प्रसिद्ध संगीतकार 'प्रशांत नाकती'च्या 'माझी बायगो' गाण्याने पार केला १०० मिलीयन व्ह्यूजचा टप्पा पार!
संगित विश्वात 'मिलीनीयर' म्हणून ओळख असणा-या संगितकार 'प्रशांत नाकती'च्या 'माझी बायगो' या गाण्याने तब्बल १०० मिलीयन व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे मराठी इंडस्ट्रीत या गाण्याची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. नुकतचं 'नादखुळा म्युझिक' प्रस्तुत 'आपलीच हवा' गाणं देखिल प्रदर्शित झालं आहे. याआधी 'नादखुळा म्युझिक' लेबलच्या 'आपली यारी' गाण्याला अवघ्या 12 तासांमध्येच दशलक्ष व्ह्यूज मिळाले होते. आपल्या वेगवेगळ्या गाण्यांनी तरूणाईला मोहात पाडणा-या प्रशांतने अगदी कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. माझी बायगो या गाण्याचे गीत - संगीत प्रशांत नाकतीने केले असून गायिका सोनाली सोनावणे आणि गायक केवल वाळंज यांच्या सुरेल आवाजामुळे हे गाणं लोकांच्या पसंतीस पडलं. या लव्ह सॉंगमध्ये निक शिंदे आणि श्रद्धा पवार हे कलाकार आहेत.
मिलीनीयर संगितकार 'प्रशांत नाकती' 'माझी बायगो' गाण्याच्या घवघवीत यशाविषयी सांगतो, "१०० मिलीयन हा आकडा खूप मोठा आहे. मराठीमध्ये हातावर मोजण्या इतकीच गाणी आहेत ज्यांना इतके व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्यामागे माझ्यासोबत, गायक, कलाकार व संपूर्ण टीमची खूप मेहनत आहे. तसेच १०० मिलीयन होण्यामागे प्रेक्षकांचा खूप मोठा वाटा आहे. प्रेक्षकांचे मी मनापासून आभार मानतो. की त्यांनी या गाण्याला भरभरून प्रेम दिलं. आणि १०० मिलीयन त्यांच्याशिवाय होणं शक्यचं नव्हतं. असचं भरभरून प्रेम प्रेक्षकांचं मिळो हीच सदिच्छा !"
पुढे तो सांगतो, "खूप आनंद वाटतो आहे की हे आमचं पहिलचं गाणं आहे ज्या गाण्याने एका वर्षात १०० मिलीयन व्ह्यूजचा आकडा पार केला. हे गाणं २०२१ चं नंबर वन गाणं होतं. २०२१ मध्ये रिलीज झालेल्या सिनेमातील किंवा अल्बमधील गाण्यांमध्ये हे एकमेव गाणं आहे ज्या गाण्याला १०० मिलीयन मिळाले आहेत. तसेच सगळ्यात जास्त लाईकस् देखिल माझी बायगो गाण्याला आहेत. हे गाणं जेव्हा रिलीज झालं तेव्हा युट्यूबवर हे नंबर वन गाणं म्हणून ट्रेंड झालं होतं. तो क्षण खूप भारी असतो जेव्हा आपण बनवलेलं मराठी गाणं नंबर वन म्हणून ट्रेंड होतं. इंस्टाग्राम या सोशल मीडिया अॅपवर रील्स हे फिचर आलं, तेव्हा १ लाख रिल्स या गाण्यावर बनवले होते. या गाण्याने आम्हाला खूप आठवणींसोबतच, अनेक रेकॉर्ड दिलेले आहेत. गेल्यावर्षी मार्चमध्येच हे गाणं रिलीज केलं होतं. एक वर्ष उलटूनही या गाण्याला मिळणारा प्रतिसाद पाहून माझा आनंद गगनात मावेनासा झाला आहे."
Comments
Post a Comment