'एजेस फेडरल लाईफ इन्शुरन्स’
'एजेस फेडरल लाईफ इन्शुरन्स’च्या वतीने वित्तीय सुरक्षा आणि भरभराटीच्या नवीन मार्गासाठी ‘सुपर कॅश प्लान’ लॉन्च
अतूट कौटुंबिक सुरक्षेसह नियमित उत्पन्नाची जादू
मुंबई, 16 ऑक्टोबर, 2023: भारताची अग्रगण्य खासगी जीवन विमा कंपनी, एजेस फेडरल लाईफ इन्शुरन्स (AFLI) च्या वतीने आज त्यांच्या 'एजेस फेडरल लाईफ इन्शुरन्स सुपर कॅश प्लान' – या नॉन-लिंक्ड बचत योजनेची घोषणा रिटेल ग्राहकांसाठी करण्यात आली. या अभिनव योजनेच्या माध्यमातून कुटुंबासाठी तत्काळ तरलता आणि अतूट आर्थिक स्थिरता यांचे इष्टतम संयोजन, स्थिर उत्पन्न तसेच आर्थिक संरक्षण इच्छुकांसाठी हा एक कार्यक्षम पर्याय उपलब्ध झाले आहे.
"एजेस फेडरल लाईफ इन्शुरन्स सुपर कॅश प्लान सादर करताना आम्हाला उत्साह वाटत आहे. हा प्लान तुमच्या कुटुंबाची सुरक्षा आणि भरभराटीसाठी सज्ज झाला आहे. त्याशिवाय ही योजना पॉलिसीच्या पहिल्या महिन्यापासून तुम्हाला परतावा उपलब्ध करून तुमच्या वित्तीय गरजांसाठी स्मार्ट सोल्यूशन देते,” असे एजेस फेडरल लाईफ इन्शुरन्सचे एमडी आणि सीईओ विघ्नेश शहाणे म्हणाले.
“या योजनेद्वारे आमच्या पॉलिसीधारकांच्या विविध गरजा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे, जे त्यांच्या अनन्य आर्थिक गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहे. ज्यामुळे त्यांना #FutureFearless जगता येईल,” असेही शहाणे पुढे म्हणाले.
ही योजना नियमित उत्पन्नासह त्वरीत रोख तरलता देऊ करते, ज्यामुळे अगदी पॉलिसीच्या पहिल्या महिन्यापासूनच नियमित उत्पन्न सुरू होते. पॉलिसीधारकाने परतावा प्राप्त करण्याचा कालावधी कसा निवडला आहे यावर ते अवलंबून राहील. याव्यतिरिक्त, बचत वाढविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रत्येक पाचव्या पॉलिसी वर्षानंतर योजना हमी बूस्टर प्रदान करते. पॉलिसीधारकाला पॉलिसी मुदत संपल्यावर एकरकमी परिपक्वता (मॅच्युरिटी) लाभ देखील मिळतो.
एजेस फेडरल’चा लाईफ इन्शुरन्स सुपर कॅश प्लान तुमचे कवच वाढविण्यासाठी सुपर बेनिफिट मिळण्याच्या दृष्टीने डिझाईन करण्यात आला.
- तारखेचे जतन – हे वैशिष्ट्य पॉलिसीधारकांना सर्व्हायव्हल बेनिफिट पेआउट्स निवडलेल्या विशेष तारखेपर्यंत पुढे ढकलण्याची परवानगी देते.
- अखंड उत्पन्न लाभ (UIB) - विमाधारकाच्या दुर्दैवी निधनानंतर भविष्यातील कोणतेही प्रीमियम माफ करण्याचा हा वैकल्पिक लाभ आहे. नामांकन प्राप्त व्यक्ती म्हणजेच नॉमिनीला ताबडतोब एकरकमी लाभ दिला जातो आणि पॉलिसी लाभ चालू राहतात. तसेच ते वेळापत्रकानुसार दिले जातात.
- प्रीमियम ऑफसेट - हा आणखी एक वैकल्पिक लाभ असून त्यात पॉलिसीधारकाला प्रीमियम पेमेंट टर्म दरम्यान देय प्रीमियम ऑफसेट करण्यासाठी सर्व्हायव्हल बेनिफिट वापरण्याचा पर्याय आहे.
- महिलांसाठी विशेष लाभ – जीवन विम्याचा प्रसार व्हावा या उद्देशाने, योजना महिला खरेदीदारांना, प्रीमियम पेमेंट टर्मवर अवलंबून परिपक्वतेवर विम्याच्या रकमेवर 12% पर्यंत वाढ देऊ करते.
- खात्रीशीर उच्च रक्कम किंवा प्रीमियमवर रिबेट - पॉलिसीधारकांना अतिरिक्त फायदे दिले जातात, विशेषत: वार्षिक प्रीमियम ₹ 3 लाखांपेक्षा जास्त असल्यास.
एजेस फेडरल लाईफ इन्शुरन्स त्वरीत उत्पन्न आणि सुपर बेनिफिटसह येतो, हा प्लान तुमच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्याशी साजेसा आहे. तो तुम्हाला नियमित उत्पन्न मिळवून देण्यासाठी मदत करेल, तुमच्या जीवन उद्देशांसाठी भांडवल उभे करण्यास साह्य करेल आणि तुम्हाला नियमित बचतीची सवय लावेल.
ही योजना भरण्यात आलेला प्रीमियम तसेच मिळालेल्या फायद्यांवर संभाव्य कर बचत देखील देते, ज्यामुळे त्याचे आकर्षण वाढते. तुम्हाला लागू होणारे कर लाभ निश्चित करण्यासाठी तुमच्या कर सल्लागाराचा सल्ला घेणे उचित ठरेल.
Comments
Post a Comment