अंतरा आणि मल्हारच्या आयुष्यात आलंय नवं संकट

अंतरा आणि मल्हारच्या आयुष्यात आलंय मेघ नावाचं नवं संकट !

मुंबई २३ ऑगस्ट२०२२ : कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला मालिकेत अंतरा आणि मल्हारच्या विरोधात बरीच कटकारस्थानं आतापर्यंत चित्रा काकीकाका आणि श्वेता मिळून रचत आले पण आता मात्र यांच्या आयुष्यात मेघ हे नवं संकट पुढ्यात येऊन ठाकलं आहे. मल्हार - अंतरा या संकटाला कसे सामोरे जाणार मेघचा नक्की काय हेतू आहे त्याच्या मनात नेमकं काय आहे चित्रा काकी आणि मेघ मिळून मल्हार अंतराच्या विरोधात कोणता डाव रचणार हे बघणे रंजक असणार आहेबघत राहा जीव माझा गुंतला सोम ते शनी रात्री ८.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवरमालिकेत मेघची भूमिका बिपीन सुर्वे हा अभिनेत्रा साकारतो आहे.

बिपीन आपल्या पात्राविषयी बोलताना म्हणाला , “जीव माझा गुंतला या मालिकेमधून एका अनोख्या आणि दमदार भूमिकेमध्ये मेघ खानविलकर म्हणून मी तुमच्या भेटीला येतो आहे। खूप मोठी जबाबदारी आहे असं मला वाटतं।  कारणमल्हार आणि अंतरा यांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळतं आहे ।  मालिकेवर खूप प्रेम आहे त्यांचे आणि यामध्ये आता मला सिद्ध करायचे आहेएक स्टायलिश पात्र साकारण्याची संधी मला टेल आ टेल प्रोडक्शन आणि कलर्स मराठी यांच्यामुळे मिळाली. ज्या पद्धतीने हे पात्र समजावून त्याचे महत्त्व सांगितल गेलंह्या नकारात्मक पात्राची त्याच्या कुटुंबाशी असलेली द्वेषाची भावनाभावा बद्दल सुडाची भावना ह्या सगळ्या गोष्टींमुळे भूमिकेचा प्रेमात पडलो आणि लगेच तयार झालोमाझा मालिकेचा प्रवास e tv मराठीच्या सुंदर  माझे घर (२०१३) या मालिकेने सुरू झाला त्यामध्ये सुध्दा मी नकारात्मक भूमिका साकारली होतीपण मेघ या पात्राबद्दल जेव्हा मला विचारलं गेलं त्याच दरम्यान मला काही ठिकाणी प्रमुख आणि सकारात्मक भूमिके साठी सुधा विचारलं गेलं होतं आणि मी सुध्दा  चांगल्या संधीच्या चॅलेंजिंग पात्राच्या शोधात होतो पण  मेघ खानविलकर या पात्राची ऑडिशन देत असतानाच मी स्वतःच त्या पात्राच्या प्रेमात पडलोकारण ऑडिशन script मध्येच इतकी छान मजा मांडली होती की पुढे ते साकारत असताना काय मजा असणार हे तेव्हाच कळलेआणि जेव्हा त्याच्या बद्दल पूर्ण माहिती मिळाली  हिरो सारखी विलनची एंट्री धमाकेदार असणार आहे हे ऐकल्यावर तर माझ्यातली भूमिकेसाठीची उत्स्तुकता खूपच वाढलीपात्र नकारात्मक असल तरी त्या मध्ये खूप variations आहेत आणि खूप मोठी आव्हाहन आहेतखूप ऊर्जा असलेलं हे पात्र साकारताना मला खूप मजा येते आहेखूप गोष्टी नव्याने शिकायला मिळत आहेत,  या पात्राच्या प्रेमात मी स्वतः पडल्यामुळे ते तुमच्या सर्वापर्यंत जास्तीत जास्त ऊर्जेने पोचवून त्याला योग्य तो न्याय देण्याचा माझा पुरेपूर आणि क्षणोक्षणी प्रयत्न असेल.. हे पात्र नकारात्मक जरी असल तरी ते सकारत्मकतेन तुम्हाला आवडेल असाच माझा आणि टीमचा प्रयत्नं असेल”.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight