बालाजी मोशन पिक्चर्स....
बालाजी मोशन पिक्चर्सकडून 'चीफ ऑपरेटिंग ऑफिसर' (सीओओ) म्हणून स्टुडिओच्या प्रमुखपदी भाविनी शेठ यांची नियुक्ती
मुंबई, ऑगस्ट २०२२: बालाजी मोशन पिक्चर्स या बालाजी टेलिफिल्म्स लि.च्या पूर्णत: मालकीच्या उपकंपनीने चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून भाविनी शेठ यांची नियुक्ती केली आहे. भाविनी शेठ या ॲमेझॉन स्टुडिओजमधून आल्या आहेत, जेथे त्या चार वर्षे बिझनेस अफेअर्स फॉर इंडियाच्या प्रमुख होत्या. 'द फॅमिली मॅन' 'मिर्झापूर'सारख्या यशस्वी सिरीज आणि 'सिटाडेल'सारख्या आगामी आंतरराष्ट्रीय शोसह सर्व भाषांमधील मूळ कन्टेन्टशी संबंधित सर्व व्यावसायिक बाबी आणि धोरणांची जबाबदारी त्यांच्यावर होती.
बालाजी मोशन पिक्चर्समध्ये आपल्या नवीन पदभारासह स्टुडिओचे नेतृत्व करत भाविनी नवीन फिल्म स्लेट तयार करण्याची, स्टुडिओच्या व्यवसायाची रणनीती स्पष्ट करण्याची, नवीन व्यवसायाच्या मार्गांना सुरुवात करण्याची आणि प्रतिभेच्या नवीन समूहासह भागीदारी करण्याची धुरा सांभाळतील. भाविनी प्रत्यक्ष शोभा कपूर आणि एकता आर. कपूर यांच्यासोबत काम करणार आहेत.
याबाबत बोलताना बालाजी टेलिफिल्म्सच्या संयुक्त व्यवस्थापकीय संचालक एकता आर. कपूर म्हणाल्या, ''आम्हाला भाविनी यांचे आमच्या बालाजी कुटुंबात स्वागत करताना आनंद होत आहे आणि आम्हाला विश्वास आहे की, ब्रॅण्डला वाढीच्या पुढील टप्प्यावर व नवीन उंचीवर नेण्यासाठी त्या योग्य आहेत. त्या उत्तम प्रतिष्ठा असलेल्या अनुभवी लीडर आहेत. क्षेत्रामध्ये त्यांच्या यशस्वी कार्यकाळात मिळालेल्या माहितीसह त्या बालाजी मोशन पिक्चर्सच्या नवीन सीओओ म्हणून कंपनीमध्ये निश्चितच मोलाची भर घालतील.''
बालाजी मोशन पिक्चर्सच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून आपल्या नवीन पदभाराबाबत मत व्यक्त करत भाविनी शेठ म्हणाल्या, ''बालाजी मोशन पिक्चर्सने नेहमीच अग्रस्थानी राहण्याचे आणि अपारंपरिक व हृदयस्पर्शी कथा आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हा स्टुडिओ देशातील सर्वात प्रसिद्ध मनोरंजनपूर्ण उद्योगांपैकी एक आहे आणि त्यांच्या लीडरशीप टीमचा एक भाग असल्याने मला सन्माननीय वाटते. आमच्या काळातील काही सक्षम महिला प्रमुख जसे शोभाजी आणि एकता यांच्यासारख्या दूरदर्शी व्यक्तींसोबत काम करणे ही खरोखरंच माझ्यासाठी एक मौल्यवान संधी आहे. निर्मिती ही नेहमीच जन्मजात असते आणि माझ्यासाठी चित्रपट व्यवसायात उतरण्याची हीच योग्य वेळ आहे. बालाजी मोशन पिक्चर्ससह हा नवीन प्रवास सुरू करण्यासाठी मी उत्साहित आणि सज्ज आहे."
मनोरंजन क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक संपन्न व्यावसायिक अनुभवासह शेठ यांचे कन्टेन्ट निर्मितीमध्ये व्यापक कौशल्य आहे. त्यांनी एक प्रॅक्टिसिंग वकील म्हणून सुरुवातीला आपल्या करिअरची सुरुवात नाईक नाईक ॲण्ड कंपनी सोबत केली होती. त्यांनी स्वतःचा व्यवसाय देखील केला होता, जेथे त्यांनी त्यांच्या करिअरच्या सुरूवातीला मूल्यांकन व इंटलेक्चुअल प्रॉपर्टी (आयपी) निर्माण करण्यासाठी काही प्रख्यात व यशस्वी प्रतिभावंत, निर्माते व स्टुडिओंसाठी व्यवसाय उपक्रम व विलीनीकरणाचा सल्ला दिला आणि धोरण आखले.
Comments
Post a Comment