गोदरेज लॉक्स आणि आर्किटेक्चरल फिटिंग्ज आणि सिस्टीम्स...

गोदरेज लॉक्स आणि आर्किटेक्चरल फिटिंग्ज आणि सिस्टीम्सची आर्थिक वर्ष २०२७ पर्यंत २५०० कोटी रुपयांच्या महसुलाची आकांक्षा

·        पुढील पाच वर्षांत दुप्पट वाढ करण्याचे उद्दिष्ट

·        आर्किटेक्चरल फिटिंग्ज आणि सिस्टम्स क्षेत्रात न्यू-लिफ्ट बेड फिटिंग्ज आणि HIKIDO वॉर्डरोब फिटिंग्ज सादर

मुंबई २३ ऑगस्ट २०२२: गोदरेज समूहाची प्रमुख कंपनी असलेल्या गोदरेजआणि बॉयसची व्यवसाय शाखा प्रतिष्ठित ब्रँड गोदरेज लॉक्स अँड आर्किटेक्चरल फिटिंग्ज अँड सिस्टीम्स (GLAFS)लाही या वर्षी १२५ वर्षे पूर्ण झालीगोदरेज ब्रँडने (कुलूप) लॉकसह प्रवास सुरू केला आणि आज तो वारसा तंत्रज्ञानआणि डिझाइनमधील नवकल्पनांकडे लक्ष केंद्रित करून आणि गुंतवणूकीसह पुढे नेला जात आहे.


उत्पादनाच्या नाविन्यपूर्णतेमध्ये अग्रणी गोदरेज लॉक २०० हून अधिक उत्पादनांसह भारतीय बाजारपेठेत सेवा देत आहेलॉकिंग उपकरणाच्या मूलभूत संकल्पनेत क्रांतीघडवून आणण्यात ब्रँड आघाडीवर आहे आणि आर्थिक वर्ष  २०२७ पर्यंत २५०० कोटी रुपये अशी पाच वर्षांत दुप्पट वाढ करण्याचीयोजना आखत आहेकंपनीचा सध्याचा व्यवसाय महसूल ९०० कोटी आहे आणि २०२३ च्या आर्थिक वर्षासाठी १००० कोटी महसुलाचा अंदाज आहेडिजिटल लॉकच्या मागणीत लक्षणीय वाढ झाल्यामुळेब्रँड नजीकच्या वाढीसाठी सज्ज आहेया मागणीची पूर्तता करण्यासाठी ब्रँडने डिजिटल डोअर लॉक्सची 'कॅटसश्रेणी देखील सादर केली जी केवळ तांत्रिकदृष्ट्या उच्च आहेत असे नाही तर किंमतीच्या दृष्टीनेही   उत्तम मूल्य देतातमहसूल वाढीला आणखी पाठबळ देण्यासाठीब्रँड बाजाराच्या विस्तारामध्ये गुंतवणूक करेल,बाजारपेठेतील स्थान आणखी वाढवेल आणि ब्रँडच्या जाहिरातीवर देखील लक्ष केंद्रित करेल.


येत्या तीन वर्षांत आर्किटेक्चरल फिटिंग्ज आणि सिस्टीम उद्योगातील पहिल्या तीन ब्रँडमध्ये स्थान मिळवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहेआर्किटेक्चरल फिटिंगची श्रेणी ही १०,०००ते१२,०००कोटी रुपयांची बाजारपेठ आहे.कंपनीआता आर्किटेक्चरल फिटिंग क्षेत्रामध्ये आपली निवड वाढविण्यावर लक्ष केंद्रित करत आहे आणि भारतीय घरांसाठीतयार केलेल्या प्रगत डिझाइन उपयांसह आर्थिक वर्ष २३ मध्ये ४०० कोटी रुपयांचा महसूल पार करण्याचे उद्दिष्ट ठेवत आहेGLAFS ने न्यू-लिफ्ट बेड फिटिंग्ज आणि HIKIDO वॉर्डरोब फिटिंग्ज देखील सादर केल्या आहेतज्यात भविष्यातील डिझाइन आणि सानुकूल उपाय सुविधा आहेतयाव्यतिरिक्तब्रँड भारतीय घरांसाठी ड्रॉवर्सकॉर्नरसोल्यूशन्स,अंडर-सिंक सोल्यूशन्स आणि धान्य साठवण यांची अत्याधुनिक श्रेणीस्मार्ट किचन ड्रॉवर्स अँड ऑर्गनायझर्स (SKIDO) देखील सादर करत आहे.

भारतातील आक्रमक विकास योजनेवर भाष्य करताना गोदरेज लॉक्स आणि आर्किटेक्चरल फिटिंग्ज अँड सिस्टीम्सचे व्यवसाय प्रमुख श्री. श्याम मोटवानी म्हणाले, "गोदरेज लॉक्स या प्रतिष्ठित ब्रँडने ग्राहकांचे समाधान वाढविण्यावर सातत्याने भर दिला आहे. त्यामुळे बाजारपेठेचा विस्तार करण्यासाठी नेहमीच संधी निर्माण झाली आहे.आमच्या १२५ व्या वर्षी आम्हाला हे जाहीर करताना आनंद होत आहे की आम्ही केवळ आमच्या डिजिटल लॉक व्यवसायाचा विस्तार करण्याची योजनाच आखली आहे असे नाही तर आम्ही आमचा आर्किटेक्चरल फिटिंग्ज विभागही वाढवत आहोतआधुनिक डिझाइन आणि तंत्रज्ञान आमच्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावतात आणि सर्व श्रेणींमध्ये तिथेच आम्ही आमचे लक्ष केंद्रित करणार आहोतआम्ही आर्किटेक्चरल फिटिंग्ज आणि सिस्टम्स व्यवसायात ४०० कोटी रुपये आणि आर्थिक वर्ष २३ मध्ये १००० कोटी च्या एकूण कमाईची योजना आखत आहोतपुढील ५ वर्षांमध्ये दुप्पट वाढ करण्याची योजना आहे."


आर्किटेक्ट्स आणि इंटिरियर डिझायनर्स (एआयडीसमुदायाचे हित जपत ब्रँड या बाजारपेठेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. GLAFS ने संपूर्ण भारतातील AID समुदायासाठी 'गोदरेज व्हॅल्यू को-क्रिएटर्स क्लब' (GVCC) अशा प्रकारच्या पहिल्याच असलेल्या उपक्रमाची घोषणा केली.


गोदरेज लॉक्स सध्या आशियाआफ्रिकाअमेरिका आणि मध्य पूर्वेतील 24 देशांमध्ये निर्यात करतेकंपनी आंतरराष्ट्रीय बाजारात लॉकिंग सोल्यूशन्स प्रदान करतेकंपनीला परदेशातील बाजारपेठेतून तिचा हिस्सा वाढण्याची अपेक्षा असून बाजारपेठेमधील आर्किटेक्चरल हार्डवेअर आणि किचन सिस्टीम विभागात प्रवेश करण्याची योजना आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight