हृतिक रोशन आणि सैफ अली खान अभिनीत 'विक्रम वेधा'चा टीझर प्रदर्शित
हृतिक रोशन आणि सैफ अली खान अभिनीत 'विक्रम वेधा'चा टीझर प्रदर्शित
अॅक्शन पॅक्ड व्हिज्युअल्स आणि आशयघन कथानक असलेला 'विक्रम वेधा' या हिंदी चित्रपटाचा टीझर म्हणजे प्रेक्षकांसाठी एक प्रकारचा आश्चर्याचा सुखद धक्काच आहे. यात वेधाच्या भूमिकेत अभिनेता हृतिक रोशन आहे, तर सैफ अली खानने विक्रम साकारला आहे.
चित्रपटाचा १ मिनिट ४६ सेकंदांचा टीझर 'विक्रम वेधा'च्या विश्वाची सफर घडवणारा आहे. शिट्ट्या वाजवण्याजोगे संवाद, मोठ्या प्रमाणात अॅक्शन सीक्वेन्स, आकर्षक पार्श्वसंगीत आणि भावूक करणाऱ्या नाट्याने हा टिझर परिपूर्ण आहे. 'विक्रम वेधा' हा चित्रपट म्हणजे मनोरंजनाचे एक पूर्ण पॅकेज असल्याचे संकेत देणारा टीझर खूपच आकर्षक आहे.
अभिनेता हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांच्यासमवेत दिग्दर्शक पुष्कर-गायत्री यांच्या टीझरला डिजिटल प्लॅटफॉर्मवर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, कौतुकाचा वर्षाव होत आहे. ३० सप्टेंबर २०२२ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांना हा चित्रपट पहायला मिळणार आहे.
'विक्रम वेधा' या अॅक्शन-थ्रिलरचे लेखन आणि दिग्दर्शन पुष्कर-गायत्री यांनी केले आहे. 'विक्रम वेधा'चे कथानक नाट्यमय वळणांनी भरलेले आहे. कडक शिस्तीचा पोलिस अधिकारी विक्रम (सैफ अली खान) गँगस्टर वेधाला (हृतिक रोशन) पकडतो. त्यानंतर खऱ्या अर्थाने चोर पोलिसांचा पाठ शिवणीचा खेळ सुरू होतो. वेधा आपली कथा सांगत असताना विविध पैलू उलगडत जातात आणि विक्रमला वास्तवतेचे दर्शन घडते.
गुलशन कुमार, टी-सिरीज, रिलायन्स एन्टरटेन्मेंट, फ्रायडे फिल्मवर्क्स, जिओ स्टुडिओ आणि वायनॅाट स्टुडिओज प्रोडक्शनच्या संयुक्त विद्यमाने 'विक्रम वेधा' हा चित्रपट प्रस्तुत केला जाणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर आणि गायत्री यांनी केले असून, निर्मिती भूषण कुमार आणि एस. शशिकांत यांनी केली आहे. ३० सप्टेंबर २०२२ रोजी 'विक्रम वेधा' हा चित्रपट संपूर्ण जगभरात मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.
Comments
Post a Comment