गोदरेज प्रोफेशनल आणि अभिनेत्री हंसिका मोटवानी यांची भागीदारी ...

गोदरेज प्रोफेशनल आणि अभिनेत्री हंसिका मोटवानी यांची भागीदारी फॉर्मलडिहाइड-फ्री केरास्मूथ ट्रीटमेंट - केरास्मूथबद्दल जागरूकता निर्माण करणार 

मुंबई, 24 ऑगस्ट2022: केसांची देखभालरंगस्टायलिंग आणि केराटिन यांच्या उत्पादनांचा प्रोफेशनल हेअर ब्रँड आणि गोदरेज कन्ज्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडचा एक भाग गोदरेज प्रोफेशनने अभिनेत्री हंसिका मोटवानी यांना सोबत घेऊन केरास्मूथ या प्रभावी प्रोटीन रिकन्स्ट्रक्शन केराटिन ट्रीटमेंटबद्दल जागरूकता वाढवण्याचे ठरवले आहे. गोदरेज प्रोफेशनल केरास्मूथ केराटिन ट्रीटमेंट हा एक प्रगत फॉर्मलडिहाइड-फ्री फॉर्मुला आहे जो केसांमध्ये केराटिन पुन्हा भरून काढण्यात मदत करतो. कुरळे किंवा अव्यवस्थित दिसणारे केस चमकदार आणि मऊसूत करून केसांचा मऊशारपणा दीर्घकाळपर्यंत टिकवून ठेवणारा परिणाम यामुळे साधला जातो.

केराटिन हे नैसर्गिक सामग्रीपासून बनवण्यात येत असले तरी बहुतांश उत्पादनांमध्ये फॉर्मलडिहाइड या रसायनाचा वापर केला जातो.  फॉर्मलडिहाइडचा समावेश असलेल्या केराटिन ट्रीटमेंट्समध्ये ज्यांच्या केसांवर ट्रीटमेंट केली जात आहे ती व्यक्ती आणि जे ही ट्रीटमेंट करतात ते सलॉनिस्ट्स या दोघांच्याही आरोग्याला धोका असतो. ग्राहक आणि सलोन प्रोफेशनल्सच्या या चिंता दूर करण्यासाठी तयार करण्यात आलेले गोदरेज प्रोफेशनलचे केरास्मूथ हे अनोखे फॉर्म्युलेशन आहेयामध्ये फॉर्मलडिहाइडचा समावेश नाही. केरास्मूथ मऊशार व नितळ केस मिळवून देते व आरोग्यासाठी अजिबात हानिकारक नाही.

हंसिकाने गोदरेज प्रोफेशनलसोबत काम करत तिच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर एक रील व्हिडिओ रिलीज केला आहे.  यामध्ये ती स्वतः गोदरेज प्रोफेशनल केरास्मूथ केराटिन ट्रीटमेंटचा अनुभव घेताना दिसत आहे.  केसांचा मऊशारपणा सहा महिन्यांपर्यंत टिकून राहील व केस वाढत असताना देखील डिमार्केशन लाईन जराही दिसणार नाही असा परिणाम कसा मिळवता येतो हे तिने या व्हिडिओमध्ये दाखवले आहे.  या ट्रीटमेंटमुळे केसांच्या कुरळेपणावर सहा महिन्यांपर्यंत टिकून राहील असे ९८% पर्यंत नियंत्रण कसे मिळवता येते ते या व्हिडिओमध्ये पहायला मिळते.*  सहज सांभाळता येतील असे केस १००% टिकवण्यात देखील हे मदत करते.** केस निरोगी राखणे खूप सोपे करून ब्लो-ड्रायसाठी लागणाऱ्या वेळेत लक्षणीय घट करते.  (*दर महिन्याला दहावेळा केस धुतले जातात असे गृहीत धरूनबाह्य प्रयोगशाळेने नुकसान झालेल्या केसांवर केलेल्या संशोधनाच्या तज्ञ पॅनलच्या अहवालावर आधारित, **अनुकूलता)

गोदरेज प्रोफेशनल केरास्मूथ प्रोटीन रिकन्स्ट्रक्शन ट्रीटमेंटबद्दल गोदरेज प्रोफेशनलचे बिझनेस हेड श्री. नीरज सेनगुट्टूवन यांनी सांगितले"केराटिन हेअर ट्रीटमेंट्स करून घेताना तुम्ही तुमच्या आरोग्याशी तडजोड करणे योग्य नाही आणि म्हणूनच आम्ही गोदरेज प्रोफेशनल केरास्मूथ प्रोटीन रिकन्स्ट्रक्शन ट्रीटमेंट घेऊन आलो आहोत.  फॅशन आणि जीवनशैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री हंसिका मोटवानी यांच्यासोबत काम करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. प्रमुख सामग्री आणि मॉयश्चरायजिंग एजंट्ससह विकसित करण्यात आलेल्या फॉर्मलडिहाइड-फ्री केराटिन ट्रीटमेंटबद्दल देशभरातील लोकांना माहिती मिळावी हा यामागचा उद्देश आहे.  गोदरेज प्रोफेशनल केरास्मूथ केसांना नवजीवन मिळवून देतेकुरळ्या केसांना मऊशार बनवते व त्यांचा विस्कळीतपणापसरलेपण कमी करून तुम्हाला मिळवून देते निरोगीचमकदारमऊशार केस."

अभिनेत्री हंसिका मोटवानी म्हणाल्या, "केसांची देखभाल आणि ट्रीटमेंट्ससाठी उत्पादनांची निवड मी खूप जागरूकतेने व काळजीपूर्वक करते. मी माझ्या केसांची काळजी ज्याप्रकारे घेते त्याप्रमाणेच इतरांनी देखील केराटिन हेअर ट्रीटमेंटसाठी योग्य उत्पादनांची निवड करावी यासाठी त्यांना प्रेरित करण्यासाठी मी गोदरेज प्रोफेशनलसोबत ही भागीदारी केली आहे. फॉर्मलडिहाइड-फ्री फॉर्मुला असलेले गोदरेज प्रोफेशनलचे केरास्मूथ सौंदर्यसाधनांच्या क्षेत्रातील एक आगळेवेगळे उत्पादन आहे. हे केसांचा कोरडेपणा कमी करून त्यांना मऊशार बनवते. केस मऊचमकदार आणि सहज सांभाळता येतील असे दीर्घकाळपर्यंत ठेवले जावेत यासाठी फॉर्मलडिहाइड-फ्री उत्पादने वापरणे हा सर्वोत्तम उपाय आहे."

 गोदरेज प्रोफेशनलच्या केरास्मूथ फॉर्म्युलेशनमध्ये मॉइश्चरायजिंग कॉम्प्लेक्स आहेयामध्ये पँथेनॉलशिया बटरव्हीट जर्म ऑइल आणि हायड्रोलाइज्ड केराटिन यांसारखे पदार्थ वापरण्यात आले आहेत. हे मॉइश्चरायजिंग घटक असल्याने केसांना नीट मॉइश्चराइज केले जातेहेअर फायबर पुन्हा निर्माण केले जातात व केसांचे पुढे नुकसान होऊ नये यासाठी केसांमध्ये मॉइश्चर टिकवून ठेवले जाते

Video Link: https://www.instagram.com/reel/ChcPv0uDcAm/?igshid=YmMyMTA2M2Y

Comments

Popular posts from this blog

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..