मेरे देश की धरती चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर लाँच सोहळा

कार्निवल मोशन पिक्चर्सचा मेरे देश की धरती’.... देश बदल रहा है हा हिंदी चित्रपट येत्या ६ मे पासून मनोरंजनाची सफर घडवायला सज्ज झाला आहे. नुकताच या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर लाँच सोहळा संपन्न झाला. यावेळी दिव्यांदू शर्माअनंत विधात या चित्रपटातील कलाकारांसह कार्निवल मोशन पिक्चर्सच्या संस्थापक आणि संचालिका वैशाली सरवणकर आदि मान्यवर उपस्थित होते.

‘मेरे देश की धरती चित्रपटासाठी कार्निवलने जो पाठिंबा दाखविला त्याबद्दल आभार व्यक्त करताना हा चित्रपट प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करण्यासोबत एक ठोस विचार ही देतो तो खूप महत्त्वाचा असल्याचा कलाकारांनी यावेळी सांगितलं. सादरीकरण आणि मांडणीत वैविध्य असलेला हा चित्रपट अनेक महोत्सवांमध्ये गौरविला गेला असून तरुणाईला रिफ्रेश आणि उमेद देणारा हा चित्रपट प्रत्येकाने आवर्जून पहायला पाहिजे असं कार्निवल मोशन पिक्चर्सच्या संस्थापक आणि संचालिका वैशाली सरवणकर यांनी याप्रसंगी सांगितले.

दोन इंजिनिअर्स तरुण स्वत:ची नोकरी करत असतानाकाहीतरी वेगळे करून दाखवण्याची उर्मी जपण्यासाठी कसे शेतकरी बनतातयाची हलकीफुलकी रंजक कथा मेरे देश की धरती’ या चित्रपटातून उलगडणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फराझ हैदर यांनी केलं आहे. मिर्झापूर फेम दिव्यांदू शर्माअनुप्रिया गोएंका आणि अनंत विधात या आघाडीच्या कलाकारांसोबत ईंनाम्युलहकब्रिजेंद्र कालाराजेश शर्माअतुल श्रीवास्तवफारुख झफर या प्रतिभावान कलाकारांच्या सुद्धा या चित्रपटात भूमिका आहेत.

मेरे देश की धरती या चित्रपटाच्या माध्यमातून शहरी आणि ग्रामीण भागातील वास्तव परिस्थितीवर भाष्य करण्यात आले आहे. या चित्रपटाची संकल्पना डॉ. श्रीकांत भासी यांची आहे. संवाद पियुष मिश्रा यांनी लिहिले आहेत. चित्रपटाला साजेसं संगीत विक्रम मॉण्टेरोज यांनी दिले असून छायांकन हरी वेदांतम यांचे आहे.

डॉ. श्रीकांत भासी यांची प्रस्तुती आणि कार्निवल मोशन पिक्चर्सच्या संस्थापक आणि संचालिका वैशाली सरवणकर  यांची निर्मीती असलेला मेरे देश की धरती चित्रपट ६ मेला चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight