कूपर कॉर्पोरेशनतर्फे पाश्चिमात्य बाजारपेठेसाठी जागतिक दर्जाची जेनसेट श्रेणी, 5KVA ते 250KVA चा समावेश   

जागतिक महामारी आणि लॉकडाउन व अनलॉकिंगच्या वेगवेगळ्या टप्प्यांनंतर अखंड वीजपुरवठ्याची गरज वाढली आहे. अखंड वीजपुरवठ्याची गरज हॉस्पिटल्स, निवासी सोसायटी, रेस्टॉरंट्स, कार्यालये किंवा रिटेल व्यवसाय, बंगले, शेती किंवा बांधकामाची ठिकाणे अशा सर्वच ठिकाणी असते. गेल्या काही वर्षांत भारतातील विजेचा वापर जगातील सर्वाधिक वेगाने वाढत असलेल्या वापरांपैकी एक आहे. विश्वासार्ह वीज स्त्रोत मिळावा यासाठी कूपर कॉर्पोरेशन या भारतातील आघाडीच्या इंजिन उत्पादक कंपनीने नवी, जागतिक दर्जाची जेनसेटची श्रेणी उपलब्द केली असून त्यात पाश्चिमात्या बाजारपेठेसाठी 5KVA ते 250KVA चा समावेश आहे.  

 

आमचे अंतर्गत संशोधन आणि रिकार्डो पीएलसीयूके यांसारख्या भागिदारांसह असलेल्या धोरणात्मक भागिदारीमुळे पॉवर जनरेटर्सची खऱ्या अर्थाने अभिनव श्रेणी तयार करणे शक्य झाले आहे. हे ताकदवान जेनसेट्स सर्वोत्तम बॅकअप पॉवर सुविधा कमीत कमी कॅपेक्स व ऑपएक्स खर्चासह मिळवून देतात. संपूर्ण श्रेणी 5KVA ते 250KVA ची असून त्याला 2-, 3-, 4- आणि 6- सिलेंडर कूपर इंजिन्सची जोड देण्यात आली आहे. जनरेटर्सचा आकार आटोपशीर असल्यामुळे ग्राहकाला मोठ्या प्रमाणावर जागेची बचत साधता येते, विशेषतः जास्त गुंतवणुकीच्या जागा असलेल्या ठिकाणी हे फायदेशीर ठरते.  


कूपर जेनसेट्सची ठळक वैशिष्ट्ये  

  • लाइफ- सायकलचा कमी खर्च आणि भविष्यवेधी उत्सर्जन पद्धत 
  • कूपर 2,3-,4- & 6- सिंलेडर इंजिन्सचा समावेश  
  • रिकार्डो पीएलसी, युकेतर्फे खास तयार केलेली इंजिन्स 
  • या विभागातील सर्वात कमी इंधन व ल्युब ऑइलचा वापर करणारी 
  • सीपीसीबी 2 प्रमाणित सायलेंट व सुपर सायलेंट पर्याय 
  • विक्री आणि सेवेला देशभरातील 100 पेक्षा जास्त पॉइंट्स ऑफ कॉन्टॅक्टचा पाठिंबा   

कूपर कॉर्पोरेशन प्रा. लि. चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. फारूख एन. कूपर म्हणाले, आम्ही आमचे 100 वे वर्ष साजरे करत आहोत आणि आमचा वारसा विश्वास व विश्वासर्हतेच्या पायावर उभारलेला आहे. बाजारपेठेतील बदलती समीकरणे लक्षात घेत  आम्ही सातत्याने आमचा दर्जा, सेवा आणि उत्पादनातील नाविन्य उंचावण्याचा प्रयत्न करत असतो. आमची इंजिन्स या बाजारपेठेसाठी योग्य आहेत, कारण त्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला असून भारतीय परिस्थिती लक्षात घेऊन ती बनवण्यात आली आहेत. आमची सर्व इंजिन्स आणि जेनसेट्स मेड इन इंडिया आहेत आणि सातारा, महाराष्ट्र येथील अत्याधुनिक केंद्रात उत्पादित केली जातात.      

 जेनसेट्सची श्रेणी -  

कंपनीने नुकतेच 5 KVA कॉम्पॅक्ट जेनसेट – कूपर बोल्ट मिनी लाँच केला आहे. कूपर बोल्ट मिनी जेनसेट हे वैविध्यपूर्ण इंजिन आहे, जे उच्च वीजनिर्मिती करते आणि इतर उत्पादनांच्या तुलनेत त्याचा आकार आटोपशीर आहे. त्याचप्रमाणे इंधनाच्या बाबतीत ते इतर उत्पादनांच्या तुलनेत खूप किफायतशीर आहे. उच्च कामगिरीच्या बाबतीत 125 kVA जेनसेट अतिशय बलशाली आहे. हा जेनसेट हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि ऑफिस इमारतींमध्ये वापरला जाऊ शकतो. या कमी आवाज करणाऱ्या, आटोपशीर जेनसेटला देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खूप मागणी आहे. 140 KVA हा 6 सिलेंडर असलेला लिक्विड कुलिंग डिझेल जेनसेट कंपन्या तसेच उद्योगक्षेत्राला उत्पादनाच्या कालावधीत वीजपुरवठा खंडित झाल्यास काम थांबणार नाही याची खात्री करणारा हे. आकाराने आटोपशीर 160-kVA डिझेल जनरेटर औद्योगिक क्षेत्रासाठी दीर्घ काळ चांगल्या प्रकारे उर्जा पुरवू शकतो. हाय ब्लॉक लोड क्षमता असलेला हा जेनसेट तीव्र हवामान असतानाही दीर्घ काळ सातत्यपूर्म कामगिरी करतो. 200 kVA जेनसेटसह उद्योग क्षेत्र तसेच हायवेस रेल्वे, मेट्रो अशा इतर नागरी बांधकामांनाही कोणत्याही अडथळ्याशिवाय त्यांचे उत्पादन पूर्म क्षमतेसह सुरू ठेवता येऊ शकते. दणकट, चांगली इंधन कार्यक्षमता असलेला 250 kVA सर्वात ताकदवान डिझेल जेनसेट मोठ्या इमारती, मॉल्स, थिएटर्स आणि औद्योगिक क्षेत्राला उर्जा पुरवू शकतो.  

 

ही जेनसेट्स वेगवेगळ्या उद्योगक्षेत्रांसाठी उपयुक्त असून त्यात वाहन उत्पादन, जेनसेट्स,  मरिन, संरक्षण, बांधकाम उपकरणे आणि शेती यांचा समावेश आहे. ही इंजिन भविष्यातील उत्सर्जनाविषयीच्या गरजा पूर्ण करू शकतील अशाप्रकारे तयार करण्यात आली आहेत.  

 

जेनसेट्सची नवी सीरीज कूपरच्या दर्जाची खात्री आणि जास्तीत जास्त अपटाइमसह दिली जाते. व्यावसायिक सेवा वितरकांचे राष्ट्रीय नेटवर्क, सुट्या भागांचा पुरेसा साठा आणि जलद विक्री पश्चात सेवा पुरवण्याची तयारी यांचाही त्यात समावेश आहे.  

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight