कर्तव्य निष्ठा पोलीस आँफिसर 'अर्जुन'...
कर्तव्य निष्ठा पोलीस आँफिसर 'अर्जुन'
झी मराठी वाहिनीवर 'अप्पी आमची कलेक्टर’ ह्या नवीन मालिकेला प्रेक्षकांचा खूप उत्तम प्रतिसाद भेटत आहे. ह्या मालिकेत अभिनेता रोहित परशुराम या नवीन कलाकाराचे आगमन होणार आहे. रोहितने उत्तम अभिनयाच्या जोरावर अनेक नाटकं, मालिका व वेब सिरीज मध्ये काम करून आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. आपल्या अभिनयातुन 'अर्जुन' या भूमिकेतही रोहित रंगत आणणार आहे.या मालिकेबद्दल व आपल्या भूमिकेबद्दल बोलताना रोहित म्हणाला कि, “ ही मालिका एक वेगळा आशय घेऊन येत आहे. मी ह्या मालिकेत अर्जुन ची बहुरंगी भूमिका साकारत आहे. अर्जुनच्या भूमिकेला अनेक पैलू आहेत. अर्जुन हा एक पोलीस ऑफिसर असून त्याचा चतुर स्वभाव ,काम करण्याचे कसब वेगळेच आहे.आपल्या अंगी असलेल्या अनेक गुणांचा तो पोलीस ऑफिसर म्हणून उपयोग करून घेताना दिसेल. आपल्या कुटुंबा विषयी त्याला अर्जुनला प्रेम व जिव्हाळा आहे. या मालिकेतुन अर्जुन हे पात्र एक वेगळं वळण आणणार असून ते पाहणे प्रेक्षकांसाठी उत्कंठावर्धक ठरेल."
Comments
Post a Comment