कार्यालयातून पुन्हा काम सुरू केल्याने सध्याच्या जीवनशैलीशी तडजोड करावी लागेल असे ८६% कर्मचार्‍यांना वाटत असल्याचे गोदरेज इंटेरिओच्या अभ्यासातून उघड

·         ८४% कर्मचार्‍यांना त्यांच्या नोकऱ्यांमधून काम आणि आयुष्य यांच्यामध्ये चांगला समतोल अपेक्षित

·         ८१कर्मचार्‍यांना वाटते की 'लांबचा प्रवासहे कार्यालयातून काम पुन्हा सुरू करण्याच्या मुख्य चिंतेपैकी एक

·         ६८कर्मचारी कार्यालयात परत येण्यास उत्सुक

मुंबई,     एप्रिल २०२२: गोदरेज समुहाची प्रमुख कंपनी असलेल्या गोदरेज अँड बॉयसने  घर आणि संस्थात्मक विभागांमध्ये भारतातील अग्रगण्य फर्निचर सोल्यूशन ब्रँड असलेली आपली व्यवसाय शाखा गोदरेज इंटेरिओने  'घरकार्यालय आणि त्यापलीकडे' या विषयावरील  विशेष अभ्यासाचे निष्कर्ष प्रकाशित केल्याचे जाहीर केले आहे. साथीच्या रोगानंतरच्या जगात कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा समजून घेण्यासाठी गोदरेज इंटेरिओच्या वर्कस्पेस अँड एर्गोनॉमिक्स रिसर्च सेलने देशव्यापी अभ्यास केला आणि कर्मचाऱ्यांची कामावर परतण्याची चिंताऑफिस स्पेसच्या पारंपरिक वापरात झालेले बदल आणि घरातून आणि कार्यालयातून काम करण्याविषयीची मते यासारख्या विविध पैलूंचा खुलासा केला. २१ ते ५६ वर्षे वयोगटातील एकूण ३५० कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी संशोधनात भाग घेतलात्यापैकी बहुतेकजण बहुराष्ट्रीय कंपन्या आणि भारतीय कॉर्पोरेट साठी काम करत आहेत.

संशोधन अभ्यासानुसारगेल्या दोन वर्षांमध्ये मालक कंपन्या आणि कर्मचार्‍यांसाठी आरोग्यतब्बेत हे सर्वाधिक लक्ष देण्याचे क्षेत्र बनले होते आणि ३१% कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे की नियोक्त्यांना कर्मचार्‍यांच्या आरोग्याची काळजी असायलाच हवी. त्याचप्रमाणेत्याच कालावधीत कर्मचार्‍यांनाही त्यांच्या स्वतःच्या आणि त्यांच्या टीमच्या स्वास्थ्यात फरक दिसून आला. त्यामध्ये ६२%ना वैयक्तिक स्वास्थ्यात आणि ५०% जणांना टीमच्या स्वास्थ्यात सुधारणा दिसून आली.  


कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात परत आणण्याचे मार्ग शोधत असताना संशोधनातून असे दिसून आले आहे की कर्मचाऱ्यांना कार्यालयात परत येण्याबाबत चिंता आहेअनेक कार्यालयांमधील ओपन प्लॅन लेआउट डिझाइन लक्षात घेता आरोग्य आणि सुरक्षिततेची चिंता या अभ्यासात उघड झालीअभ्यासानुसार कार्यालयात परत येण्याबाबत कर्मचार्‍यांच्या मुख्य चिंता म्हणजे ९०% कार्यालयात कोविड १९ चा संसर्ग होतो, ८६%लोकांना सध्याच्या जीवनशैलीशी तडजोड करावी लागेल असे वाटते, ८४% कर्मचाऱ्यांना काम आणि आयुष्य यांच्यामधील समतोल बिघडण्याची भीती वाटते, ८१% कर्मचाऱ्यांना लांब प्रवास करावा लागणार याची चिंता वाटते तर ७१%ना पालक आणि मुलांची काळजी कशी घेणार हा प्रश्न सतावतो. तथापिया सर्व चिंता असूनहीअभ्यास असेही सूचित करतो की ६८%कर्मचारी आरामात आहेत आणि कार्यालयात परत येण्यास उत्सुक आहेत.


काही अंशी लॉकडाऊन शिथिल झालेल्या टप्प्यातअभ्यासातून असे दिसून आले आहे की २६% कर्मचारी अजूनही त्यांच्या गावी आहेत आणि त्यांची कार्यालये असलेल्या शहरांपासून दूर आहेत तर १८% कर्मचारी त्यांची कार्यालये असलेल्या शहरांमध्ये परतले आहेत.

 गोदरेज इंटेरिओच्या विपणन (बी टू बी) विभागाचे सहयोगी उपाध्यक्ष समीर जोशी म्हणाले: "कार्यालये सर्व कर्मचार्‍यांचे कार्यालयात स्वागत करण्यासाठी सज्ज होत असताना काम आणि आयुष्य यांच्यात चांगला समतोल राखण्याबद्दलच्या कर्मचार्‍यांच्या धारणा लक्षणीय बदलल्या आहेतघरातून कामाचे फायदे पाहिल्यानंतरही औपचारिक कामाच्या ठिकाणाची संकल्पना पूर्णपणे नाहीशी झालेली नाहीतथापिसाथीच्या रोगाने ऑफिस स्पेसचा वापर अधिक प्रभावीपणे कसा करता येईल याविषयी चर्चा सुरू केली आहेगोदरेज इंटरिओमध्ये आमच्याकडे ऑफिस स्पेसमध्ये अधिक सहयोगी फर्निचरची मागणी वाढताना पाहत आहोत आणि या आर्थिक वर्षात या विभागात २५% ची वाढ होईल.

 

कार्यालयात परत येण्याचा कोणताही प्रकार यशस्वी होण्यासाठीनियोक्त्यांनी त्यांच्या कर्मचार्‍यांच्या चिंतेकडे लक्ष देणे आवश्यक आहे आणि वैयक्तिक आणि व्यावसायिक स्वास्थ्याच्या बाबी धोरणेकार्यालयाच्या पायाभूत सुविधा आणि डिझाइनमध्ये समाविष्ट करणे आवश्यक आहेसर्वात महत्वाचे म्हणजेभविष्यातील कामाच्या ठिकाणी सार्वजनिक आरोग्याच्या गरजांची पूर्तता, कर्मचार्‍यांच्या वैयक्तिक गरजांची पूर्तता आणि त्यांच्या परिसंस्थेशी संलग्न होण्याच्या अनुकूल मार्गांद्वारे व्यवसायांसाठी आर्थिक मूल्य प्रदान करण्यासाठीचा दृष्टीकोन या तीन मुख्य गोष्टी पुरविल्या गेल्या पाहिजेत."


महामारीच्या वर्षांमध्ये मिळालेल्या अनुभवांवरून भविष्यात कामकाजात कोणतेही मोठे व्यत्यय येणार नाहीत याची खात्री करण्यासाठी कंपन्या त्यांच्या धोरणांचे पुनर्मूल्यांकन करत आहेत. साथीच्या आजाराच्या सुरुवातीच्या दिवसांत विलिस टॉवर्स  वॉटसन इंडिया कोविड-19 रेडिनेस पल्स सर्वेक्षण करण्यात आले. त्यात असे आढळून आले की भारतातील ८३% कंपन्यानी त्यांच्या घरून काम करण्याच्या धोरणाचे पुनरावलोकन करायचे ठरविले होते. यातून कार्यालयापासून दूर असल्यास कर्मचारी फारसे उत्पादनक्षम राहत नाहीत या पारंपरिक समजुतीला मोठाच धक्का बसला आहे असे सोसायटी फॉर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटच्या (SHRM)अहवालात म्हणले आहे. गोदरेज इंटेरिओच्या अभ्यासानुसार २०% कर्मचारी पूर्ण वेळ दूरच्या ठिकाणाहून काम करण्याला पसंती देणारे२३% कर्मचारी पूर्ण वेळ कार्यालयातून काम करायला पसंती देणारे तर ६% कर्मचारी जागेच्या बाबतीत फारसे आग्रही नसणारे आहेत.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight