गोदरेज अप्लायन्सेस

 Godrej Appliances

गोदरेज अप्लायन्सेस तर्फे राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळे आणि ई-कचरा पुनर्वापर करणाऱ्या भागीदारांच्या सहकार्याने संकलन मोहिमेसह नागरिकांमध्ये ई-कचरा जागृतीवर भर

-   २०२२ मध्ये संपूर्ण भारतात विविध उपक्रमांद्वारे २०,००० मेट्रिक टन (वीस दशलक्ष किलोग्रॅम) ई-कचरा गोळा करण्याचे उद्दिष्ट.

-   राजस्थान राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि ग्लोबल वेस्ट सोल्युशन यांच्या सहकार्याने ई-कचरा संकलन मोहीम.

मुंबई, ५ एप्रिल २०२२: गोदरेज समूहाची प्रमुख कंपनी असलेल्या गोदरेज अँड बॉयसने आपली व्यवसाय शाखा गोदरेज अप्लायन्सने लिकडेच राजस्थान राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि ग्लोबल वेस्ट सोल्युशन यांच्या सहकार्याने राजस्थानमध्ये दोन आठवड्यांच्या ई-कचरा संकलन मोहिमेचा समारोप केल्याची घोषणा केली.

या मोहिमेचा एक भाग म्हणून औद्योगिक क्षेत्रेनिवासी क्षेत्रे, आरडब्ल्यूएज, व्यावसायिक बाजार आणि अनौपचारिक हॉट-स्पॉट्समधून ई-कचरा गोळा करण्यात आला आणि अधिकृत पुनर्वापरकर्त्यांकडे आणि उपकरणांचे सुटे भाग करणाऱ्यांकडे वर्ग करण्यात आला. सहा शहरांमधून गोळा केलेल्या २३२ मेट्रिक टन (२३२,००० किलो) ई-कचऱ्यापैकी १५० हून अधिक निवासी संकुलांमधून ३८.५ मेट्रिक टन (३८,५०० किलो) ई-कचरा गोळा करताना लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली. वर्षानुवर्षेगोदरेज अप्लायन्सेसने भारत विरुद्ध ई कचरा चळवळीच्या छत्राखाली अनेक कार्यक्रम सादर केले आहेतनागरिकांमध्ये योग्य प्रकारे ई-कचरा विल्हेवाटीचे महत्त्व जागृत करण्याच्या उद्देशाने विविध शहरांमध्ये ही चळवळ राबविण्यात येत आहे. गेल्या वर्षीगोदरेज अप्लायन्सेसद्वारे एकूण १५,६०० मेट्रिक टन (पंधरा दशलक्ष किलोग्रॅमपेक्षा जास्त) ई-कचरा संकलित करण्यात आला होता आणि यावर्षी २०,००० मेट्रिक टन (वीस दशलक्ष किलोग्रॅम) ई-कचरा गोळा करण्याचे उद्दिष्ट आहे.

ई-कचरा संकलन सुलभ करण्यासाठी ब्रँडने २४ x टोल-फ्री क्रमांक १८०० २०९ ५५११ सुरू केला आहे. टोल फ्री नंबरवर कॉल करून ग्राहक सहजपणे पिकअप ठरवू शकतात.


उपक्रमावर भाष्य करताना गोदरेज अँड बॉयसचा भाग असलेल्या गोदरेज अ‍ॅप्लायन्सेसचे व्यवसाय प्रमुख आणि कार्यकारी उपाध्यक्ष कमल नंदी म्हणाले, "गोदरेजमध्ये पर्यावरण हे मुख्य मूल्य असल्याने आम्ही मूल्य शृंखलेत योग्य ई-कचरा पुनर्वापरासाठी वचनबद्ध आहोत. यामुळे आम्हाला इलेक्ट्रॉनिक्स आणि उपकरणांची सुरक्षित विल्हेवाट लावण्यासाठी राज्य नियामक संस्था आणि इतर संस्थांसोबत भागीदारी करून भारत विरुद्ध ई-कचरा उपक्रम वाढवण्यास प्रवृत्त केले आहे. आमचा टोल-फ्री क्रमांक आणि वापरण्यास सोपा क्यूआर कोड ग्राहकांना ई-वेस्ट कचरा सहजतेने उचलून नेण्यासाठी मदत करेल. शाश्वत विकासावर असलेला भर केवळ ई-कचरा ड्राइव्ह आणि जनजागृती मोहिमेपुरता मर्यादित नाहीतर आमच्या इको-फ्रेंडली उत्पादने आणि हरित उत्पादन प्रक्रियेतही दिसून येतो."

 

राजस्थान राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव आनंद मोहन म्हणाले, "राजस्थानमधील ई-कचरा संकलन मोहिमेत भाग घेतल्याबद्दल आणि ई-कचऱ्याची पर्यावरणपूरक विल्हेवाट लावण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण केल्याबद्दल आम्ही गोदरेज अप्लायन्सेसचे आभारी आहोत. ई-कचरा संकलन मोहिमेला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आणि एक कोटीहून अधिक रुपये पुनर्वापर करणाऱ्या एजन्सींनी त्यांच्या ई-कचऱ्यासाठी सर्वोत्तम मूल्य म्हणून वितरीत केले आहेत. मला विश्वास आहे की हे समर्थन आगामी टप्प्यांसाठीही सुरू राहील."


ग्लोबल वेस्ट सोल्युशनचे संचालक मनीष अग्रवाल म्हणाले, "ग्लोबल वेस्ट सोल्युशनराजस्थान राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि गोदरेज अप्लायन्सेसच्या विविध प्रादेशिक कार्यालयांनी संयुक्तपणे चालवलेल्या ई-कचऱ्याच्या व्यवस्थापनाबाबत जनजागृती मोहीम यशस्वी झाली आहे. सर्वसामान्यांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि या उदात्त कार्याचे कौतुक केले. अशा मोहिमा काळाची गरज आहे."


Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight