पंजाब नॅशनल बँक

पंजाब नॅशनल बँकने प्री क्वालिफाईड क्रेडिट कार्ड बरोबर पीएनबी वन वर मुदत ठेवींवर ओव्हरड्राफ्ट सुविधा पण सुरू केली आहे जी काही क्लिकमध्ये उपलब्ध आहे

मुंबई : देशातील आघाडीची सार्वजनिक क्षेत्रातील बँक, पंजाब नॅशनल बँकेने त्यांचे प्री क्वालिफाईड क्रेडिट कार्ड लाँच केले आहे. त्याच बरोबर, पीएनबी ने तंत्रज्ञानाचा वापर करून काही क्लिक्समध्ये तत्काळ क्रेडिट कार्डे झटपट उपलब्ध करून देण्याबरोबरच उच्च दर्जाची आर्थिक सेवा देण्याची आपली वचनबद्धता कायम ठेवली आहे. पगार खाते असलेल्या ग्राहकांना ही सुविधा उपलब्ध असेल आणि ते मोबाइल बँकिंग ॲप पीएनबी वन आणि बँकेच्या वेबसाइट किंवा इंटरनेट बँकिंग सेवा (आयबीएस) द्वारे यासाठी अर्ज करू शकतात. पीएनबी ही सेवा RuPay आणि Visa या दोन प्लॅटफॉर्म अंतर्गत पुरवत आहे.

या सुविधेची घोषणा पीएनबी मुख्यालय द्वारका येथे करण्यात आली जिथे एमडी आणि सीईओ सह कार्यकारी संचालक, सिविओ आणि पीएनबी कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते.

बँकेने पीएनबी वन वर सिंगल ओटीपी सह काही क्लिकमध्ये फिक्स्ड डिपॉझिटवर ओव्हरड्राफ्टची नवीन सुविधा देखील सुरू केली आहे. ग्राहक आता बँकेच्या शाखेत न जाता कर्जाची सुविधा घेऊ शकतात. पीएनबी वन सारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे अर्ज करण्यासाठी व्याजदरात 0.25% ची सूट देखील दिली जाईल.

याप्रसंगी बोलताना, पीएनबीचे एमडी आणि सीईओ श्री अतुल कुमार गोयल म्हणाले “ डिजिटली चांगल्या आर्थिक इकोसिस्टमकडे वाटचाल करत असताना, जलद आणि अखंड सेवेच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकताना मला आनंद होत आहे. पीएनबी चे नवीन प्री क्वालिफाईड क्रेडिट कार्ड पूर्णपणे डिजिटल आहे आणि ते पेपरलेस क्रेडिट कार्ड असून अर्ज प्रक्रियेद्वारे उपलब्ध केले जात आहे. मूलभूत तपशील प्रविष्ट केल्यावर, ग्राहकांना रिवॉर्ड पॉइंट्स, संपूर्ण विमा संरक्षण, देशांतर्गत आणि परदेशी लाउंजमध्ये विनामूल्य प्रवेश, आरोग्य तपासणी, विनामूल्य गोल्फ, स्पा, जिम सत्र, उच्च क्रेडिट मर्यादा यासारखी कार्डची अनेक रोमांचक वैशिष्ट्ये मिळू शकतात. आणि आणखी बर्‍याच सेवा फक्त काही क्लिकमध्ये उपलब्ध आहेत. पीएनबी वन वर मुदत ठेवींवर ऑफर केलेल्या ओव्हरड्राफ्ट सुविधेबद्दल देखील मी उत्साहित आहे कारण ती आमच्या डिजिटल सेवांचा अतिरिक्त भाग म्हणून जोडली जात आहे आणि मी या दोन्ही उत्पादनांबद्दल खूप आशावादी आहे कारण ते सामान्य लोकांच्या गरजा पूर्ण करतात."


Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight