फक्त मराठी सिने सन्मान २०२२

         फक्त मराठी सिने सन्मान २०२२

तुम्हां आम्हां सर्वांची लाडकी वाहिनी ‘फक्त मराठी’ गेले कित्येक वर्ष मनोरंजनाच व प्रबोधनाच काम करून सर्व रसिक प्रेक्षकांचं मन जिंकून घेत आलेली आहे. चित्रपटसृष्टी आणि मालिकासृष्टीतही  आपल स्थान ती निर्माण करीत आहे. या वाहिनीने कायम तिच्या प्रेक्षकांना सिनेमांच्या माध्यमातून खिळवून ठेवले आहे. नवे, जुने, वेगवेगळे कथानक असलेले, अनोख्या धाटणीचे सिनेमे प्रेक्षकांना दाखवण्यात फक्त मराठी यशस्वी ठरलेलं आहे.

परंतु आता सर्व प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच ‘फक्त मराठी’ वाहिनी घेऊन येत आहे ‘फक्त मराठी सिने सन्मान २०२२’. मराठी चित्रपटसृष्टी दिवसेंदिवस नवं रूप घेत आहे. नवनवीन सिनेमे, नव्या कथा, कलाकारांच्या अभिनयाची मेजवानी, लेखकाच्या लेखणीच सामर्थ्य, दिग्दर्शकाची दूरदृष्टी सगळंच खूप बहारदार आहे. त्यामुळे या कलाकारांच्या कौतुकाचा सोहळा म्हणजेच ‘फक्त मराठी सिने सन्मान २०२२’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल.  

या सिने सन्मान सोहळ्याची काही नामांकने पुढीलप्रमाणे-

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठी आदित्य सरपोतदार – झोंबीवली, दिग्पाल लांजेकर – पावनखिंड, मकरंद माने – सोयरीक, प्रसाद ओक – चंद्रमुखी, प्रवीण तरडे – धर्मवीर या कलाकारांना नामांकने आहेत.

तसेच सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी मानसी भवाळकर – सोयरीक, नेहा पेंडसे – जुन, अमृता खानविलकर – चंद्रमुखी, गौरी इंगवले – पांघरून, सई ताम्हणकर – पॉन्डीचेरी या अभिनेत्रींना नामांकने मिळाली आहेत.

सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी आदिनाथ कोठारे – चंद्रमुखी, प्रसाद ओक – धर्मवीर, प्रवीण तरडे – सरसेनापती हंबीरराव, सिद्धार्थ मेनन – जून, स्वप्नील जोशी – बळी या अभिनेत्यांना नामांकने प्राप्त झाली आहेत.

व सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी चंद्रमुखी, झिम्मा, धर्मवीर, सरसेनापती हंबीरराव, सोयरीक या उत्कृष्ट सिनेमांना नामांकने मिळाली आहेत.

त्यामुळे सिने सन्मान २०२२ हा सोहळा मोठ्या थाटात, अनेक दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. तसेच सर्व रसिक प्रेक्षकांसाठी खुश खबर अशी आहे कि या सोहळ्याला सिनेतारका अभिनेत्री विद्या बालन सुद्धा उपस्थिती दर्शवणार आहे व त्याचबरोबर तिच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचा सन्मान देखील करणार आहे.

फक्त मराठी सिने सन्मान २७ जुलै रोजी अंधेरीतील द क्लब येथे संपन्न होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight