‘गाफील’ चित्रपटाचे मुख्य पोस्टर लॉन्च, आदित्य राज आणि वैष्णवी बरडे या कलाकारांचे पदार्पण

‘गाफील’ चित्रपटाचे मुख्य पोस्टर लॉन्च, आदित्य राज आणि वैष्णवी बरडे या कलाकारांचे पदार्पण

-     मिलिंद अशोक ढोके लिखित-दिग्दर्शित ‘गाफील’

-     निर्माते मनोज भेंडे आणि आलेख अग्रवाल निर्मित ‘गाफील’

-     १५ डिसेंबरला हा चित्रपट होणार महाराष्ट्रभरात प्रदर्शित

 

'गाफील' असं काहीसं उत्सुकता वाढवणारं नाव असलेला चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येत आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रकाशित करण्यात आले. अमरावती येथील प्रसिद्ध तापडिया सिटी सेंटर मॉलमध्ये अमरावतीचे ज्येष्ठ फिल्म वितरक आणि तापडिया मॉल चे डायरेक्टर श्री. लक्ष्मीकांत लढ्ढा यांच्या हस्ते फिल्म च्या मुख्य पोस्टर चे अनावरण झाले. तर इतर २ पोस्टरचे अनावरण फिल्म चे मुख्य कलाकार आदित्य राज, वैष्णवी बरडे आणि निर्माते श्री. मनोज भेंडे व आलेख अग्रवाल यांच्या हस्ते झाले.

 

यापूर्वी प्रकाशित करण्यात आलेल्या टायटल पोस्टरवरून म्हणजेच चित्रपटाच्या 'गाफील' या नावावरूनच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला गेली होती. त्यामुळे या चित्रपटाचे मुख्य पोस्टर कसे असेल याची प्रतीक्षा प्रेक्षकांना होती. या पोस्टरमध्ये दोन प्रमुख कलाकार दिसतात. नवोदित कलाकार आदित्य राज हातातल्या अंगठीकडे बघत आहेत, तर अभिनेत्री वैष्णवी बरडे हिच्या हातात फुलांचा गुच्छ आहे, अशी दोघांची छबी या पोस्टरवर आहे. पण नक्की कोण कोणापासून गाफील आहे, हे मात्र चित्रपट बघितल्यावरच लक्षात येईल. चित्रपटाच्या ‘गाफील’ या नावामुळेच प्रेक्षकांमध्ये हा चित्रपट नक्की कोणत्या विषयाशी निगडीत असेल याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

 

धरती फिल्मस प्रस्तुत व निर्मित, मॅड आर्क पिक्चर्स सहनिर्मित ‘गाफील’ या चित्रपटाचे निर्माते मनोज भेंडे आणि आलेख अग्रवाल हे आहेत, तर मिलिंद अशोक ढोके हे चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक आहेत. १५ डिसेंबरला हा चित्रपट महाराष्ट्रभरात प्रदर्शित होईल.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight