नात्यांची परीक्षा !
नात्यांची परिक्षा !
झी मराठीच्या मालिकांमध्ये दर आठवड्यात नवीन ट्विस्ट येत आहेत आणि ह्या मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करू लागल्यात. येत्या आठवड्यात काय धमाके होणारेत हे बघणं प्रेक्षकांसाठी औसुक्याचं असणार आहे. 'सारं काही तिच्यासाठी' ह्या मालिकेत उमाने ओवी आणि कुटुंब यात ती कुठल्याही कर्तव्यात कमी पडणार नाही असं रघुनाथला सांगते आणि कुठे कमी पडलेच तर ती रघुनाथ म्हणेल ती शिक्षा भोगायला तयार असल्याचं सांगते. रघुनाथ मात्र उमाने दिलेलं वचन तोडल्याने पराकोटीचा दुखावलेला आहे आणि तिच्याशी त्याने अबोला धरला आहे. रघुनाथ उमाला माफ करेल का? उमा नवी नाती जोडताना जुनी नाती सांभाळू शकेल का ?
दुसरीकडे 'तुला शिकवीन चांगलाच धडा' ह्या मालिकेत अक्षरा अधिपतीच्या लग्नानंतर भुवनेश्वरी अक्षराचं नाव बदलायचा निर्णय सांगते. भुवनेश्वरीला अक्षराचं नाव लक्ष्मी ठेवायचंय पण अक्षराला हे पटलेलं नाही. नाव बदलण्यावरुन अक्षरा आणि भुवनेश्वरीमध्ये वाद होतो. सासू सुनेच्या ह्या द्वंद्वात काय असेल अधिपतीचा निर्णय ?
पाहायला विसरू नका 'सारं काही तिच्यासाठी' संध्या ७ वा. आणि 'तुला शिकवीन चांगलाच धडा' रात्री ८ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.
Comments
Post a Comment