विवियाना मॉल
विवियाना मॉलने, #ShameBodyShaming फॅशन शोच्या माध्यमातून केला सर्वांच्या हृदयाला स्पर्श!
~वेगवेगळ्या शरीरयष्टीच्या व वर्णांच्या शूर स्त्रियांनी दिमाखात पावले टाकत केले रॅम्पला आपलेसे~
~ #TooMuch वॉलने बॉडी शेमिंगला सामोरे जाणाऱ्यांना व्यक्त केला भक्कम पाठिंबा~
मुंबई, मार्च 2022: खूपच लठ्ठ, खूपच हडकुळी, केवढी बुटकी, किती उंच, किती काळी, जास्तच गोरी; ही विशेषणे स्त्रियांना समाजात नेहमीच ऐकून घ्यावी लागतात. काहीही असू दे, रूपावरून टीका करणे अर्थात बॉडी शेमिंग सुरूच राहते आणि स्त्रियांनी आकर्षक दिसण्यासाठी कमनीय बांधा किंवा लांब केस किंवा नेमके वजन राखलेच पाहिजे व समाजाने घालून दिलेल्या सौंदर्याच्या पारंपरिक साच्यांमध्ये बसलेच पाहिजे, अशी अपेक्षा कायमच ठेवलीच जाते.
बॉडी शेमिंगचा एखाद्याच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो आणि आत्मविश्वास तसेच स्वप्रतिष्ठा कमी झाल्यामुळे नैराश्यही येऊ शकते. याचा संबंधित स्त्रीच्या दैनंदिन आयुष्यातील कामांवर परिणाम होऊ शकतो. हे असे किती काळ चालणार? किती काळ चालल्यानंतर आता पुरे झाले असे लोकांना वाटणार? समाजाने आता स्त्रियांना त्या जशा आहेत तसे स्वीकारलेच पाहिजे. त्यांच्या बाह्य रूपाच्या पलीकडे आणि आतमध्ये जाऊन त्यांच्याकडे बघितले पाहिजे.
आरोग्यविषयक काम करणाऱ्या संस्थांनी केलेल्या एका सर्वेक्षणामध्ये, 20 शहरांतील 15 ते 65 वयोगटातील उत्तरदात्यांनी (रिस्पॉण्डंट्स) बॉडी शेमिंगबद्दल त्यांची मते व्यक्त केली. बॉडी शेमिंग हे नेहमी आढळणारे वर्तन आहे असे 90% स्त्रियांनी मान्य केले. शाळेत किंवा कामाच्या ठिकाणी बॉडी शेमिंगचा अनुभव आल्याचे 47.5% स्त्रियांनी नमूद केले. लोकांनी दिसण्यावर तसेच शारीरिक स्वरूपावर टिप्पणी केल्यामुळे चिंता किंवा भीतीची भावना जाणवल्याचे 62% स्त्रियांनी नोंदवल्याचे, सर्वेक्षणात दिसून आले आहे.
या पार्श्वभूमीवर, विवियाना मॉलने आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला एक लक्षवेधक फॅशन शो आयोजित केला. या शोमध्ये सर्व प्रकारची शरीरयष्टी तसेच वर्णांच्या मॉडेल्स दिमाखात रॅम्पवरून चालल्या आणि त्यांनी रॅम्पवर हुकूमत गाजवली. सौंदर्य हे बघणाऱ्याच्या नजरेत असते आणि स्त्रिया त्यांच्या शारीरिक स्वरूपाच्या पलीकडे खूप काही आहेत, हे जगाला ठणकावून सांगण्याचा हा प्रयत्न होता. या मॉडेल्स एका विचारप्रवर्तक व्हिडिओमध्येही दिसल्या. या व्हिडिओची संकल्पना व दिग्दर्शन ट्रायएंजल्सचे सौगत भट्टाचार्य यांचे होते. बॉडी शेमिंग थांबवणे ही काळाची गरज आहे आणि हे आता खूप झाले (#TooMuch) असा संदेश, वीकेण्डला प्रदर्शित झालेल्या या व्हिडिओमधून, देण्यात आला आहे.
याशिवाय, #TooMuch वॉलवरही बॉडी शेमिंगला बळी पडणाऱ्या स्त्रियांना भक्कम पाठिंबा दर्शवण्यात आला.
हे अभियान विवियाना मॉलच्या #ExtraordiNAARI या फ्लॅगशिप कार्यक्रमाचा भाग आहे. यावर यंदा #ShameBodyShaming या विषयावर भर दिला जात आहे.
विवियाना मॉलच्या CMO श्रीमती रिमा कीर्तीकर या अभियानाबद्दल म्हणाल्या, “विवियाना मॉलचे अभियान आयुष्ये समृद्ध करण्यावर लक्ष केंद्रित करते आणि समुदायांच्या, विशेषत: स्त्रियांच्या, कल्याणाच्या दिशेने काम करते. प्रतिष्ठेने आयुष्य जगण्याचा हक्क प्रत्येक स्त्रीला आहे. जगभरातील स्त्रिया आता काचेची घरे फोडून बाहेर येत आहेत आणि उत्तम यश मिळवत आहेत. यात त्यांच्या शारीरिक स्वरूपाचा संबंध कुठेच नाही. लोकांना पूर्वग्रहांमधून बाहेर येण्यास प्रोत्साहन देणे तसेच शिक्षित करणे तसेच बॉडी शेमिंग थांबवण्यासाठी कृतीचे आवाहन करणे हा आमच्या #ShameBodyShaming अभियानाचा प्रयत्न आहे. मॉलमध्ये येणाऱ्या सर्वांना त्यांचे स्वागत होत असल्याची भावना असावी यासाठी विवियाना मॉल सातत्याने प्रयत्न करत आहेत. ग्राहकाचा आनंद हा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि त्याचा/तिचा रंग किंवा शरीरयष्टी यांचा यात संबंध नाही. या अभियानाच्या माध्यमातून लोकांच्या हृदयाला स्पर्श करू शकू तसेच एक सर्वसमावेशक समाज, विशेषत: स्त्रियांना सामावून घेणारा समाज, निर्माण करण्यात योगदान देऊ शकू,” अशी आशा आम्हाला वाटते.
‘ExtraordiNAARI’ या आपल्या फ्लॅगशिप कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेकविध स्त्रीकेंद्री सामाजिक समस्या हाताळण्याचे उद्दिष्ट विवियाना मॉलपुढे आहे. त्याचप्रमाणे समाजात जागरूकता तसेच दीर्घकाळ टिकणारा प्रभाव निर्माण करून स्त्रियांचे समाजाती स्थान उंचावण्याचे उद्दिष्टही मॉलपुढे आहे.
Comments
Post a Comment