‘फक्त मराठी सिने सन्मान सोहळा २०२२’
फक्त मराठी सिने सन्मान २०२२: धर्मवीरची बाजी, चंद्रमुखीचा डंका.. (BDN),मुंबई,३० जुलै २०२२ः ‘फक्त मराठी सिने सन्मान सोहळा २०२२’ मोठ्या थाटात आणि दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत २७ जुलै रोजी अंधेरी येथे पार पडला. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळत होते अमेय वाघ आणि ओमकार भोजने. दोघांच्याही विनोदकौशल्याने कलाकारांचं आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करत निवेदनाची जबाबदारी उत्कृष्ठरीत्या पार पाडली. आशिष पाटीलच्या गणेश वंदनेने कार्यक्रमाचा श्रीगणेशा झाला. या फक्त मराठी सिने सोहळ्याचा अत्यंत खास क्षण म्हणजे रंगभूषाकार विद्याधर भट्टे यांचा सन्मान. विद्याधर यांनी अनेक सिनेमांसाठी मोठ्या मोठ्या भूमिकांना रूप देऊन घडवण्याच कार्य केलं आहे. ‘लगे राहो मुन्ना भाय’, ‘परिनीता’, ‘धर्मवीर’ अश्या अनेक चित्रपटातल्या कठीण भूमिकांना रंग देऊन उभं केलं. त्यांनी दिलीप प्रभावळकर, ऐश्वर्या राय-बच्चन, विद्या बालन अश्या अनेक दिग्गज कलाकारांना मेकअप करून हुबेहूब भूमिका घडवल्या. अशा विद्याधर भट्टे यांचा सन्मान सिने तारका विद्या बालन यांच्या हस्ते पार पडला. तसेच आपल्या मराठी चित्रपटसृष्टीची शान म्हणजेच गायक आणि संगीतका