वॉर्डविझार्ड इनोव्हेशन्स अँड मोबिलिटी लि.

वॉर्डविझार्डतर्फे नोव्हेंबर २०२१ मध्ये इलेक्ट्रिक दुचाकींच्या ३२९० युनिट्सची विक्री

आतापर्यंतची सर्वाधिक मासिक विक्री, वार्षिक पातळीवर ११९० टक्क्यांची वाढ

      

१ डिसेंबर २०२१ – वॉर्डविझार्ड इनोव्हेशन्स अँड मोबिलिटी लि. (बीएसई कोड - ५३८९७०) या देशातील इलेक्ट्रिक दुचाकींच्या आघाडीच्या उत्पादक कंपनीने परत एकदा दमदार विक्री नोंदवली आहे. जॉय ई बाइक या ब्रँड नावाअंतर्गत विकल्या जाणाऱ्या या ईव्ही उत्पादक कंपनीने नोव्हेंबर २०२१ मध्ये आतापर्यंतची सर्वाधिक मासिक विक्री नोंदवली आहे.

 

सणासुदीच्या काळात वाढलेली मागणी, आर्थिक व्यवसायांत झालेली वाढ यांमुळे कंपनीने ३२९० इलेक्ट्रिक स्कूटर आणि मोटरसायकल युनिट्सची विक्री केली. या दमदार विक्रीमुळे कंपनीने नोव्हेंबर २०२० मध्ये झालेल्या २५५ युनिट्सच्या तुलनेत ११९० टक्क्यांची वाढ नोंदवली आहे.

 

कंपनीच्या या कमी वेगाच्या मॉडेल्सना शहरी तसेच निम- शहरी केंद्रांवर चांगली मागणी मिळत आहे. कंपनीने एप्रिल ते नोव्हेंबर २०२१ काळात १३,५१६ युनिट्सची विक्री करून गेल्या वर्षाच्या याच कालावधीत झालेल्या (एप्रिल ते नोव्हेंबर २०२२) १९५७ युनिट्सच्या विक्रीत ५९० टक्क्यांची वाढ झाली आहे.

 

या विक्रमी विक्रीविषयी वॉर्डविझार्ड इनोव्हेशन्स अँड मोबिलिटी लि. कंपनीच्या प्रमुख ऑपरेशन्स अधिकारी सौ. शीतल भालेराव म्हणाल्या, सणांच्या काळात आमच्या सर्व वितरकांना गेल्या वर्षाच्या तुलनेत दमदार आरक्षण व चौकशींच्या स्वरुपात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. नेटवर्क विस्तार आणि कंपनीच्या मालकीची दालने सुरू केल्यामुळे आम्हाला नव्या बाजारपेठांतील ग्राहकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. हरित वाहतुकीविषयी ग्राहकांमधली जागरूकता व त्यांचा कल वाढत असल्याचे लक्षात घेता येत्या काही महिन्यांत विक्रीची आकडेवारी आणखी वाढेल असा विश्वास वाटतो.

नोव्हेंबर २०२१ ची महत्त्वाची वैशिष्ट्ये

कॉर्पोरेट

वडोदरा येथे नव्या जागतिक मुख्यालयाचे उद्घाटन

ब्रँड आणि विपणन

नव्या ब्रँडचे कॅम्पेन लाँच

#BachatOnTheMove द कपिल शर्मा शो बरोबर सहकार्य

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

TIME Group & NH STUDIOZ