विनामूल्य ऑनलाइन उन्हाळी कार्यशाळेसह प्रॅक्टिकलीमध्ये सुट्टीच्या मजेची वापसी

 

मुंबई, १२ एप्रिल, २०२२: प्रॅक्टिकली, या भारतातील पहिल्या इमर्सिव्ह आणि एक्सपेरिअन्शिअल लर्निंग ॲपने, २५ एप्रिलपासून सुरू होणार्‍या सर्व लाइव्ह क्लासच्या विद्यार्थ्यांसाठी चार ते सहा आठवड्यांच्या   लोकप्रिय उन्हाळी कार्यशाळेची दुसरी आवृत्ती सुरू केली आहे. नवीन वापरकर्ते प्रॅक्टिकली लाइव्ह (ऑनलाइन क्लासेस) चे सदस्यत्व फक्त रु. २२५/- प्रति महिना या आकर्षक मासिक शुल्कात घेऊन याचा लाभ घेऊ शकतात. तसेच आधी नोंदणी करणारे वार्षिक सदस्यत्वावर PractSumr30 या व्हाउचर कोडचा वापर करून थेट ३०% सूट मिळवण्याचा लाभ घेऊ शकतात.

 

देशभरातील विद्यार्थ्यांच्या सध्याच्या गरजा समजून 

घेण्यासाठी, प्रँक्टिकलीने एक सर्वेक्षण केले ज्यामध्ये ग्राफिक डिझायनिंग (५६%) आणि गेम डेव्हलपमेंट (५३%) यांना या उन्हाळ्यामध्ये त्यांच्या अभ्यासक्रमाबाहेरील क्रिया कलापांचा एक भाग म्हणून पाठपुरावा करू इच्छित असलेले शीर्ष अभ्यासक्रम म्हणून स्थान देण्यात आले. त्यानंतर फोटोग्राफी आणि संगीत (५०%), रोबोटिक्स (४४%) आणि वेबसाइट डेव्हलपमेंट (४३%) यांचे स्थान होते. या निकषांनंतर,कार्यशाळेची रचना या  अभ्यासक्रमांसह सर्वसमावेशकपणे केली गेली आहे जेणेकरून विद्यार्थ्यांच्या प्राधान्यांना सर्वोच्च अग्रक्रम दिला जाईल आणि त्यांना सर्वोत्तम विद्याशाखा, साधने आणि संसाधने वापरून शिकवले जाईल.

 

उन्हाळी कार्यशाळेत, विद्यार्थी त्यांच्या वैयक्तिक स्वारस्नुसार ऑफर केलेल्या एक किंवा सर्व अभ्यासक्रसाठी नोंदणी करू कतात. कार्यशाळा यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर, विद्यार्थ्यांना अधिकृत प्रमाणपत्र मिळेल.

 

 STEM अभ्यासक्रम आहेत जे विद्यार्थ्यांना

प्रगत साधने आणि सॉफ्टवेअर वापरून गेम्स, वेबसाइटस आणि रोबोट्स तयार करण्यात मदत करतात. सर्जनशील मनाला प्रोत्साहन देण्यासाठी, कार्यशाळेत ग्राफिक डिझायनिंग, संगीत आणि फोटोग्राफीचे अभ्यासक्रम देखील समाविष्ट आहेत.







Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight