पियाजिओकडून 'आपे एनएक्‍सटी+: मायलेज का राजा' लाँच

मुंबई१२ जुलै २०२२: पियाजिओ वेईकल्‍स प्रा. लि. (पीव्‍हीपीएल) ही इटायलियन पियाजिओ ग्रुपची १०० टक्‍के उपकंपनी आणि भारतातील आघाडीच्‍या लघु व्‍यावसायिक वाहनांच्‍या उत्‍पादक कंपनीने आज पॅसेंजर सेगमेंटमधील नवोन्‍मेष्‍कारी नवीन उत्‍पादन  ऑल न्‍यू आपे एनएक्‍सटी+ ाँच केली.

 

एनएक्‍सटी+ ही उच्‍च मायलेज देणारी तीन-चाकी आहे, जी सीएनजी व्‍हर्जनसाठी जवळपास प्रतिकिग्रॅ ५० किमी इंडस्‍ट्री बेस्‍ट फ्यूएल एफिशिएन्‍सी देते. स्‍वदेशी संशोधन व विकसित करण्‍यात आलेल्‍या या वेईकलमध्‍ये अत्‍यंत स्‍टायलिश आकर्षक घटक आहेत, जे उद्योगामधील इतर ब्रॅण्‍ड ऑफरिंग्‍जच्‍या तुलनेत वेईकलला समकालीन व नवीन लुक्‍स देतात.

 

अद्वितीय मायलेजव्‍यतिरिक्‍त या वेईकलमध्‍ये सेगमेंट फर्स्‍ट ट्यूबलेस टायर्स, आकर्षक फ्रण्‍ट फेशियासह हेडलॅम्‍प्‍ससाठी बेझेल, फिकट तपकिरी रंगाचे डॅशबोर्ड व ड्युअल टोन सीट्स आणि नवीन डिझाइन केलेल्‍या कॅनोपीसह अधिक दृश्‍यमानता व लुक्‍ससाठी पारदर्शक विंडोज आहेत. उत्‍पादनाला अधिक ग्‍लॅमर बनवण्‍यासाठी बाजूला स्‍टायलिश डिकल्‍स देखील आहेत.

 

आपे एनएक्‍सटी+ मध्ये दर्जात्‍मक एैसपैस जागा असून कोणत्‍याही रस्‍त्‍यावर उत्तम कामगिरी करण्‍याची क्षमता आहे. या वेईकलमध्‍ये ३-व्‍हॉल्‍व्‍ह इंजिन आहे, जे उच्‍च शक्‍ती व पिक-अपसोबत सुलभ ड्रायव्हिंग अनुभव देते. आपे एनएक्‍सटी+ हे शहरी भारतीय लास्‍ट माइल मोबिलिटी सोल्‍यूशनसाठी नेक्‍स्‍ट जनरेशन उत्‍पादन आहे आणि बाजारपेठेतील मालकीहक्‍काच्‍या सर्वोत्तम खर्चासह मोठ्या प्रमाणात संपादन खर्चाचा लाभ देते.

पियाजिओ हा कार्गो व पॅसेंजर विभागासाठी पेट्रोल, डिझेल, सीएनजी, एलपीजी व इलेक्ट्रिकमध्‍ये उत्‍पादन पोर्टफोलिओ असलेला भारतातील एकमेव इंधन ॲग्‍नोस्टिक थ्री-व्हिलर ब्रॅण्‍ड आहे.

याप्रसंगी बोलताना पियाजिओ इंडिया प्रा. लि.चे अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. डिगो ग्रॅफी म्‍हणाले, ''पियाजिओमध्‍ये आम्‍हाला सीएनजी, एलपीजी व पेट्रोल फ्यूएल व्‍हेरिएण्‍ट्ससह आणखी एक तीन-चाकी पॅसेंजर वेईकल ाँच करण्‍याचा आनंद होत आहे. पर्यायी इंधन पर्यायांसाठी वाढती मागणी आणि प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्‍याची गरज सीएनजी संचालित वाहनांवर भर देत आहेत. भारत सरकार पर्यायी इंधन पर्यायांना चालना देण्‍यासाठी उल्‍लेखनीय पावले उचलत आहे, ज्‍यामुळे आमच्‍यासारख्‍या ओईएमना अधिकाधिक ग्राहकांच्‍या गरजांची पूर्तता करण्‍यासाठी आमच्‍या उत्‍पादन पोर्टफोलिओमध्‍ये नाविन्‍यता आणण्‍यास मदत होत आहे. नवीन आपे एनएक्‍सटी+ भारतीय बाजारपेठेसाठी भारतात डिझाइन व विकसित करण्‍यात आली आहे आणि परदेशातील बाजारपेठांमध्‍ये देखील निर्यात करण्‍यात येईल. या आपे एनएक्‍सटी+च्‍या ाँचसह आमचा पर्यायी इंधन विभाग क्षेत्रामधील आमची उपस्थिती अधिक दृढ करण्‍याचा मनसुबा आहे.''

 पियाजिओ इंडिया प्रा.लि.च्‍या डोमेस्टिक बिझनेस सीव्‍ही (आयसीई) अॅण्‍ड रिटेल फायनान्‍सचे कार्यकारी उपाध्‍यक्ष व प्रमुख श्री. सजू नायर म्‍हणाले, ''पियाजिओला तीन-चाकी कार्गो व पॅसेंजर वाहनांच्‍या आपल्‍या वैविध्‍यपूर्ण ताफ्यामध्‍ये आपे एनएक्‍सटी+ चा समावेश करण्‍याचा अभिमान वाटतो. व्‍यापक संशोधन व मोठ्या प्रमाणात ग्राहक अभिप्रायानंतर आपे एनएक्‍सटी+ विकसित करण्‍यात आली आहे. इंधन खर्चांमध्‍ये वाढ होत असताना आम्‍हाला खर्चाची बचत करण्‍यासोबत उच्‍च मायलेजप्रती आमच्‍या ग्राहकांच्‍या गरजा समजल्‍या आणि म्‍हणून आपे एनएक्‍सटी+ ची निर्मिती करण्‍यात आली. ही नवीन आपे उच्‍च दर्जात्‍मक इंधन कार्यक्षमता, अधिक आरामदायीपणा आणि अधिक एैसपैस जागेसह किमान देखरेखीचा खर्च देते. आपे एनएक्‍सटी+ समकालीन डिझाइन घटकांसह येते, जे या वेईकलला अधिक स्‍टायलिश उत्‍पादन बनवतात. शक्तिशाली पिक-अप आणि अपवादात्‍मक ड्रायव्हिंग अनुभवासाठी ३-व्‍हॉल्‍व्‍ह तंत्रज्ञान इंजिन डिझाइन करण्‍यात आले आहे. आमचा दृढ विश्‍वास आहे की, भारतातील अनेक शहरांमध्‍ये सीएनजी नेटवर्क वाढत असताना आपे एनएक्‍सटी+ आम्‍हाला बाजारपेठेत नवीन सीएनजी उत्‍पादनाचा शोध घेत असलेल्‍या ग्राहकांना अतिरिक्‍त मूल्‍य देण्‍यास मदत करेल.'' 

आपे एनएक्‍सटी+ सीएनजी व्‍हेरिएण्‍टसाठी २,३५,८११ रूपयांपासून आकर्षक सुरूवातीच्‍या एक्‍स-शोरूम किंमतीमध्‍ये येते आणि भारतभरातील सर्व पियाजिओ ऑथोराइज्‍ड डिलरशिप्‍समध्‍ये उपलब्‍ध आहे.

Http://piaggio-cv.co.in/

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight