भाग्य दिले तू मला मालिकेमध्ये तन्वी मुंडले प्रमुख भूमिका

गुहागरच्या आठवणींमध्ये रमली तन्वी मुंडले... 

मुंबई ७ एप्रिल, २०२२ : कलर्स मराठीवर नुकत्याच सुरू झालेल्या भाग्य दिले तू मला मालिकेमध्ये तन्वी मुंडले प्रमुख भूमिका साकारत आहेमालिकेचे बरेचसे शूट हे गुहागर येथे झाले आहे. गुहागर येथे लहानाची मोठी झालेल्या कावेरीचे तिच्या घरावर, ती ज्या शाळेत शिक्षिका आहे त्या शाळेवर मुळातच सांस्कृतिक चालीरीतीनिसर्गभाषा आणि आपली माणसं यांच्यावर जिवापाड प्रेम आहेतिथे शूट करत असताना कावेरी म्हणजेच तन्वीने आणि सेटवरील बाकीच्या सदस्यांनी बरीच धम्माल मस्ती केलेली आहे. त्यातलेच काही हे फोटोज.

तन्वीचा मालिकेतील लुक, कावेरी आणि राजवर्धनची जोडी प्रेक्षकांना विशेष आवडत आहे. राजवर्धनची भूमिका विवेक सांगळे साकारत आहेत. तन्वीने गुहागर शूटिंग दरम्यानचे काही किस्से सांगितले. ती म्हणाली, “तिकडे शूट करताना खूपच मज्जा आली, मी स्वत: कोकणची असले तरीदेखील मी पहिल्यांदाच गुहागर ठिकाणी कामासाठी म्हणून आलेखूप कमाल अनुभव होता. प्रत्येकचं गोष्ट खूप सुंदर होती. मग समुद्र असो वा छोट्या छोट्या पायवाटा असो, सगळं हिरवगार... सगळं असं खूप समृध्द आपण म्हणतो ना तसं होतं. मी पाहिल्यांदा साडी नेसून सायकल चालवली, हा अनुभव खूप मस्त होता. मुंबईमध्ये आल्यावर मी माझ्या सायकलला खूप मिस करते आहे... आठवण येते आहे मला तिची. आम्ही शूटिंग तर केलंच पण, तिथून अनेक आठवणी घेऊन आलो आहोत. हा अनुभव माझ्या कायम स्मरणात राहील”. तेव्हा नक्की बघा भाग्य दिले तू मला मालिका नक्की बघा सोम ते शनि रात्री ९.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight