‘सिंगल’ प्राजक्ताचा गोड अंदाज

सिंगल प्राजक्ताचा गोड अंदाज 

ऐतिहासिक कणखर भूमिकांमधून आपल्या अभिनयाची छाप उमटवणारया अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा सिंपल आणि गोड अंदाज आगामी 'सिंगल' या मराठी चित्रपटात दिसणार आहे अमृता ही व्यक्तिरेखा ती चित्रपटात साकारणार आहे. २७ ऑक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या 'सिंगल चित्रपटाचे दिग्दर्शन चेतन चावडा आणि सागर पाठक यांनी केले आहे.  

आपल्या भूमिकेविषयी बोलताना प्राजक्ता सांगते, ‘कॉलेजकट्टा त्यातली धमाल असा हा चित्रपट आहे. मी आजवर कॉलेजगोईंग भूमिका साकारली नव्हती.  अतिशय साधीसरळ मुलगी मी यात साकारली असून, 'सिंगल' चित्रपटाच्या निमित्ताने मला वेगळ्या जॉनरची भूमिका करायला मिळाल्याचा आनंद आहे. प्रथमेश परब आणि अभिनय बेर्डे या सहकलाकारांसोबत मी पहिल्यांदाच काम केलं असून या चित्रपटात आम्ही ‘फुल ऑन कल्ला केला आहे. मी चित्रपटात 'सिंगलराहणार की 'मिंगल'  हे बघणं प्रेक्षकांसाठी धमाल अनुभव असणार आहे.  

किरण काशिनाथ कुमावतहर्षवर्धन गायकवाडशरद पाटीलअमोल कागणेगौरी सागर पाठक हे सिंगल या चित्रपटाचे निर्माते असून सह-निर्माते सुमित कदम आहेत. चित्रपटाचं लेखन सतीश समुद्रे यांचे असून पटकथा चेतन चावडासागर पाठक आणि सतीश समुद्रे यांची आहे. अभिजीत कवठाळकरमोहित कुलकर्णी यांचे संगीत चित्रपटाला लाभले आहे. छायांकन अमोल गोळे यांचे आहे. वितरणाची जबाबदारी फिल्मास्त्र स्टुडिओजने सांभाळली आहे.

Comments

Popular posts from this blog

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..