तू तेव्हा तशी मालिकेच्या शीर्षक गीताची चर्चा

झी मराठीवर नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली मालिका तू तेव्हा तशी प्रेक्षकांच्या पसंतीस पडतेय. मालिकेसोबतच मालिकेच्या शीर्षक गीताची देखील चर्चा आहे. हे गीत रसिक प्रेक्षकांच्या ओठांवर रुळतंय. हे शीर्षक गीत संगीतकार समीर सप्तीसकर यांनी संगीतबद्ध केलं आहे. या शीर्षक गीताचे शब्द अभिषेक खणकर यांचे असून अभय जोधपूरकरने ते गायलं आहे. हे शीर्षकगीत यशस्वी होण्यामागे पडद्यामागील सर्व तत्रंज्ञाचादेखील तितकाच महत्वपूर्ण वाटा असल्याचं समीर सप्तीसकर यांनी आवर्जून सांगितलं.
या शीर्षकगीताबद्दल बोलताना समीर म्हणाला, "एखादी धून रचण्यासाठी पुरेसा वेळ लागतो तसंच या शीर्षकगीताची संकल्पना जवळपास चार महिन्यांपूर्वी ठरली होती आणि पहिल्यांदाच एखाद्या गीताच्या चालीवर मी चार महिने काम केलंय. मी अभिषेकला शीर्षक गीताची धून पाठवायचो आणि त्यावरून तो ते शब्दबद्ध करायचा, अशा पद्धतीने फक्त फोनवरून संवाद साधून हे शीर्षकगीत तयार केलं. पुढे अवघ्या काही दिवसांतच या शीर्षकगीताचं रेकॉर्डिंग करण्यात आलं. स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर यांना हे शीर्षकगीत प्रचंड आवडलं आणि प्रेक्षकांना देखील ते आवडतंय याचा खूपच आनंद आहे."

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight