‘टाटा नियू-एचडीएफसी’ चे को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड..

‘टाटा नियू-एचडीएफसी’ चे को-ब्रँडेड क्रेडिट कार्डग्राहकांना ऑनलाईन - ऑफलाईन खरेदीवर मिळणार विविध लाभ

मुंबई, २४ ऑगस्ट २०२२:- टाटा नियू आणि एचडीएफसी बँके ने आज भागीदारी करुन भारतातील सर्वाधिक लाभदायक अशा को ब्रॅन्डेड क्रेडिट कार्डांची सुरूवात करत असल्याची घोषणा केली.  हे क्रेडिट कार्ड टाटा नियू प्लस एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड आणि टाटा नियू इन्फिनिटी एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड या दोन प्रकारात उपलब्ध आहे. टाटा नियूचे ग्राहक आता या कार्डासाठी टाटा नियू ॲप वरुन अर्ज करु शकतील कार्डाची महत्त्वपूर्ण माहिती ॲपवरुनच मिळवून सोप्या आणि अधिक लाभदायक पध्दतीने अनुभव प्राप्त करु शकतील.  कार्डाचे दोन्ही प्रकार हे रुपे आणि व्हिसा नेटवर्कवर उपलब्ध असतील.

एचडीएफसी बँकेचे भारतातील आघाडीचे कार्ड वितरक म्हणून असलेले स्थान तसेच टाटा नियूचे विविध विभागांतील ओम्नीचॅनल यांचा लाभ होणार आहे. या कार्डाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ग्राहकांना आता ऑनलाईन आणि इन स्टोअर खरेदीवर नियूकॉईन्स प्राप्त होतील (१ नियूकॉईन= १ रुपया).  ग्राहकांना आता टाटा नियू प्लस एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डावर २ टक्के नियूकॉईन्स आणि टाटा नियू इन्फिनिटी एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डवर ५ टक्के नियूकॉईन्स प्राप्त होतील. हे पॉईंट्स ग्राहकांना टाटांच्या ब्रॅन्ड्स च्या ऑनलाईन आणि इन स्टोअर मधील खरेदीवर हे पॉईंट्स प्राप्त होतील.  टाटांच्या पार्टनर ब्रॅन्ड्सच्या बाहेर स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय खरेदीवर ग्राहकांना अनुक्रमे १ टक्का आणि १.५ टक्के नियूकॉईन्स प्राप्त होणार आहेत. या कार्डांमुळे टाटा नियूचे सध्याचे लाभ म्हणजेच ५ टक्के नियूकॉईन्स सह ग्राहकांना आता कार्डाच्या प्रकारानुसार टाटा नियूवरुन खरेदी केल्यास ७ किंवा १० टक्के खरेदीच्या मुल्यानुसार लाभ मिळतील.

मोदन साहा, सीईओ-फायनान्शियल सर्व्हिसेस, टाटा डिजिटल यांनी सांगितले. “भारतातील सर्वांत मोठ्या वित्तीय संस्थांपैकी एक असलेल्या एचडीएफसी बँके बरोबर सहकार्य करुन आमच्या ग्राहकांना क्रेडिट कार्ड उपलब्ध करुन देतांना आंम्हाला आनंद होत आहे, यामुळे ग्राहकांच्या खरेदीचा आनंद अधिक लाभप्रद होईल.  ग्राहकांना आता किराणा, प्रवास, इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन, आरोग्य आणि वेलनेस सारख्या विविध विभागातून निवड करणे शक्य होणार आहे. टाटा नियू एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड हे भारतीय ग्राहकांचे जीवन सुखकर करण्याच्या टाटा नियूच्या घोषवाक्यानुसार आहे.  आमची अशी अपेक्षा आहे की या कार्डा मुळे टाटा नियूचा अनुभव समृध्द होऊन देशभरांतील ग्राहकांना नक्कीच आकर्षित करणे शक्य होईल.”

पराग राव, ग्रुप हेड, कन्झ्युमर फायनान्स टेक्नॉलॉजी-डिजिटल बँकिंग, एचडीएफसी, यांनी सांगितले “भारतातील एक कार्ड प्रदाता म्हणून आम्ही नेहमीच आमच्या विशिष्ट भागातील ग्राहकांना त्यांच्या गरजांनुसार उत्पादने देत असतो.  म्हणूनच आम्ही विविध पध्दतीच्या लोकांबरोबर काम करुन प्रवास, आरोग्य, फिनटेक आणि रिटेल क्षेत्रातील लोकांना विभागातील सर्वोत्कृष्ट पेमेंट उपाय देत असतो.  टाटा डिजिटल बरोबर सहकार्य करतांना आंम्हाला आनंद होत आहे कारण या मुळे दोन्ही ब्रॅन्ड्स हे टाटा नियू ॲपच्या माध्यमातून जवळ आले आहेत. आमच्या कार्डांच्या रेंज मुळे ग्राहकांचा खरेदीचा अनुभव अधिक समृध्द होईल, ज्यामुळे त्यांना अजोड असे रिवॉर्ड पॉईंट्स हे अगदी किराण्यापासून ते विमान प्रवासा पर्यंत प्राप्त करण्याची संधी मिळेल.”

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight