मोरोक्कोचा सदाई एफसी गोवाकडून करारबद्ध
~ आफ्रिकन राष्ट्रीय स्पर्धा जिंकून देण्यात मोलाचा वाटा ~
19 जुलै 2022: आयएसएल अर्थात इंडियन सुपर लीगमधील एक महत्त्वपूर्ण क्लब असलेल्या एफसी गोवाने मोरोक्कोचा बचावपटू नोह सदाई याला दोन वर्षांसाठी करारबद्ध केले आहे. या करारामुळे तो 2024 हंगामापर्यंत गौर्सचे प्रतिनिधित्व करताना दिसेन.
पुढील हंगामाची सुरुवात एफसी गोवाकडून करता येणार असल्याचा मोठा आनंद आहे. हा क्लब माझ्यासाठी नवा नाही. गेेली दोन वर्षे मी क्लबचे पदाधिकारी तसेच कोचिंग स्टाफ यांच्या संपर्कात आहे. या कालावधीत आयएसएल असो किंवा ड्युरँड कप स्पर्धा, एफसी गोवाची सांघिक कामगिरी उंचावण्यादृष्टीने जास्तीत जास्त योगदान देण्याचा मी प्रयत्न केला. यापुढे मैदानावर असताना सर्वोत्कृष्ट कामगिरीला प्राधान्य राहील, असे सदाई याने क्लबसोबतच्या करारानंतर एफसीगोवाडॉटइनला सांगितले.
एफसी गोवा क्लबचे वैशिष्ट्य विषद करताना, प्रत्येक सामना आणि स्पर्धा जिंकण्याची भूक, हे मी एफसीकडून खेळताना शिकलो आहे. क्लबकडून खेळण्यापूर्वीचेही सामन्यांचे व्हीडिओ पाहिल्यानंतरही त्याचीच प्रचिती येते. मी मुख्य प्रशिक्षक कार्लोस पेना यांच्याशी संवाद साधला असून त्यांनी माझे स्वागत केले आहे. मला अन्य देशांमधील क्लब्जकडून ऑफर्स होत्या. मात्र, हेड कोचनी तुमच्यावर विश्वास दाखवल्यानंतर मला त्यांचा आदर राखायला हवा. पेना यांनी माझी क्षमता ओळखली आहे. त्यामुळे त्यांचा विश्वास सार्थ ठरवण्याची संधी चालून आली आहे, असे सदाई म्हणाला.
एफसी गोवाचे फुटबॉल संचालक रवी पुस्कूर यांनी सदाई याच्या कराराबद्दल समाधान व्यक्त केला आहे. नोह हा एक चांगला खेळाडू आहे. त्याने संधीचे सोने करताना राष्ट्रीय संघ तसेच आयएसएलमध्ये त्याची योग्यता सिद्ध केली आहे. आम्ही अनेक वषर्र्े त्याच्याकडे लक्ष ठेऊन होतो. योग्य वेळ येताच आम्ही त्याला कराराबद्ध केले. कुठल्याही स्तरावर आणि कुठल्याही पोझीशनवर सर्वोत्तम खेळ ही सदाई याची जमेची बाजू आहे. बचावपटू म्हणून त्याने कायम फ्रंटवर खेळण्याला प्राधान्य दिले आहे. त्याच्या समावेशामुळे आमची बचावफळी आणखी मजबूत होईल. तसेच अल्वारो व्हॅझ्केझ आणि इकेर ग्वारोटक्झेना यांना समर्थ सहकारी लाभेल, असे पुस्कुर यांनी म्हटले. 2022-23 हंगामासाठी अल्वारो व्हॅझ्केझ, फॅरेझ अर्नाउट आणि इकेर ग्वारोटक्झेना यांच्यानंतर एफसी गोवाच्या कंपूमध्ये दाखल झालेला सदाउ हा चौथा परदेशी फुटबॉलपटू ठरला आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय खेळ
सदाई याने चार सामन्यांत मोरोक्को राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करताना चांगली कामगिरी केली आहे. 2020मध्ये झालेल्या आफ्रिकन नेशन्स स्पर्धेत मोरोक्कोला जेतेपद मिळवून दिले. त्यात उपांत्य आणि अंतिम फेरीतील उल्लेखनीय खेळाचा समावेश आहे.
सदाई याने सीनियर फुटबॉलची कारकीर्द मेकॅबी हाइफा या इस्त्रायलच्या प्रमुख प्रीमियर क्लबपासून केली. त्यानंतर दुसर्या स्तरावरील लिगा लेउमिट अशा काही क्लबनंतर दक्षिण आफ्रिकेतील अजॅक्स केपटाउन क्लबचे (आताचा केपटाउन स्पूर्स) प्रतिनिधित्व केले. या क्लबला 2015मध्ये एमटीएन एट स्पर्धा जिंकून देण्यात सदाईचा सिंहाचा वाटा होता. दक्षिण आफ्रिकेतील हा सर्वात मोठ्या क्लब स्पर्धेत त्याने तीन सामन्यांत तितकेच गोल केले.
सदाई हा पुढे मियामी युनायटेड क्लबकडूनही खेळला. या क्लबकडून खेळताना त्याने 2016 राष्ट्रीय प्रीमियर सॉकर लीग जिंकून दिली. 28 वर्षीय नोह हा होंडुरासचा रेआल सीडी इस्पॅना, ओमानमधील अल-कॅबुरा आणि मिरबॅट एससी, इजिप्तचा इनप्पी एससी, तसेच मोरोक्कोमधील एमसी ओउज्डा, राजा कॅसॅब्लँका आणि एएस एफएआर राहब आदी क्लबकडूनही खेळला आहे.
Comments
Post a Comment