जम्मू आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात संदीप पाठक सन्मानित..
जम्मू आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात संदीप पाठक सन्मानित
अलीकडच्या अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतून ‘राख’ चित्रपटातील भूमिकेसाठी अभिनेते संदीप पाठक यांना गौरविण्यात आले आहे. आता जम्मू आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही संदीप पाठक यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावत आपल्या यशाची मालिका सुरुच ठेवली आहे. १५ देशांचे ५४ चित्रपट या आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी निवडण्यात आले होते.
‘आपण केलेल्या कष्टाला जेव्हा कौतुकाची थाप मिळते. तो क्षण भाग्याचा असतो. हा पुरस्कार मला मिळाला असला तरी आमच्या संपूर्ण टीमचे हे श्रेय आहे. एक वेगळी कलाकृती सादर करण्याचा आमच्या टीमचा हा प्रयत्न यशस्वी झाला असून विविध महोत्सवांमध्ये घेतली जाणारी ‘राख’ चित्रपटाची दखल आम्हाला सुखावणारी असल्याचे संदीप पाठक सांगतात.
'राख' या चित्रपटाचं दिग्दर्शन राजेश चव्हाण यांनी केलंय. लवकरच ‘राख’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Comments
Post a Comment