पवल्लीला पाहताना प्रेक्षकांना नक्कीच मजा येईल याची मला खात्री आहे."

Comments

Popular posts from this blog

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..