एचसीएल टेक्नॉलॉजीज....


'एचसीएल टेक्नॉलॉजीजने शहरी गरीबी निर्मूलन कार्यक्रमासाठी जिंकला नॅशनल सीएसआर अवॉर्ड  

 

भारत ऑगस्ट, 2022: एचसीएल टेक्नॉलॉजीज (एचसीएल) ही जागतिक तंत्रज्ञान कंपनी असून कॉर्पोरेट कामकाज मंत्रालय, भारत सरकारच्या वतीने देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठीत नॅशनल सीएसआर अवॉर्डवर आपल्या नावाची मोहोर उमटवली आहे.  

 

एचसीएल फाऊंडेशनच्या वतीने बजावण्यात आलेल्या पथदर्शी कामासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. एचसीएल फाऊंडेशन ही एचसीएल टेक्नॉलॉजीजची कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) शाखा असून शहरातील झोपडपट्ट्यांत दारिद्र्यरेषेखाली राहणाऱ्या लोकसमूहांच्या समान आणि शाश्वत विकासाकरिता काम करते.  

झोपडपट्टी विकासाला भारत सरकारकडून राष्ट्रीय प्राधान्य देण्यात येते आहे. एचसीएल फाऊंडेशनचा प्रमुख कार्यक्रम, एचसीएल उदय, समाजातील वंचित घटक, ज्यामध्ये स्थलांतरीत कामगार आणि बालक कामगार, शहरातील वस्त्यांमध्ये व रस्त्यांवर राहणारी मुलांचा समावेश असून त्यांना व्यापक पाठबळ उपलब्ध करून देण्यात येते. बालकांना शिक्षण, लाभदायक रोजगाराकरिता कौशल्य विकास, प्राथमिक आरोग्य देखभाल आणि स्वच्छता सेवा, स्वच्छ पाणी स्त्रोत तसेच या घटकांसाठी अधिकाधिक विकासाचा समावेश आहे. आजवर या कार्यक्रमामुळे 11 भारतीय शहरांमधील 560,000 रहिवाशांवर परिणाम होईल.   

 

एचसीएल टेक्नॉलॉजीज स्थानिक समुदायांना सेवा पुरवण्याकरिता खोलवर कटिबद्ध असून आम्ही कार्यरत असलेल्या भौगोलिक परदेशात वृद्धी आणि सामाजिक विकासात योगदान देत आहोत. आजवर रू. 900 कोटींची गुंतवणूक करत एचसीएल फाऊंडेशनच्या वतीने भारतात सर्वाधिक भव्य सीएसआर पाऊलखूणा उमटवल्या आहेत. ज्यामुळे शहरी व ग्रामीण भागात विविध प्रयत्नांतून 3.7 दशलक्ष लोकांच्या जीवनावर परिणाम शक्य झाला आहे. ही दखल घेतल्याबद्दल आम्ही भारत सरकारचे आभार व्यक्त करतो. आमच्याकरिता हे फारच मोठे प्रोत्साहन असून त्यामुळे समुदायांत परिवर्तन आणण्यासाठी आणि न्याय्य व शाश्वत ग्रह उभारण्यात दुप्पट वेगाने प्रयत्न सुरू केले आहेत.” असे एचसीएल टेक्नॉलॉजीजचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक सी. विजयकुमार यांनी सांगितले.     

 

एचसीएल उदय या स्वयंसेवक-आधारित उपक्रमाची सुरुवात 2012 मध्ये करण्यात आली असली तरी 2016 दरम्यान तिची रचना आणि औपचारिक लॉन्च करण्यात आले होते. त्यानंतर विविध हस्तक्षेप आणि चालू उपक्रमांचा समावेश करत संकल्पना-आधारित सतत चालविण्यात येणाऱ्या कार्यक्रमात परिवर्तन करण्यात आले. समाजातील गरीब घटकांचे उत्थान करण्याची शक्ति आपल्यात असून एचसीएल उदयच्या साथीने मानाचे व आदराचे जीवन उपलब्ध करून देण्यात येते यावर त्यांचा विश्वास आहे. उदय अंतर्गत सुरू असलेल्या सर्व हस्तक्षेपांमुळे लवचीक आणि यशाच्या मार्गावर समाजाचे जीवनमान उंचवायला मदत होईल. एचसीएल कर्मचाऱ्यांचा सहभाग हा सर्व कार्यक्रमाची गुरुकिल्ली आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या https://www.hclfoundation.org/hcl-uday. 


समाजात आमच्या कार्यक्रमांमुळे जो परिणाम दिसतो आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो. एचसीएल उदयच्या माध्यमातून आम्ही शहरातील गरीबांना सन्मानपूर्ण आणि आदर मिळवून देणार आहोत. राष्ट्रीय प्राधान्य या वर्गवारीखाली आमच्या प्रयत्नांची दखल घेण्यात आली याचा आम्हाला अभिमान वाटतो. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विकास उद्दिष्टांत योगदान देण्याच्या एचसीएल फाऊंडेशनच्या द्रष्टेपणाला ही आणखी एक वैधता मिळाली. या प्रकल्पात सहभागी टीम आणि भागीदारांचे अभिनंदन.” असे एचसीएल फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा आणि संचालिका निधी पुंधीर म्हणाल्या.  

 

वार्षिक नॅशनल कॉर्पोरेट सोशल रिस्पॉसिबिलिटी (सीएसआर) अवॉर्डस कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाकडून देण्यात येतात. नाविन्यपूर्ण आणि शाश्वत सीएसआर उपक्रमांच्या माध्यमांतून समाजावर सकारात्मक परिणाम होत असल्याने कंपनीची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. हे पुरस्कार म्हणजे भारत सरकारच्या वतीने देण्यात येणारे सर्वोच्च सन्मान आहे.  

Comments

Popular posts from this blog

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight