या सणासुदीच्या काळात साजरा करा शुद्ध गोडव्याचा अर्क
या सणासुदीच्या काळात साजरा करा शुद्ध गोडव्याचा अर्क
साखर हा भारतातील खाद्यसंस्कृतीचा महत्त्वाचा भाग असून वैविध्यपूर्ण भारतीय परंपराचा गोफ त्याभोवती विणलेला आहे. सणासुदीच्या काळात केंद्रबिंदू असणारी साखर आनंद, मुबलकता आणि समाधान देणारी असते.
गोड पदार्थ आणि मिष्टान्नांत साखर महत्त्वाची असते. साखरेमुळे तिखटामीठाच्या भारतीय पदार्थांची चव आणि त्यातलं मसाल्यांचं प्रमाण यांचा समतोल साधला जातो.
गुजरातमध्ये नवरात्री उत्सवात इतर गोड पदार्थांबरोबरच सुरती घारी बनवली जाते, तर दिल्लीचा दिवाळी उत्सव सुगंधी आणि कुरकुरीत जिलबीशिवाय अपूर्ण असतो. कोलकाता येथे दुर्गा पूजा आणि संदेश यांचे अतूट नाते आहे, तर लखनौच्या नवाबी मेजवानीसाठी बनवली जाणारी मलाई गिलोरी खाद्यपदार्थातील कलेचा उत्कृष्ट नमुना असते. लुधियानाच्या लोहरी उत्सवाचा गोडवा रेवडीनं आणखी वाढतो, तर उत्तर भारतातली होळी गुजिया आणि करंजीशिवाय अपूर्ण असते. या पाककृती भारताचा समृद्ध वारसा दर्शवणाऱ्या असून त्यातून कशाप्रकारे वैविध्यपूर्ण धार्मिक परंपरा साखरेच्या गोडीशिवाय पूर्ण होत नाहीत हे दिसून येते.
सणांच्या निमित्ताने गोड पदार्थांचा आनंद घेताना स्वच्छता व सुरक्षा यांचा विचार करणं आवश्यक आहे. सुदैवाने आपल्यापैकी अनेक जण आता साखर व त्यातून शरीरात जाणारे फॅट्स यांविषयी जागरूक झाले आहेत. आता आपण बहुतेक स्वयंपाक घरीच बनवण्यास पसंती देतो, कारण ते बाहेरच्या अन्नपदार्थांच्या तुलनेत जास्त आरोग्यपूर्ण असतं. मात्र, हे पदार्थ बनवण्यासाठी आपण जे घटक बाहेरून आणतो, ते दर्जेदार आहेत, की नाहीत याकडे आपलं लक्ष नसतं. सुट्या साखरेला धूळ, किडे, अस्वच्छ हात, किराणा दुकानातील सर्व प्रकारचे प्रदुषित घटक यांमुळे संसर्ग झालेला असू शकतो. ज्याप्रमाणे आपण घरी दिवसभर उघडे राहिलेले पदार्थ खात नाही, त्याप्रमाणे साखर, डाळ, पीठ यांसारखे दुकानात कित्येक महिन्यांपासून उघडे असलेले पदार्थ खरेदी करणं टाळलं पाहिजे.
पॅकबंद साखरेमध्ये स्वच्छतेची पूर्ण काळजी घेतलेली असते. स्वच्छतेची ही खात्री सणांच्या काळात जास्त महत्त्वाची असते. दर्जाची कठोर प्रक्रिया आणि सुरक्षित पॅकेजिंग यांमुळे प्रत्येक दाणा संभाव्य संसर्गापासून सुरक्षित राहील याची खात्री केली जाते. त्याशिवाय मधुर शुगरसारखे लोकप्रिय आणि साखर विक्री करणारा भारतातील पहिल्या क्रमांकाचा ब्रँड साखर, कारखाना ते ताटात येईपर्यंत मानवी हस्तक्षेपापासून दूर राहील याची काळजी घेतो. त्याशिवाय या साखरेत किमान ९९.९ टक्के सुक्रोज असून त्यामुळे भेसळीचा प्रश्न येत नाही. स्वस्त मिळणारी काही प्रकारची विशेषतः सुट्टी साखर सल्फायटेशनची जुनी प्रक्रिया वापरून बनवली जाते. त्यामुळे साखरेतले सल्फरचे प्रमाण वाढते. याचे लक्षण म्हणजे, साखरेचा रंग फिकट असतो आणि ती जुनी होते, तशी पिवळी पडते.
पॅकबंद साखरेचे सील सुरक्षा कवचाप्रमाणे काम करते व त्यात आर्द्रता, धूळ व इतर संसर्ग आत जाऊ देत नाही. पर्यायाने दर्जा राखण्यास मदत होते. यामुळे साखरेची चव आणि शुद्धता कायम राखते आणि अन्नपदार्थ रूचकर बनण्यास मदत होते.
सणांच्या काळात गोड पदार्थांची देवाणघेवाण करण्याची परंपरा आपल्याकडे आहे. पॅकबंद साखरेमुळे सुरक्षिततेची खात्री वाढते. प्रियजनांना दिले जाणारे गोड पदार्थ सुरक्षित आहेत असा विश्वास तुम्हाला बाळगता येतो.
Comments
Post a Comment