सुबोध भावेचे सवालजवाब 'बस बाई बस' या कार्यक्रमात

 सुबोध भावेचे #सवालजवाब

'मी घेऊन आलो आहे महिलांसाठी खास राखीव बस' असं सुबोध भावे याने म्हंटल्यावर संपूर्ण महाराष्ट्रात एकच चर्चा सुरु झाली आणि प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे ती म्हणजे बस बाई बस या कार्यक्रमाची. हा कार्यक्रम २९ जुलै पासून शुक्रवार आणि शनिवार रात्री ९.३० वाजता झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुबोध भावे करणार असून या कार्यक्रमात महिला कलाकार सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाची चर्चा सावत्र सुरु असताना सोशल मीडियावर सुबोध भावेचे भन्नाट सवाल जवाब प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. जस कि 'हॉटेलमधू न साबण, शाम्पू घरी घेऊन जात का?', 'तुम्ही पाणीपुरी खाल्ल्यावर सुकी पुरी मागता का?'. या धमाल प्रश्नावर नेटिझन्सचा तुफान प्रतिसाद तर मिळतोच आहे पण त्याचसोबत अशी एक गोष्ट ज्याच्याशिवाय सोशल मीडिया अपूर्ण आहे ती म्हणजे मिम्स, ते देखील या सवाल जवाबवर बनताना दिसत आहेत. जर कार्यक्रमाच्या प्रसारणाआधीच सोशल मीडियावर इतकी चर्चा आहे तर कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस आल्यावर त्याला भरगोस प्रतिसाद मिळणार यात काही शंका नाही.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Cityflo & Salaam Bombay Foundation

June Is Here, But Humidity Isn't Going Anywhere: Functional Fashion Brands Helping Indians Stay Comfortable