गोदरेज
गोदरेज इंटेरिओच्या संशोधनामधून निदर्शनास येते की, ६४ टक्के बँक कर्मचारी मस्कुलोस्केलेटल डिसऑर्डर्स (एमएसडी) समस्यांपासून पीडित आहेत
· बँकांमध्ये वापरण्यात येणार्या १३ टक्के खुर्च्यांमध्ये कोणत्याही प्रकारची समयोजित वैशिष्ट्ये नाहीत.
· बँकां मध्ये वापरण्यात येणार्या ४९ टक्के खुर्च्यांमध्ये आर्मरेस्ट ॲडजस्टमेंटचा अभाव आणि ४१ टक्के खुर्च्यांमध्ये अजूनही बॅक रिक्लाइनचा अभाव.
· ४१ टक्के बॅक कर्मचारी प्रतिदिन ९ तास काम करतात, तर २८ टक्के बँक कर्मचारी १० तास किंवा त्यापेक्षा अधिक वेळ काम करतात.
· वर्कस्पेस फर्निचर सेगमेंटमध्ये 2025 पर्यंत 16% मार्केट शेअर मिळवण्याचा प्रयत्न.
मुंबई, जुलै २०, २०२२: गोदरेज ॲण्ड बॉईस या गोदरेज ग्रुपच्या प्रमुख कंपनीने घोषणा केली की, त्यांचा व्यवसाय गृह व संस्थात्मक विभागांमधील भारतातील आघाडीचा फर्निचर सोल्यूशन्स ब्रॅण्ड गोदरेज इंटीरिओने त्यांचे विशेष संशोधन ‘Wellbeing at Work in the Banking Sector मधील निष्पत्ती सादर केल्या आहेत. या संशोधनामधून निदर्शनास आले की, बँक कर्मचारी रिअल-टाइम डेटाची देखरेख करत, ऑनलाइन ग्राहकांच्या शंकाचे निराकरण करत आणि यंत्रणा अद्ययावत ठेवत दीर्घकाळापर्यंत स्क्रिन्ससमोर वेळ व्यतित करतात, जे शारीरिकदृष्ट्या व मानसिकदृष्ट्या त्रासदायक आहे. या सर्वेक्षणामधून निदर्शनास आले की, सर्व बँका त्यांच्या कर्मचार्यांच्या आरोग्याला महत्त्व देत नाहीत आणि बँकांमध्ये आरोग्यदायी कामकाजाच्या वातावरणाला चालना देण्यासाठी आवश्यक संसाधने नाहीत. या संशोधनामध्ये सार्वजनिक व खाजगी क्षेत्र बँकांमध्ये काम करणार्या एकूण २५० बँकर्सनी सहभाग घेतला. या सर्वेक्षणाने कर्मचार्यांमध्ये काम करताना योग्य पवित्रा, वर्क-डेस्क एर्गोनॉमिक्स आणि एकूण स्वास्थ्याबाबत असलेली जागरूकता समजून घेण्याचा प्रयत्न केला.
या संशोधनामधील अभ्यासानुसार बहुतांश बँकांमध्ये एर्गोनॉमिक पायाभूत सुविधेचा अभाव आहे, ज्यामुळे दीर्घकाळापर्यंत बैठेकाम करणार्या बँक कर्मचार्यांमध्ये अनारोग्यकारक एर्गोनॉमिक पवित्रा दिसून येतो. बँकांमधील ४९ टक्के खुर्च्यांमध्ये आर्मरेस्ट ॲडजस्टमेंट्सचा अभाव आहे आणि ४१ टक्के खुर्च्यांमध्ये अजूनही बॅक रिक्लाइनचा अभाव आहे. २६ वर्षांवरील कर्मचार्यांच्या विभागामध्ये वेदना होणार्या कर्मचार्यांचे प्रमाण लक्षणीयरित्या उच्च आहे आणि वय वाढत जाण्यासह या आकडेवारींमध्ये अधिक वाढ होत आहे. यामधून निदर्शनास येते की, वय कदाचित मस्कुलोस्केलेटल डिसऑर्डर्स (एमएसडी)साठी प्रमुख कारणीभूत घटक असू शकतो.
या संशोधनामधून निदर्शनास येते की, बँक कर्मचारी वापरणार्या ८५ टक्के डेस्कमध्ये हाइट ॲडजस्टमेंटचा अभाव आहे आणि ३१ टक्के बँक कर्मचारी सांगतात की डेस्कखाली जागेचा अभाव आहे. या संशोधनामधून उघडकीस आलेली चिंताजनक बाब म्हणजे अस्ताव्यस्त पवित्रा आणि आवश्यक ब्रेक्सशिवाय दीर्घकाळापर्यंत स्क्रिनसमोर राहिल्याने ६९ टक्के कर्मचार्यांना पाठदुखीचा त्रास होत आहे, ६२ टक्के कर्मचार्यांना मानदुखीचा त्रास होत आहे, ५९ टक्के कर्मचार्यांना डोळ्यांवरील ताण व डोकेदुखीचा त्रास होत आहे. या संशोधनाने निदर्शनास आणले की, ग्राहकांशी संवाद साधणार्या भूमिकांमध्ये कर्मचार्यांना थकवा व मानसिक तणावापासून प्रतिबंध करण्याकरिता कामाच्या ठिकाणी पुन्हा उत्साहित करणार्या जागांची गरज आहे. याव्यतिरिक्त संशोधनामधील अभ्यासामधून निदर्शनास आले की, ४१ टक्के बँकांमध्ये स्टाफ लाऊंजचा अभाव आहे आणि ३१ टक्के बँकांतील कामाच्या ठिकाणी असलेल्या पुन्हा उत्साहित करणार्या जागांमधील स्टाफ लाऊंजमध्ये आरामदायी फर्निचरचा अभाव आहे.
गोदरेज इंटीरिओच्या मार्केटिंग (बी२बी)चे उपाध्यक्ष समीर जोशी म्हणाले, ''भारताच्या बँकिंग क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर मागणीच्या पार्श्वभूमीवर व्यापक वाढ होत आहे. इंडिया ब्रॅण्ड इक्विटी फाऊंडेशन (आयबीईएफ)च्या अंदाजानुसार, २०२५ पर्यंत भारताची फिनटेक बाजारपेठ ६.२ ट्रिलियन रूपयांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. तरीदेखील गोदरेज इंटरिओच्या वर्कस्पेस ॲण्ड एर्गोनॉमिक रिसर्च सेलने केलेल्या अभ्यासानुसार सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँकांनी कर्मचार्यांच्या आरोग्याशी अनुकूल वातावरण निर्मिती करण्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. आज बँकर्स त्यांच्या डेस्कच्या एका बाजूला असलेल्या डिजिटल स्क्रिन्सवर मल्टीटास्किंग करण्यात आणि साह्यतेसाठी प्रत्यक्ष शाखेला भेट देणार्या ग्राहकांसोबत टेबलावर बसून दीर्घकाळापर्यंत व अनेकदा तणावपूर्ण वेळ व्यतित करतात. या संशोधनामधील अभ्यासाचे उद्दिष्ट एमएसडींवर प्रतिबंध करण्यासाठी बँकांना सुनियोजित आणि एर्गोनॉमिक पायाभूत सुविधांसह संबंधित कामाची जागा तयार करण्यात मदत करणे आहे. देशाच्या आर्थिक आराखड्याचे केंद्रबिंदू असलेल्या बँकांनी कामावर असताना त्यांच्या कर्मचार्यांचे चांगले आरोग्य आणि स्वास्थ्याची काळजी घेतली पाहिजे. दीर्घकाळापर्यंत कामकाजाची वेळ, गॅजेटचा अधिक वापर, अपुरा ब्रेक, काम करताना योग्य पवित्राबाबत जागरूकता नसणे, अयोग्य पायाभूत सुविधा आणि अकार्यक्षम जागा डिझाइनचा कर्मचार्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे त्यांच्या संपूर्ण स्वास्थ्यावर परिणाम होतो. गोदरेज इंटेरिओमध्ये आम्हाला बँकिंग क्षेत्रामधून एर्गोनॉमिक फर्निचरची मागणी होताना दिसत आहे आणि या आर्थिक वर्षात आम्ही या विभागामध्ये २१ टक्के वाढ करण्याचा विचार करत आहोत.''
ते पुढे म्हणाले, ''कंपन्यांनी टीम्सना वाईट एर्गोनॉमिक्सच्या संभाव्य मर्यादित परिणामांबाबत जागरूक राहण्यास मदत केली पाहिजे. त्यांनी आदर्श ठेवत नेतृत्व केले पाहिजे आणि कर्मचार्यांचे कल्याण, उत्पादकता व वाढीवर लक्ष केंद्रित करताना आरोग्यदायी कामकाजाचे वातावरण निर्माण केले पाहिजे.''
२०२५ पर्यंत १६ टक्के मार्केट शेअर मिळवण्याच्या उद्देशाने गोदरेज इंटेरिओ वर्कस्पेस फर्निचर विभागामध्ये आणखी विस्तार करण्यासाठी सज्ज आहे. गोदरेज इंटेरिओ येथील एर्गोनॉमिक्स ॲण्ड रिसर्च सेल निष्ठावान ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करण्यासोबत त्यांच्या अनुभवामध्ये वाढ करणारी सानुकूल उत्पादने व उपायांची निर्मिती आणि डिझाइन सुनिश्चित करण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे. ब्रॅण्डच्या या दिशेने असलेल्या प्रयत्नांमुळेच ब्रॅण्ड ग्राहकांकडून उच्च ब्रॅण्ड-लॉयल्टीचा आनंद घेतो.
Comments
Post a Comment