जीवाचं रान इन मतदान
येत्या १५ तारखेला ‘Light and Shade events’या युट्युब चँनल आणि फेसबुक पेजवर येतोय तुमच्या भेटीला...तोपर्यंत ऐका आपलं थीम song!
राजकारणात दिसतं तसं नसतं, पडद्यामागेही कोणीतरी राबत असतं. पडद्यावरच्या राजकारणामागे असणारे पडद्यामागचे चेहरे दाखवणारा तुमचा आमचा कार्यक्रम "जीवाचं रान इन मतदान"
मुंबई,११ जुलै २०२२ः सध्या राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींमुळे स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, महानगरपालिका, मध्यावधी निवडणुका या आता होतील, नंतर होतील अशा चर्चांना उधाण आलंय.
या निवडणुका आज उद्या होतीलच, पण निवडणुका म्हटलं की प्रचार आला आणि तो प्रचार यशस्वीपणे करण्यासाठी लागणारी यंत्रणा. निवडणुकांचा इतका प्रभावी प्रचार कसा केला जातो, कोण असतं या सगळ्यामागे हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल! ह्याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी सुप्रसिद्ध दिग्दर्शक विजू माने घेऊन येत आहेत एक मुलाखतींची मालिका, 'जीवाचं रान इन मतदान'. ज्यामध्ये राजकीय पक्षांसाठी पडद्यामागे राबून निवडणुकांच्या घोषणा, प्रचारगीते, संगीत, व्हिडीओज, मोठमोठ्या सभा या सगळ्या गोष्टी करणाऱ्या मंडळींना पहिल्यांदाच दिग्दर्शक विजू माने यांनी पडद्यावर बोलतं केलंय. त्यात उदय सबनीस, अवधूत गुप्ते अशा मान्यवरांचाही समावेश आहे. नुकताच या सिरीजचा लोगो आणि विजू मानेंनी लिहिलेलं, अभिनेते कुशल बद्रिके यांनी गायलेलं थीम सॉंग नुकतंच लॉन्च करण्यात आलं आणि त्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलेलं आहे. ही सिरीज येत्या १५ जुलै पासून 'Light and Shade' आणि 'सलाम ठाणे ' या युट्युब चॅनलवर प्रसारित करण्यात येणार आहे.
Comments
Post a Comment