मिशलिन एक्स® मल्टी एनर्जी झेड
मिशलिन ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी (बीईई) कडून एनर्जी लेबलिंग मिळणारा भारतातील पहिला टायर ब्रॅण्ड
मिशलिन एक्स® मल्टी एनर्जी झेडला देशामध्ये विभागातील अग्रणी इंधन कार्यक्षमतेसाठी मिळाले ४-स्टार टायर रेटिंग
27 एप्रिल 2022: मिशलिन ही जगातील आघाडीच्या मोबिलिटी कंपनी नुकतेच सादर करण्यात आलेल्या भारत सरकारच्या स्टार लेबलिंग उपक्रमासह मान्यताकृत होणारी देशातील पहिली टायर ब्रॅण्ड ठरली आहे. या उपक्रमाचा टायर्ससाठी स्थिरता आणि नवीन सादर करण्यात आलेले कार्यक्षमता मानक सुधारण्याचा मनसुबा आहे.
मिशलिन एक्स® मल्टी एनर्जी झेडला ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी (बीईई) कडून ४-स्टार रेटिंगसह उद्योगामधील पहिले इंधन बचत लेबल प्रदान करण्यात आले आहे. मिशलिनने भारतात ट्यूबलेस ट्रक व बस टायर २९५/८०आर२२.५ एक्स® मल्टी एनर्जी झेड उत्पादित व डिझाइन केला आहे आणि प्रबळ इंधन बचत, विविध री-ट्रिड्ससह लांबच्या अंतरापर्यंत प्रवासाची खात्री आणि भारतीय प्रदेशामध्ये सुरक्षिततेची खात्री देतो. कार्यक्षम ४-स्टार रेटेड टायर्स जवळपास ८ टक्क्यांपर्यंत* अधिक इंधन बचतीची खात्री देतात.
भारताच्या विकसित होत असलेल्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वपूर्ण आधारस्तंभ असलेल्या मालवाहतूकीची कार्यक्षमता विविध सरकारी उपक्रमांचा लाभ साकारण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल. हरित गतीशीलतेप्रती सुलभ परिवर्तनासाठी रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाच्या महत्त्वाकांक्षी आराखड्याचा भाग म्हणून २०२१ मध्ये मसूदा अधिसूचना जारी करण्यात आली, ज्यामध्ये प्रस्तावित आहे की ऑटामेाटिव्ह इंडस्ट्री स्टॅण्डर्डस (एआयएस) च्या स्टेज-२ मध्ये सूचित केल्याप्रमाणे कार्स, बसेस व ट्रक्सच्या टायर्सनी रोलिंग रेसिस्टण्स, वेट ग्रिप व रोलिंग साऊंड एमिशन्सची पूर्तता करणे अनिवार्य आहे. या प्रक्रियेअंतर्गत मिशलिन इंडिया ब्रॅण्डची नोंदणी करणारा पहिला ब्रॅण्ड होता आणि मिशलिन एक्स® मल्टी एनर्जी झेडसाठी भारताच्या पहिल्या ४ स्टार रेटिंगसह पुरस्कारित करण्यात आले.
मिशलिन इंडिया चेन्नई प्लाण्टचे कार्यकारी संचालक रंगनाथन भुवराहमूर्ती म्हणाले, ''टायर्स कार्यक्षमता व इंधन कार्यक्षमता घटकांचे सादरीकरण व प्रमाणीकरण भारतीय ऑटोमोटिव्ह उद्योगासाठी ऐतिहासिक उपलब्धी आहे आणि आम्ही या उपक्रमासाठी भारत सरकारचे अभिनंदन करतो. आमच्या नवोन्मेष्कारी इतिहासामधील उच्च-कार्यक्षम व इंधन-कार्यक्षम टायर्स कंपनीच्या मिळालेल्या दर्जासह आम्हाला आमच्या मेड इन इंडिया टायरसाठी पहिले स्टार लेबलिंग मिळाल्याचा आनंद होत आहे. मेड इन इंडिया उत्पादनांसाठी मिळालेल्या पहिल्या ४ स्टार रेंटिंगमधून मिशलिनचेनवोन्मेष्कारी व उत्पादनामधील नेतृत्वदिसून येते. भारतामध्ये आम्ही आमच्या ग्राहकांना देशातील स्थितींना अनुसरून सर्वोत्तम उत्पादने आणि सर्वात प्रगत जागतिक मिशलिन तंत्रज्ञाने देण्याप्रती कटिबद्ध आहोत.''
मिशलिन इंडियाच्या बी२बीचे व्यावसायिक संचालक देवेंदर सिंग म्हणाले, ''कोणत्याही ताफा मालकाला इंधनावर अधिक खर्च करावा लागतो आणि नुकतेच इंधनाचे वाढते दर मोठी समस्या बनली आहे. मिशलिन एक्स® मल्टी एनर्जी झेडसाठी हे ४ स्टार रेटिंग आमच्यासाठी, तसेच पर्यावरण व मालकीहक्काच्या खर्चाबाबत जागरूक असलेल्या ताफा ग्राहकांसाठी उत्तम संधी देते. स्टार लेबलिंगच्या सादरीकरणासह ग्राहक आता त्यांच्या ड्रायव्हिंग वापराला सर्वोत्तमरित्या अनुकूल असे टायर्स निवडू शकतील, सोबतच त्यांच्या वाहनांमधील इंधन कार्यक्षम व सुरक्षित राहिल. भारतीय रस्त्यावर अधिकाधिक प्रमाणित लो रोलिंग रेसिस्टण्ट टायर्समुळे भारतीय ताफ्यांसाठी सर्वोत्तम इंधन बचत होईल आणि देशामधील कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन कमी होईल.''
भारतात विकले जाणारे सर्व टायर्स रोलिंग रेझिस्टन्स, वेट ग्रिप आणि रोलिंग ध्वनी उत्सर्जन यांसारख्या महत्त्वपूर्ण कामगिरी आणि सुरक्षा मानकांची पूर्तता करण्याची मागणी नवीन नियमांमध्ये केली जाईल. ऑटोमोबाईल्स, बस आणि अवजड वाहनांसाठी स्थानिक व आंतरराष्ट्रीय टायर उत्पादक आणि आयातदारांना प्रस्तावित अनिवार्य मानकांचे पालन करणे २०२३ पासून आवश्यक असेल.
Comments
Post a Comment