कोहिनूर ग्रुपने त्यांचे व्हिजन, मिशन व मूल्य विधान सादर..
कॉर्पोरेट मूल्ये व पारदर्शकतेच्या उच्च मापदंडांसह कोहिनूर ग्रुपने त्यांचे व्हिजन, मिशन व मूल्य विधान सादर केले
- कोव्हिडनंतर अशा प्रकारचे पहिलेच पाऊल
- उज्ज्वल भविष्यासाठी कोहिनूरच्या टीमने घेतली ‘माय कोहिनूर प्रतिज्ञा’
महाराष्ट्र, 23 ऑगस्ट 2022 : पुण्यातील आघाडीचा रिअल इस्टेट ग्रुप असलेल्या कोहिनूर ग्रुपतर्फे त्यांचे व्हिजन, मिशन व मूल्य विधान आज जाहीर करण्यात आले. लेफ्ट. जन. सतिश दुआ, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. कृष्णकुमार गोयल, व्यवस्थापकीय सहसंचालक श्री. विनीत गोयल आणि व्यवस्थापकीय सहसंचालक राजेश गोयल आणि संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत हे अनावरण करण्यात आले.
पुण्यातील बनतारा भावना बँक्वेट हॉलमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि या कार्यक्रमासाठी कोहिनूर ग्रुपचे 500 कर्मचारी व सहयोगी उपस्थित होते.
भारताने केलेल्या उरी सर्जिकल स्ट्राइकचे नेतृत्व करणारे लेफ्ट. जन. दुआ यांनी त्यांच्या प्रेरणादायक कथा उपस्थितांसमोर कथन केल्या आणि कार्यस्थळी नीतिमत्ता व मूल्ये पाळण्याचे महत्त्व त्यांनी विशद केले.
या प्रसंगी कोहिनूर ग्रुपचे व्यवस्थापकीय सहसंचालक श्री. विनित गोयल म्हणाले, “व्हिजन आणि मिशन स्टेटमेंट, कोहिनूर ग्रुपच्या पुण्यातील रिअल इस्टेट कंपनीपासून ते प्रसिद्ध कॉर्पोरेट होण्यापर्यंतच्या प्रगतीच्या व परिवर्तनाच्या वाटचालीमध्ये आपल्याला पथदर्शक ठरेल. पुणे शहरात जागतिक दर्जाची निवासी व कमर्शिअल ठिकाणे उपलब्ध करून देण्यामध्ये आघाडीवर राहण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित करेल आणि अधिक भक्कम करेल. व्हिजन स्टेटमेंटचा मजबूत पाया, तांत्रिक नैपुण्य व आमच्याकडे असलेले उच्च कौशल्य, तसेच कोहिनूरचे सर्व कर्मचारी व सहयोगी यांच्यात असलेली ‘माय कोहिनूर’ प्रतिज्ञेची जाणीव यामुळे अजून उत्साह संचारेल आणि कोहिनूर ग्रुपमध्ये आम्हाला उत्तम कामगिरी करण्यासाठी प्रेरणा मिळेल.
या प्रसंगी लेफ्ट. जन. दुआ म्हणाले, “प्रत्येक सैनिक आपल्या देशासाठी निस्वार्थीपणे उभा असतो. सैनिक व संरक्षण अधिकाऱ्यांची निष्ठा अतुलनीय असते आणि सामान्यांसाठी ती एक आदर्श असते. कोहिनूरच्या व्हिजन, मिशन आणि मूल्यांच्या माध्यमातून टीमच्या समर्पणाला व निष्ठेला आवाहन करण्यात आले आहे आणि माझी खात्री आहे की, कर्मचारी व व्यवस्थापन त्यांच्या ध्येयाची पूर्ण जबाबदारी घेतील आणि कोहिनूरला वेगळ्या उंचीवर घेऊन जातील.”
Comments
Post a Comment